Friday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
येरवडा येथील नागपूर चाळीत डिसेंबर 2016 मध्ये एका महिलेस कार्यक्रमांमध्ये नाचत असताना धक्का मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे रा. 611 कासेवाडी, गणेश मित्र मंडळाशेजारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा सात वर्षापासून फरार होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणून त्याला घोषित केले होते. दरम्यान गुन्हे युनिट एक ने फरार आरोपीस जेरबंद केले आहे.

दि. 27 जुलै 2023 रोजी युनिट 1 कडील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार श्री. अमोल पवार व श्री. अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील गुन्ह्यात सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा त्याच्या राहत्या घरी आला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद यांना कळविले असता, तातडीने सपोनि श्री. आशिष कवठेकर व अमलदार यांची टीम तयार करून बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुन्हे युनिट 01 कडील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे वय 25 वर्ष रा. काशेवाडी याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्यानेच गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. 2016 मध्ये बाटल्या संतोष कांबळे हा विधी संघर्ष बालक असताना, त्याने गुन्हा केला होता. पोलीस आयुक्तालयाकडील एम ओ बी लिस्ट मधील अनुक्रमांक 1645 व येरवडा पोलीस स्टेशन कडील पाहिजे आरोपी लिस्ट मध्ये अनुक्रमांक 143 वर त्याचे नाव नमूद असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पुढील कारवाई कामी बाटल्या कांबळे यास येरवडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद सपोनी श्री. आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार अमोल पवार, अभिनव लडकत, विठ्ठल साळुंखे यांनी केली आहे.