Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/
खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.


भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-
तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्माण करणेसाठी “ माझे मध्ये कोण येतो ते मी बघतो. आता तुला खल्लास करतो“ असे ओरडुन फिर्यादीच्या डोक्यात खोरे मारले. त्याचवेळी आरोपी आदित्य ऊर्फ भुडया बनसोडे हा तेथे कोयता घेवून आला व त्याने देखील फिर्यादी यांना उद्देशून “याला सोडु नका मारून टाका“ असे म्हणून कोयता उमेश वाघमारेकडे दिला. उमेश वाघमारे याने तो कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यावेळी उमेश वाघमारेच्या साथीदाराने आरोपी कुमार लोंढे याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीस फेकुन मारला, विनायक शिंदे, मंदार खंडागळे यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, गणेश शिकदार ऊर्फ परदेशी यांनी फिर्यादीस लोखंडी रॉड, आदित्य बनसोडे याने फिर्यादीचे पायावर लाकडी बांबुने मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच या भागात हातातील हत्यारे उंचावुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. साऊथच्या चित्रपटाला लाजवेल असे कृत्य आरोपींनी केले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ही घटना दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार नातुबाग, शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे येथे गेले असताना फिर्यादी यांचे तोंडओळखीचा मंदार खंडागळे याने फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवून, फिर्यादीस “आमचा भाई जंगळ्या सातपुते हा जेलमधुन सुटला आहे. त्याने मला तुझ्याकडुन चाळीस हजार रुपये घेवुन ये असे सांगीतले आहे. असे म्हणून फिर्यादी यांचेकडे खंडणीची मागणी केली. परंतु फिर्यादी यांनी त्यांस पैसे देण्यास नकार दिला याचा राग आल्याने मंदार खंडागळेने फिर्यादीस “ तुला अर्ध्या तासात बघुन घेतो“ अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादी व त्यांचे साथीदार हे घरी जात असताना डायमंड मित्र मंडळ, गंजपेठ, पुणे येथे आले व फिर्यादी हे यातील आरोपी उमेश वाघमारे यांचे वडीलांशी व कुमार लोंढे यांचेशी बोलत असताना उमेश वाघमारे हा तेथे आला व पुढे हा सर्व प्रकार घडला होता.

खडक पोलीसांची कारवाई –
खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक 341/2022 भा.द.वि.क. 307,387,341, 143,144, 147, 148, 149, 506, भा.ह.का.क. 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135, क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट कलम 7, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1), 3(2), 3(1) अन्वये नोंद आहे. गुन्हयाचा तपास फरासखान्याचे सहायक पोलीस आयुक्त श्री सतीश गोवेकर हे करीत आहेत. दरम्यान वरीलप्रमाणे दाखल गुन्हयात एकुण 05 आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आले होती परंतु यातील पाहीजे आरोपी कुमार रमेश लोंढे हा गुन्हा दाखल दिनांकापासून अटक चुकविण्यासाठी फरार होता. नमुद आरोपी तब्बल तीन महीन्यापासून अटक चुकविण्यासाठी फरार असल्याने त्याचा शोध सुरू होता.

असा लागला गुन्हेगाराचा शोध-
खडक पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी स.पो.नि. राकेश जाधव, अमलदार संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बावळे अशा पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपास पथकातील अंमलदार संदिप तळेकर,मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बाबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की पाहीजे आरोपी कुमार लोंढे हा त्याचे नातेवाइकांना भेटण्यासाठी संतोषी माता मंदिर, कात्रज येथे येणार असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या बामतीनुसार तात्काळ स.पो.नि. जाधव व अंमलदार संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार चाबळे, निवेदीता कोंढाळकर अशा पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन पाहीजे आरोपी कुमार लोंढे यास ताब्यात घेतले व पुढिल कार्यवाहीसाठी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे समक्ष हजर केले.
वरील नमुद कारवाई श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे व श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगिता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, व पोलीस अंमलदार महेश कुताळ, संदिप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार बाबळे, विशाल जाधव, रफिक नदाफ, लखन डावरे, नितीन जाधव, महेश जाधव, राणी जाधव, निवेदीता कोंढाळकर यांचे पथकाने केली आहे.