Monday, October 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव जगताप यांनी कब्जा केल्याने पूर्वीच्या अतिक्रमण व आकाश चिन्ह व सुरक्षा विभागातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व अधीक्षक संवर्गातील सेवकांना धान्याच्या राशीत मनसोक्त लोळण्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे त्यांनी.टॅक्स विभागाच्या सेवन स्टार पब मध्ये वर्णी लावण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले असल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीच्या सनई चौघड्यातून वेगळा सूर बाहेर येऊ लागला आहे.

 पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दि. 23 ऑगस्ट रोजी लेखनीकी  संवर्गातील लिपिक टंकलेखक या हुद्यावरील सेवकांच्या नियतकालिक बदल्या केल्या आहेत. एकूण 279 सेवकांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या 76 विभागांच्या कार्यालयातील लिपिक टंकलेखक या हुद्द्यावरील सेवकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. तथापि या 279 सेवकांच्या बदल्यांमध्ये सर्वांचा जीव कर आकारणी व कर संकलन अर्थात टॅक्स विभागामध्ये अडकला असल्याचे दिसून आले आहे. कर आकारणी व कर संकलन कार्यालयातील सुमारे 74 सेवकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. पैकी कित्येक सेवकांनी आजपर्यंत त्यांचा पदभार सोडलेला नाही. पुणे महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी बदलीवर आलेल्या 74 सेवकांना रुजू करून घेतले असले, तरी मुळात टॅक्स विभागात मागील 8/10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सेवकांनी बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार दिला असून टॅक्स विभागातच त्यांना कायम करावे म्हणून अनेकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 दरम्यान या बदली प्रक्रियेमध्ये ज्या सेवकांची तीन वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या बदल्या करणे हे बदली अधिनियमानुसार सुसंगत असले तरी कित्येक सेवक मागील आठ ते दहा वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स विभागामध्ये कार्यरत आहेत. या सार्वत्रिक बदलांमध्ये त्यांची कुठेही नावे आलेले नाहीत हे एक आश्चर्य म्हणावे लागेल. उदाहरणादाखल नावे सांगायची तर श्री. नवघणे, श्री. राजेंद्र जाधव, निलेश पवार यांची नावे देता येतील. ही मंडळी टॅक्स विभागात वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. सार्वत्रिक बदली प्रक्रियेत यांची नावेच आलेली नाहीत. तर कित्येक सेवक टॅक्स मधील जागा सोडायला तयार नाहीत. 

टॅक्स विभागातून ज्या सेवकांना कार्यमुक्त करण्यात आले त्यांची नावे-
दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी लिपिक टंकलेखक संवर्गातील सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यात 279 सेवकांचा समावेश आहे. पैकी टॅक्स विभागातून 74 सेवकांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे व 74 सेवकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. टॅक्स विभागातून ज्या सेवकांची बदली केली त्यांची नावे व बदलीचे ठिकाण नमूद केले आहे ते येणेप्रमाणे –

  1. मिलिंद चव्हाण- उद्यान विभाग, 2.श्री. सोनवणे प्रकाश प्रभाकर – बांधकाम विभाग, 3. श्री. बोल्लू व्यंकटेश बाळकृष्ण – कोंढवा येवलेवाडी क्षे. कार्यालय 4. श्री. चोरगे अनिल सोपान- पाणी पुरवठा विभाग 5. श्री. डिंबळे राजेंद्र मारूती- सिंहगड रोड क्षे. कार्यालय 6. श्री. जाधव अशोक सोनबा- कोंढवा येवलेवाडी क्षे. कार्यालय 7. कुलथे विनोद प्रकाश- बांधकाम विभाग 8. मकवानी रोहन विनोद-दक्षता विभाग 9. रियाज हसनोद्दीन शेख- कोंढवा येवलेवाडी क्षे. कार्यालय 10. श्री. सोनावणे सुषार सुधीर – भूसंपादन 11. श्री. तेलंग राजेंद्र शरणप्पा – ढोलेपाटील रोड क्षे. कार्यालय 12. श्री. लाड गणेश शिवाजी- बिबवेडी क्षे. कार्यालय 13. श्री. होले धनंजय अशोक- आस्थापना विभाग 14. श्री. करंजे धनंजय प्रकाश – राजीव गांधी प्राणी संग्रहायलय 15. श्री. फडतरे रामचंद्र बबन – धनकवडी सहकारनगर क्षे. कार्यालय 16. श्री चव्हाण विकास मुरलीधर- धनकवडी क्षे. कार्यालय 17. श्री जाधव अभिषेक विश्वास -बांधकाम विभाग 18. श्री क्षीरसागर संदीप मच्छिंद्र -बांधकाम विभाग 19. श्री निंबाळकर सुनील दामोदर- धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 20. श्रीमती नांगरे रोहिणी रोहिदास- पाणीपुरवठा विभाग 21. श्री. नाईक आनंद एकनाथ – परिमंडळ क्रमांक पाच विभाग 22. श्री पतू व्यंकटेश नारायण- प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग 23. पांगारे गोरक्षनाथ रामदास- धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 24. श्री. शेडगे विवेक अशोक -परिमंडळ क्रमांक दोन विभाग 25. श्री. पाठक सुनील सर्वोत्तम -पाणीपुरवठा विभाग 26. श्रीमती शहाणे वर्षा सतीश- बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय 27. श्रीमती सोनावणे मृणालिनी अनिकेत -मुख्य लेखा वित्त विभाग 28. श्रीमती पारधी धनश्री संजय- मुख्यालेखा वित्त विभाग 29. श्री. नाईक अमोल धनंजय- कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय 30. श्री. सकट राहुल सुरेश- सांस्कृतिक केंद्र विभाग 31. श्रीमती स्मिता विश्वनाथ कुंभार- परिमंडळ क्रमांक पाच विभाग 32. श्रीमती शीतल चेतन साबळे -मुख्य लेखा व वित्त विभाग 33. श्री. आकाश राजेंद्र गायकवाड- परिमंडळ क्रमांक चार विभाग 34. श्री मनोज येडप्पा जाधव- परिमंडळ क्रमांक चार विभाग 35. श्री. पराडकर सुजाता विजय -परिमंडळ क्रमांक चार 36. श्री नामदेव तुपे- मोटार वाहन विभाग 37. श्री युवराज सोपान तुपे- मोटार वाहन विभाग 38. श्री. संजीव राम आसरे परदेशी -मोटर वाहन विभाग 39. श्री जगताप तुकाराम श्रीरंग -आस्थापना विभाग 40. श्री. लोणकर माणिक बाळासाहेब -नगर रोड क्षेत्रीय कार्यालय 41. श्री जगताप नितीन उत्तम- मोटार वाहन विभाग 42. श्री अमोल बाळासाहेब निंबाळकर- मालमत्ता व्यवस्थापन विभाग 43. श्री नवनाथ संभाजी तांबे- मालमत्ता व व्यवस्थापन विभाग 44. श्री दत्तात्रय गेनबा हरपळे – बिबवेवाडी क्षे. कार्यालय 45. श्री. सोपान किसन वाडकर -बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय 46. श्री. रवींद्र मल्हारी गायकवाड- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 47. श्री मारुती नारायण आबनावे -समाज विकास विभाग 48. श्री गणेश हिरामण हरपळे- सुरक्षा विभाग 49. श्री. मारूती ज्ञानोबा चोरघडे -सुरक्षा विभाग 50. श्री नवनाथ मारुती हरपळे- सुरक्षा विभाग 51. श्री महादेव गोरख पुणेकर- धनकवडी क्षे. कार्यालय 52. गणेश काशिनाथ शिर्के -अग्निशमन व आपत्ती विभाग 53. श्री विलास नारायण ठेवरे- अग्निशमन विभाग 54. श्री रोहन सोपान चौधरी- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 55. श्री सुरेश दिलीप चव्हाण -वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 56. श्री दिलीप बाजीराव शिंदे -वारजे कर्वेनगर क्षे. कार्यालय 57. राजेश विलास सुतार- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 58. श्री. अनिकेत अशोक गोसावी- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 59. श्री गणेश बबनराव पवार -कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय 60. श्री. महेश अशोक चव्हाण- कोथरुड क्षेत्रीय कार्यालय 61. श्री माधव मारुती धावडे -कोथरूड क्षेत्रीय कार्यालय 62. श्री.विकास संपत यादव- मुख्यालेखा वित्त विभाग 63. विजय प्रकाश चिंचणकर- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय 64. श्री मनोहर मारुती भुकन- येरवडा क्षेत्रीय कार्यालय 65. श्री. अविनाश चंद्रकांत ढोपरे- येरवडा क्षेत्रीय कार्यालय 66. शशिकांत कुंडलिक पाटोळे -येरवडा क्षेत्रीय कार्यालय 67. श्री. जितेंद्र हरिश्चंद्र मोरे- येरवडा क्षेत्रीय कार्यालय 68. श्री अमोल गणपत पवार- आकाशचिन्ह परवाना विभाग 69. श्री गणेश यशवंत शिंदे -शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय 70. मारुती बबन जरांडे -शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय 71. श्री.मोरे हेमकांत भगवान- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय 72. श्री बेलदरी गोविंदा राजेंद्र- औंध बाणेर क्षे. कार्यालय. 73. श्री कोडीतकर विकास प्रकाश -औंध क्षे. कार्यालय. 74. श्री. स्वामी नितीन रतिकांत- बाणेर क्षेत्रीय कार्यालय.
