Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कनिष्ठांनी अभियंत्यांनी शेण खायचं,अंगलट आलं की, वरीष्ठ अधिकारी व कार्यालयावर गोवर्या थापायच्या. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात अस्सं हे किती दिवस चालायचं.


PMC-Marketyard-Pune

पाटलानं केलाय मार्केटयार्डगुलटेकडीत शेणकाला,म्हणतोय कसा, हीच माझ्या कामाची कला,

पुणे/दि/ प्रतिनिधी/

    ७/१२, प्रॉपर्टी कार्ड सारख्या बनावट दस्तएैवजांच्या आधारे बांधकाम परवाना मिळविण्यांची संख्या शेकडोंनी वाढली आहे. परंतू पुणे महानगरपालिकेत दाखल दस्तऐवजांची खातरजामा करण्याची कोणतीही तरतूद वा व्यवस्था नाही. कागदपत्रे  खरी आहेत की, खोटी आहेत, हे तपासण्याची कोणतीही तरतूद नाही, ती सर्व जबाबदारी शासनाची आहे असल्याचे सांगून पुणे महापालिका बांधकाम विभागा स्वतःवरील जबाबदारी झटकुन देत आहे. पुणे महापालिकेत सध्या बनावटगिरीने अक्षरशः थैमान घातले आहे.

    दरम्यान पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंते हे अनाधिकृत बांधकामे निर्मूूलनाचे पदनिर्देशित अधिकारी असतांना देखील शासनाच्या आदेशान्वये कारवाई केल्याचे बनावट पुरावे सादर करून, शासन व पुणे महापालिकेची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. काही बांधकाम विभागात तोंडदेखलेपणाची थातूर मातूर कारवाई होत असली तरी बांधकाम विकास विभाग झोन ५ मध्ये तोतयागिरीने कळस गाठला आहे.

कनिष्ठांनी अभियंत्यांनी शेण खायचं,अंगलट आलं की,

Senior-Engineer-PMC

वरीष्ठ अधिकारी कार्यालयावर गोवर्या थापायच्या.

    बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ मधील गुलटेकडी मार्केटयार्डचे कनिष्ठ अभियंता विशाल पाटील यांना सर्वसामान्य नागरीक व कार्यकर्त्यांच्या अंगावर फस्सकन् मांजरीसारखं धावून जाण्याची भलतीच सवय जडली आहे. पाटलाला अजून सज्जड कार्यकर्ताच भेटला नाही. त्यामुळेच या पाटलाचं एवढं फावलय की, लायजेनिंग एजंट,बिल्डर आणि बिल्डरांचे एजंट पाठीवर व बगलेत फाईल मारून आलेल्यांना ए प्लस वागणूक दिली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना डी-प्लस वाणूक तर बिल्डर एजंटांना ए- प्लस वागणूक ही पाटलाची ओळख बनली आहे.

हर्षदा शिंदेना देखील कुणी भिक घालित नाहीत –

    बांधकाम विकास विभागात हर्षदा शिंदे या कार्यकारी अभियंता वा कार्यालय प्रमुख कार्यरत आहेत. कार्यालयीन कामकाजाबाबत अनेकविध मंडळी हर्षदा शिंदे यांना भेटत असतात. प्रकरणांच्या माहितीसाठी कार्यालयातील त्या त्या विभागांच्या प्रमुखांकडून माहिती करून घेण्यासाठी त्यांना बेल दाबुन बोलाविल्यानंतर, संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. जागेवर असतांना देखील, नसल्याचे सांगण्यात येते. कधी हर्षदा शिंदे यांच्या कार्यालयात अधिकारी- कर्मचारी गेलेच, तर सरळ उत्तरे देत नाहीत. हर्षदा शिंदे ह्या कार्यकारी अभियंता आहेत, हे कनिष्ठ अधिकारी विसरून जातात. एखाद्या वर्ग ४ च्या कर्मचार्‍याला उत्तरे दिल्यासारखी उत्तरे हर्षदा शिंदे यांना दिली जात असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यापैकीच विशाल पाटील नामक कर्मचारी आहे.


