
पुणे महापालिकेत नगरसेवक – अधिकारी झालेत – बिल्डर- ठेकेदार पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील संगित खुर्ची
Pune-PMC-office
चंदनाच्या झाडाला बाभळीची सालं लावून, किती दिवस पुणे मनपा व नगर अभियंता कार्यालयाला अडचणीत आणणार...
अपचारी अभियंत्यांविरूद्ध कारवाई करण्याएैवजी बदलीचा प्रसाद
रासकरांना महाप्रसाद तर बालवेंना तिर्थप्रसाद - तिघांच्या साठमारीत पाच वर्षे रजेवर असलेल्या जयंत सरवदेंना आमदार थाळीचे धनी बनविले
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या उपनगरातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या तक्रार अर्जावरील चौकशीची फाईल्स, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व बांधकाम विभागातून गहाळ झाली आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री. दयानंद सोनकांबळे यांनी १० जानेवारी २०१९ रोजी बांधकाम विभागाला पाठविलेल्या पत्रातून दिसून आले आहे. दरम्यान य...