    वरील प्रमाणे कर आकारणी व कर संकलन विभागातून या 74 सेवकांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत. त्यासाठी कित्येक सेवकांनी टॅक्स विभागातून इतर खात्यात जाण्यास नकार दिलेला आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयामध्ये नवीन 74 सेवकांची बदली करण्यात आलेली आहेत ती नावे खालील प्रमाणे आहेत.

पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यातून टॅक्स विभागामध्ये बदलीने पदस्थापना झालेले सेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1. श्री शिंदे संजय कोंडीबा – शिक्षण विभाग प्राथमिक 2. श्रीमती लंके कामिनी शैलेंद्र -शिक्षण विभाग प्राथमिक 3. श्रीमती जगताप मीनाक्षी राजेंद्र -शिक्षण विभाग प्राथमिक 4. श्रीमती काळे नलिनी आनंद- शिक्षण विभाग प्राथमिक 5. श्री काळे निलेश विलास- शिक्षण विभाग प्राथमिक 6. शिरसाठ रामचंद्र शिक्षण विभाग प्राथमिक 7. श्री तुंडलाईज विवेक राजू – येरवडा कळस क्षेत्रीय कार्यालय 8. श्री .खटावकर विश्वजीत सूर्यकांत -हडपसर क्षेत्रीय कार्यालय 9. श्री खंडाळे आशिष सुनील- शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय 10. श्री धुमाळ प्रकाश नथोबा- कोथरूड क्षे. कार्यालय 11. प्रशांत बाळासाहेब -निवडणूक विभाग 12.श्री लोणारे बाबासाहेब मधुकर- मोटर वाहन विभाग 13.श्री गुहिरे भीमराज रामपाल -येरळा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय 14. श्री गायकवाड बाळू सदस्य -सांस्कृतिक केंद्र विभाग 15.श्री लखन संतोष प्रकाश- कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय 16.श्री जोरी जयदीप अक्षय- कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय 17. पौर्णिमा धोंडू अस्वले- भवन रचना विभाग 18.श्री परदेशी प्रशांत लक्ष्मण- घोले रोड क्षेत्रीय कार्यालय 19. श्री वाघमारे महेश भारत- भवानीपेठ क्षे. कार्यालय 20. गणेश शिवराम – येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय 21. श्री वाघेला करण प्रकाश -भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालय. 22. श्री घोडके दीपक विठ्ठल- समाज कल्याण विभाग 23.श्री. खरात योगेश कृष्ण- सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 24. श्री चांदणे शिपात महेंद्र- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 25. श्री बेलदरे भगवान बबन- अतिक्रमण विभाग 26. श्री भारमल अमोल सिताराम- मालमत्ता व्यवस्थापन विभाग 27. शिंदे विनायक महादेव- सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 28. श्री साळुंखे शैलेश खेमचंद -अग्निशमन विभाग 29. श्री शिंदे गौरव जयकुमार- कोंढवा येवलेवाडी क्षे. कार्यालय 30. श्रीमती चव्हाण प्रीती प्रकाश- चाळ विभाग 31. श्री शेख तन्वीर हुसेन- मंडई विभाग 32. श्री मंठा निखिल सुनील- मालमत्ता व्यवस्थापन विभाग 33. श्री.