PMC-Marketyard-Pune

होय, हीच आमच्या कामाची पद्धत

    बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ मधील कनिष्ठ अभियंते, विशाल पाटील, सौ. राखी चौधरी आणि संतोष शिदे यांना पदाचा आणि खुर्चीचा एवढा कॉन्फीडन्स आलाय की, समोर आलेल्या पुणेकर नागरीकांना त्यांच्या क्रुर वागणूकीतून, त्यांच्या कार्याची शैली दाखवुन देत असतात. त्यापैकी विशाल पाटलाला तर एवढा अहंकार बळावला आहे की, ते कनिष्ठ अभियंता नसून कार्यकारी अभियंता असल्याचा त्याच्यातून दर्प येत असतो.

    काल परवा, बहुजन समाज पार्टीचे गुलटेकडी, मार्केटयार्डातील काही नेते पदाधिकारी आले होते. त्यांनी मार्केटयार्डातील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणाची तक्रार मागील दोन महिन्यांपूर्वी केली होती. श्री. पाटील यांना तक्रार अर्जावर नेमकी कोणती कारवाई केली असे तोंडी विचारले असता, आम्ही सतत कारवाई करीत असतो. तुम्हाला पाहिजे असेल तर आमचे रेकॉर्ड पहा. अशी उत्तरे देण्यात येतात. तसेच अतिक्रमण उपायुक्तांना पाठविलेल्या पत्रांचा देखील ते आवर्जून उल्लेख करतात.

    दरम्यान मागील पाच वर्षात एकदाही कारवाई झालीच नसल्याचे, अधिकार्‍यांना सांगण्यात आल्यानंतर, पिसाळलेल्या मांजरीसारखे फस्स्क्कन अंगावर धावुन जाण्याची पद्धत रूढ केली आहे. तुम्ही कामे करीत नाहीत, कारवाई केल्याची खोटी माहिती देत आहात, तसेच हीच तुमच्या कामाची पद्धत आहे काय अशी विचारणा केल्यानंतर, हेच कनिष्ठ अभियंता श्री. पाटील सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावर धावुन, म्हणतात कसे होय, हीच आमच्या कामाची पद्धत आहे. तुम्हाला काय विचारायचे आहे ते आमच्या वरीष्ठांना विचारा असे सांगतात. हर्षदा शिंदे ह्या कार्यालयात असून खोळंबा आणि नसून ओळंबा आहेत. कार्यालयात हजर असल्या तरी विषयाची माहिती करून न घेताच, कनिष्ठांच्या तळी उचलण्याचे काम करतात.  कार्यवाही आणि कारवाईच्या नावाने शिमगा आहे. भल्या मोठ्या दुकानदार व भांडवलदारांकडून मिळालेल्या थैलीच्या बळावर कार्यकर्त्यांच्या अंगावर जाण्याच्या या पद्धतीविरूद्ध बहुजन समाज पार्टीने सध्या शड्डू ठोकला आहे. कारवाईचे कागदी घोडे नाचविण्यात पाटील एकद्म सैराट झालेयेत.

उपायुक्त माधव जगताप आणि बांधकाम विभागातील कारस्थाने

    पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामे निर्मूलन विभगााचे उपायुक्त म्हणून मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. एका विभागाची योग्य ती जबाबदारी ज्याला सांभाळता येत नाही, त्या माधव जगतापांना पुणे महापालिकेने दोन-दोन/तीन विभागांचा प्रभारी पदभार देण्यात आलेला होता. माधव जगताप म्हणजे पुणे महापालिकेतील सैराटकार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या कामकाजावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. महिला कर्मचारी व त्यांच्याकडे काम घेवून आलेल्या महिलांची तर माधव जगताप यांच्याबाबत अनेकविध खराब मते आहेत. अशा प्रकारच्या लिंगपिसाटाकडे महत्वाची जबाबदारी का देण्यात येत आहे असा अनेकांना प्रश्‍न पडला आहे.

