Monday, April 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात क्रीमसाठी अधिकार्यांची नस्ती उठाठेव

तेरी भी चूप मेरी भी चूप

कुणाशी काही बोलायचं नाय, हाताची घडी तोंडावर बोट

झोन चारचा कारभार झोन १ च्या कार्यालयातून तर झोन १ चा कारभार झोन ४ च्या कार्यालयातून, शेवटी खराडी, वडगाव शेरी, मुंढवा सरोदेंच्या ताब्यात

PMC-Pune-Bandhkam

पुणे/दि/ प्रतिनिधी/

            मराठी माध्यमांच्या शाळांतील बालवाडी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील नर्सरी, केजी या वर्गात प्रवेश घेतलेल्या मराठीतील एक प्रसिद्ध बालगीत आहे. अगदी ते सर्वांनाच खूप आवडते. बालचमू देखील त्यांचे इटूकले- पिटूकले हात कमरेवर ठेवून टणाटण उड्या मारत असतात. ते बालगीत म्हणजे, मारू ऽऽऽ बेडूक उडी, गड्यांनो मारू बेडूक उडीऽऽऽ अस्सं हे सुंदर बालगीत महाराष्ट्रातील प्रत्येक बालवाडीत वाजविले जाते. परंतु हल्ली पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभाग म्हणजे बालवाडी झाली आहे. तिथे देखील सध्या संगित खुर्ची आणि बालगीतांचा छमछमाट सुरू आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या या बालवाडीतील जयंत सरोदे आणि विलास फड हे  विद्यार्थी बांधकाम विभागाच्या नर्सरीत अनेक वर्षांपासून आहेत.   त्यांचा देखील नेहमीच छमछमाट ऐकू येतो. सध्या ह्या दोन विदयार्थ्यांपैकी जयंतदादा हे बालवाडीत तर विलास दादा हे केजी मध्ये आहेत. दोघेही सध्या झोन एक मधून झोन ४ मध्ये तर झोन चार मधुन झोन एक मध्ये टणाटण उड्या मारत आहेत. त्यांचे हे लुटूपुटूचं टणाटण उड्या मारंण शहर अभियंता कार्यालयालय सद्गतीत उत्सुकतेनं पाहतय खरं पण त्यांना हसूही आवरेनास झालं आहे. शिपाई, क्लार्क आणि इमारत निरीक्षक कावर्‍या-बावर्‍या नजरेनं पाहतय तर उपअभियंता संगित खुर्चीच्या तालावर रागरंग भरू लागले आहेत.

            बेडूक उड्या नेमक्या कशासाठी

            सध्या पुणे महानगरपालिकेत अधिकारी व नगरसेवक, बिल्डर व ठेकेदार झाले आहेत. अधिकारी आणि त्यांचे साथीदार बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. तर नगरसेवक मंडळी तर पूर्वीपासूनच ठेकेदारीचा व्यवसाय करीत आहेत. पुणे महापालिकेतील बहुतांश नगरसेवक बगलेत ठेकेदाराचे बील पास करा आणि ह्या बांधकामाला आणि त्या बांधकामाला परवानगी दया अशी मागणी करीत गावभर उंडरत असतात.  सध्या बांधकाम विभागातील अधिकारी हे बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. तसेच राजकीय निवडणूकीच्या माध्यमातून स्वतःचा भाऊ, वहीणी, मुलांना निवडूण आणण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत. कारण एकच. बांधकाम आणि बिल्डरलॉबी.

            पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील काही विभाग सध्या तेजित आहेत. त्यात खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, चंदननगर, मुंढवा हा भाग क्रिम एरिया म्हणून सध्या ओळखला जात आहे. या भागातील बहुतांश जमिनी जेव्ही या तत्वावर बांधल्या व विकल्या जात आहेत. त्यामुळे कोटीच्या कोटीची उड्डाणे सुरू आहेत. काही मनी ब्लॅक तर बहुतांश मनी व्हाईट असल्याने सर्वच अधिकारी सध्या बांधकाम व्यावसायिक होण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत.

            पुणे महापालिकेतील बांधकाम विभागातील झोन १ व झोन ४ यांच्याकडे खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, चंदननगर, मुंढवा असे जुनी हद्द, नवीन हद्द अशा प्रकारे विभागणी झाली आहे. त्यामुळे काही अधिकार्‍यांना कोणत्या झोनचा कारभार स्वीकारावा याच्या संभ्रमात थोडक्यात तळ्यात मळ्यात अडकुन पडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या पुणे महापालिका बांधकाम विभागात मारू बेडूक उडी चे बालगीत अगदी जोरात आहे.

झोन की चार….

            सध्या पुणे महापालिकेच्या अधिकृत नियुक्ती आदेशानुसार, बांधकाम विकास विभाग झोन एक चे कार्यकारी अभियंता म्हणून विलास फड तर बांधकाम विकास विभाग झोन चारचे कार्यकारी अभियंता म्हणून जयंत सरोदे कार्यरत आहेत. ज्या विभागात नियुक्ती आहे, त्याच विभागाचे न्याय निर्णय त्या त्या अधिकार्‍यांनी करणे अपेक्षित आहे.

            परंतु सध्या पुणे महापालिकेत भलतेच घडत आहे. सध्या पुणे महापालिकेच्या झोन एक मधील इमारत निरीक्षक, कनिष्ठ अभियता, उपअभियंता हे कार्यालयीन कामकाज करण्यासाठी झोन एक एैवजी झोन चारच्या कार्यालयात जा- ये करीत आहेत. तर झोन चार मधील अधिकारी कर्मचारी झोन एकच्या कार्यालयात ये- जा करीत असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना झोन एकचे कार्यालयत सताड बंद असल्याने कार्यालयीन कामकाज सध्या जयंत सरोदे यांच्याकडेच दिले असल्याची शक्यता आहे. काही दिवस फड रजेवर जाणार आणि काही दिवस सरोदे रजेवर जाणार. पण बांधकामाचे निर्णय मात्र मिलिभगत करूनच करणार यात शंकाच राहीली नाही. 

पुणे महापालिका आयुक्त आणि शहर अभियंत्याला कामच करू देत नाहीत

            सध्या नगरसेवक व अधिकारी बिल्डर व ठेकेदार झाल्यामुळे कोणत्या पदावर कोण बसणार याचे निर्णय महापालिका आयुक्त किंवा शहर अभियंता हे कार्यालय घेतच नाही. ह्याचे सर्व निर्णय मुंबईतून येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णयावर काम करतांना चांगला स्टाफ मिळत नाही. कायम दडपणाखाली काम करावे लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बांधकाम विकास विभाग आणि पथ विभाग विभागासाठी अधिकार्‍यांची लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळाली असून, शहर अभियंता यांना कामच करू दयायचे नाही असा चंग काहींनी बांधला असल्याचेही समजुन आले आहे.

बालवेंची बदली अन् रासकरांना मंगळ

            बांधकाम विभागात घातलेल्या महागोंधळामुळे पुणे पालिकेत सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे प्रताप बालवे यांची बदली करून, या प्रकरणांवर पडदा टाकण्याचे काम काहींनी केले असले तरी विक्रांत रासकरांना मात्र खराडीत ठेवण्यात आले आहे.             खराडी- रासकर आणि सरवदे यांच्या युतीमुळे दुधात साखर पडली असली तरी मंगळामुळे दुधात मिठाचा खडा पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.बालवे आणि रासकरांवर कारवाईची सर्व भिस्त आता विलास फड यांच्यावर आहे. त्यामुळे फड वा सरवदे यांनी तातडीने निर्णय घेवून बालवे रासकरांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी होत आहे.