ददली देवेंद्र भीमाप्पा- बांधकाम विभाग 34. श्री जागडे सागर शिवाजी- बांधकाम विभाग 35. श्री ठोंबरे गणेश दिलीप -बांधकाम विभाग 36. श्री जगदाळे प्रमोद ज्ञानेश्वर- समाज विकास विभाग 37. स्वामी राणी जॉर्ज- औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय 38. श्री बालवडकर राजू तुकाराम- कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय 39. श्री जाधव तानाजी भानुदास- कोथरूड बावधन क्षे. कार्यालय 40. श्री लिंबोरे विशाल मारुती- धनकवडी क्षे. कार्यालय 41. श्री खिलारे विक्रम मोहन- भवानीपेठ क्षे. कार्यालय 42. श्री भोसले किरण प्रकाश – माहिती व तंत्रज्ञान विभाग 43. श्री वैराट रोहन बाळासाहेब- समाज विकास विभाग 44. श्री जाधव संदीप शंकर -परिमंडळ 3 45. इंदापूरकर उमेश अशोक- वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय 46. श्री शंकर नवनाथ सर्जेराव- हडपसर क्षे. कार्यालय 47. श्रीमती भालेराव शुभांगी हर्षल- झोपडपट्टी निर्मूलन पूर्वसन विभाग 48. श्री निखिल भास्कर श्रीमल -पाणीपुरवठा विभाग 49. श्री प्रथमेश दिगंबर मातेरे- अस्थापना विभाग 50. श्री हर्षल बाळासाहेब सातपुते- आस्थापना विभाग 51.श्री. तुषार शंकर दारवटकर- आस्थापना विभाग 52. श्री यश प्रशांत दूरकर -औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय 53. श्री मयूर श्रीमती मयुरी- लक्ष्मण पाषाणकर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय 54. श्री शुभम कैलास गायकवाड- ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय 55. श्री करण किशोर धायमुक्ते -धनकवडी क्षे कार्यालय 56.श्री. राहुल साहेबराव मेंगाळे -परिमंडळ 4 57. श्री.सुशील प्रकाश कांबळे -भवानी पेठ क्षे. कार्यालय 58. श्री.ऋषिकेश युवराज ढोंगे- राजीव गांधी प्राणीसंग्रहालय 59. श्रीमती काजल तानाजी थोरवे- परिमंडळ पाच 60. श्रीमती पूजा राजेंद्र हांडे – परिमंडळ 4 61. श्री जागडे समीर भिमराव -मुख्यालेखा व वित्त विभाग 62.श्री तांबट रोहन चंद्रशेखर- सामान्य प्रशासन विभाग 63. श्रीमती निकिता निलेश मुसळे- आस्थापन विभाग 64. श्री. शंकर राम शिंदे- उद्यान विभाग 65. श्री शुभम कृष्णा शेळके -परिमंडळ 4 66. श्री स्वप्निल विजयकुमार जाधव -धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 67. श्री. आदित्य मारुती झरांडे – धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 68. श्री ताठे विशाल बाळासाहेब- धनकवडी क्षे. कार्यालय 69. श्री शिरगिरे राहुल सुभाष – धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 70. श्रीमती उल्का विजय धनश्री- नगर रोड क्षेत्रीय कार्यालय 71. श्रीमती अश्विनी उमेश गोसावी- नगर रोड क्षेत्रीय कार्यालय 72. श्रीमती विद्या नारायण पवार -परिमंडळ 4 73. श्रीमती. वैशाली काळुराम कामटे – बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय 74. श्रीमती पूजा रवींद्र आबनावे -बिबवाडी क्षे कार्यालय. 75.श्री ओमकार चंद्रकांत वर्पे- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 76. श्री श्याम भिकाप्पा कापसे – वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, 77. श्री गौतमी अविनाश कोडम- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय.

