Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील स्थानिक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे.

मी कालच शिवाजीनगरच्या बातमी नमूद केलं होतं की, कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुेठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्या पुणेकराची झाली आहे. मग काय ... पुढे काही मार्गच राहत नाही. ताणतणाव वाढतो मग काय, मित्राबरोबर गुटखा खायची मध्येच दारू प्यायला सुरूवात होते. हळुच मटका जुगार अड्डयाकडे पाय वळु लागतात. 

अगदी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतही हाच प्रकार सुरू आहे. 40 ते 45 हॉटेल कमढाब्यावर दिवस-रात्र देशी विदेशी दारूची विक्री करीत असतांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला माहिती नाही असे होऊ शकते काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. थोडक्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांना माहिती असतांना देखील बेकायदेशिरपणे देशी विदेशी दारूची विक्री होत आहे. संडे हो या मंड, ड्राय डे हो या फ्रायडे सदा सर्वदा देशी विदेशी दारूचे पाट भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून वाहत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात नॅशनल फोरम-
दरम्यान भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील दारूच्या महापुराबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या कार्यालयात चर्चा केली असता, त्यांनी संपूर्ण पुणे शरहातून हातभट्टी तयार करणारी यंत्रणा उध्वस्त केल्याचे नमूद केले आहे. दरम्यान अशा प्रकारे जर कुणी बेकायदेशिरपणे देशी विदेशी दारू विक्री करीत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. आम्ही कारवाई करतांना निव्वळ सीआरपीसीचा वापर केला जातो. परंतु स्थानिक पोलीसांना मात्र आयपीसी व सीआरपीसीसह इतर कायदयांचा वापर करता येतो. त्यामुळे स्थानिक पोलीसांचीच अधिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारूची विक्री भेसळयुक्त बनावट दारूचीही अधिक विक्री –
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी विदेशी दारूची तस्करी, विक्री होत असली तरीही त्यामध्ये कंपन्यांची मुळ दारू 30ते 40 टक्के असून, इतर 60 ते 70 टक्के दारू ही भेसळयुक्त व बनावट असल्याचे काहींचे म्हणणे आहे. नियमितपणे ढाब्यावर जाणाऱ्यांचे म्हणणे ठरत आहे. एक दोन घोटातच किक बसून नशा तर्रपणे येत असल्याने बहुतांश जण पहिल्या धारेची मिळते म्हणून या भागात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान यानंतर डोकं दुखणं, अंग दुखणे यासाह वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. याबाबत पुणे महापालिकेकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वरील लक्षणांबाबत विचारणा केली असता, मद्यपान करणाऱ्यांना अशा प्रकारची लक्षणे येऊ शकतात, त्यात नवीन काहीच नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परंतु अतिअल्कहोल प्राशन केल्यामुळे असे होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान काही नियमित चवीच्या ग्राहकांनी मात्र दारूमध्ये भेसळ होत असल्याचे नमूद केले आहे.

  थोडक्यात राज्य शासनाचे आर्थिक नुकसान, नागरिकांच्या आरोग्याची हेडसांड होत असताना देखील त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्यामुळेच हॉटेल व ढाबेचालकांचे मनोधैर्य वाढले असल्याची बाबही दिसून येत आहे. राज्य शासनाचे दोन्ही विभाग देशी-विदेशी दारूच्या तस्करी संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे गांभीर्य बाळगत नसून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणून दुसऱ्या बाजूने राज्य शासनाचा महसुल देखील बुडविला जात आहे. या सर्व प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दारूची नशा आणि ऑनलाईन गेमिंग लॉटरी जुगाराचे अड्डे-
एकीकडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दारूचा महापुर आलेला असतांना, दुसरीकडे मात्र ऑनलाईन लॉटरी, व्हिडीओ गेम सारख्या माध्यमातून जुगार अड्डे वेगात सुरू आहेत. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे चालु ठेवून, तरूणांना जुगारी बनविले जात आहे. त्यातूनच पुढे गुन्हेगारीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

भारतीच्या हद्दीत मध्यवर्गीयांची मोठी संख्या आहे. मजुरांची देखील तेवढीच संख्या आहे. साडेपाच लाख लोकसंख्येच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत लाखाच्या आसपास बाहेरून आलेले विद्यार्थी व कामगार अधिक आहेत. त्यामुळे साडेपाच  लाख नव्हे तर सहा लाख लोकसंख्या असलेल्या भारती विद्यापीठातील अंमलदार मात्र रस्त्यावर पेट्रोलिंग करतांना मात्र कधीच दिसत नाहीत. बेकायदेशिर प्रवासी वाहतुकदार आणि भारती विद्यापीठ पोलीसांची जुनी ओळख आहेच आता त्यात नव नवीन बेकायदेशिर व गैरकायदयाच्या मंडळींची अधिक भर पडत आहे. हा मोठा विषय असून पुढील तीन भागात यावर अधिक भाष्य करता येऊ शकते.