 वरील प्रमाणे एकूण 77 सेवकांच्या नव्याने नियुक्त्या कर आकारणी व कर संकलन विभाग यांच्या कार्यालयात करण्यात आलेले आहेत. तसेच याबाबत पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज बी.पी. यांनी आज्ञापत्रकामध्ये काही सूचना केलेले आहेत त्यात नमूद केले आहे की,

 वरील सेवकास या आज्ञापत्रकानुसार बदली विभागात रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यानुसार तत्काळ बदली खात्यात रुजु व्हावे, यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची अर्थात रिलिव्ह मेमोची आवश्यकता नाही. तसेच वरील सेवकाने बदली खात्यात रुजू झाल्याचा अहवाल संबंधित खाते प्रमुख यांनी तत्काळ सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, तसेच वरील सेवकांच्या बदल्या समुपदेशन करून करण्यात आल्या असल्याने अन्य ठिकाणी बदली करण्याकरिता किंवा सध्याच्या खात्यात ठेवण्याकरिता कोणत्याही प्रकारचा दबाव शिफारस तसेच विनंती अर्जाची दखल घेण्यात येणार नाही याची सर्व सेवकांनी नोंद घ्यावी.  चौथ्या मुद्द्यांमध्ये बदली करण्यात आलेल्या सेवकांचे माहे ऑगस्ट 2024 चे वेतन मूळ खात्याने अदा करावयाचे आहे. सप्टेंबर 2024 पासूनचे नियमानुसार वेतन व भत्ते बदली खात्याकडून अदा करण्यात यावे, याची दक्षता खाते प्रमुख यांनी घ्यावी व त्याची खातरजमा मुख्य लेख वित्त अधिकारी यांनी करावी.
 क्रमांक पाचवर प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सेवकांना यापूर्वी प्रशासकीय कामकाजाच्या  सोईसाठी सेवकांना यापूर्वी पूर्णवेळ अतिरिक्त पदभार ठेवण्यात येत आहेत, तसेच या आदेशाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामकाजाच्या खात्यामध्ये परस्पर खाते बदल केल्यास संबंधित सेवक व खाते प्रमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी, तसेच खाते प्रमुखकांनी वरील बाबत पुढील जरूर ते तजवीस ठेवावी असा सज्जड दम पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेला आहे.

दरम्यान असा आदेश देऊन देखील कर आकारणी व कर संकलन विभागातील बहुतांश सेवक त्यांची खुर्ची सोडायला तयार नाहीत. त्यामुळे उपआयुक्त श्री. माधव जगताप त्यांच्या पदाचा व अधिकाराचा वापर करून व त्यांचे राजकीय बळ वापरून काही विशिष्ट सेवकांना बदली आदेश झालेला असताना देखील टॅक्स विभागातच ठेवून घेणार की त्यांना कार्यमुक्त करणार हा एक आत्स्युक्याचा याचा विषय ठरला आहे.

खात्यामध्ये परस्पर बदल आणि शिस्तभंगाची कारवाई-
कर आकारणी व कर संकलन विभाग अर्थात टॅक्स विभागात सध्या कार्यरत असलेले बहुतांश सेवक बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. उपआयुक्त श्री. माधव जगताप यांनी बदलीवर आलेल्या 74 सेवकांना रुजु करून घेतले आहे. जुने जात नाहीत, नवीन कुठे बसणार हा महत्वाचा प्रश्न आहे. दरम्यान ज्यांची टॅक्स विभागातून बदली झाली आहे, ते पाच पासून दहा पर्यंत टोल देण्यासही तयार असल्याची कानोकानी आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाविरूद्ध माधव जगताप निर्णय घेणार काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान खात्यात परस्पर बदल केल्यास खातेप्रमुखांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार असेही आदेशात नमूद असले तरी हा एकप्रकारचा बदलीचा फॉर्मट आहे. आजपर्यंत बांधकाम, पथ, टॅक्स, कामगार कल्याण अशा काही खात्यांमधील सेवक बदलीच्या ठिकाणी गेले नाहीत, तरी देखील त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अति. आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांना देखील पुणेरी वाटाण्याच्या अक्षता फेकुण मारले जाणार आहेत काय हे पहावे लागेल.