१. कारवाईचा बडगा गरीबांवर, धनदांडग्यांवर मात्र मेहेरनजर –

    पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व अनाधिकृत बांधकामांचे उपायुक्त पदावर माधव जगताप हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामे करणार्‍या व घरगुती व व्यावसायिक इमारतींच्या बाहेर व रस्त्यापर्यंत अतिक्रमण करणार्‍या धनदांडग्यांना अभय देण्याचं माधव जगतापांच धोरण आहे. तर पथारी व्यावसायिक, कामगार कष्टकर्‍यांवर मात्र कायदयाचा बडगा उगारून त्यांचे निर्मूलन करण्याचा घाटही माधव जगतापांची उचलला असल्याचे त्यांच्या कार्यकर्तूत्वावर दिसून येत आहे.

माधवराव हे पहा

    ठिकाण – मार्केटयार्ड, काम – हाताने ऊसाचे गुर्‍हाळ, व्यक्ती – गावागावातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी वर्ग.

    शेतात काही पिकत नाही. पाणी नाही, नोकरी नाही. कुटूंबात दोन कच्ची-बच्ची सांभाळायची आहेत. मग हातावर हात धरून बसता तरी येणार नाहीये. मग काय करायचे. अनेक पर्याय आहेत. १. शेतीसाठीची विषारी औषधे पिऊन जिवनयात्रा संपविणे २. शेतातील झाडावर बैलाच्या कासर्‍याने गळफास घेणे ३. घरदार सोडून शहरात जाणे.

    विष पिऊन, गळफास घेवून शेतकर्‍यांच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग तत्करला. ते शहरात आले. काबाडकष्ट सुरू केले. दोन पैसे जोडून ऊसाच्या गुर्‍हाळाची हातगाडी घेतली. बायका-मुले त्या लाकडाच्या ऊसाचे गुर्‍हाळ अंगातून धामांच्या धारा आणि अंग फाटेपर्यंत काम करून, दिवसाला शंभर दोनशे रूपये कमावू लागले. अगदी हेच माधव जगतापांना नको आहे. त्यामुळे त्यांनी या कष्टकर्‍यांवर नांगर फिरविण्याचे आदेश दिले. गाड्या जप्त केल्या. पाच दहा हजार रुपयांचा दंड केला. त्यांच्या गाड्या सोडून दिल्या. अन् त्यांना हुसकावून लावले. पण ते जाणार तरी कुठं… पुन्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. माधवराव म्हणत असतील तर शेतकरी शेतमजुरांनी पर्याय १ व २ निवडावा काय…

    परंतु महत्वाची बाब अशी की याच मार्केटयार्ड रोडवर बालाजी टे्रडर्स, बालाजी टे्रडिंग कंपनी, हॉटेल मिसळ, या सरळ रांगेत अनेक मोठ्या दुकानदारांनी त्यांची दुकाने भर रस्त्यात थाटली आहेत. त्यांच्यावर मात्र कुठेच कारवाई होत नाही. बरोबर आहे. गोरगरीब कष्टकरी माधव जगताप व त्यांच्या कर्मचार्‍यांना काय देणार… १ ग्लास ऊसाचा रस, मोठे दुकानदार मात्र मोठ्ठंच पाकीट देणार. त्यामुळे एक ऊसाच्या रसाऐवजी मोठ्ठ पाकीट केंव्हाही उत्तमच की. मग होऊ दया कारवाई अस्सं हे धोरण आहे.

    दिवसाला दोन-पाचशे रुपये कमाविणार्‍या, हातावर पोट असणार्‍यांवर जबरी कारवाई केली जाते. परंतु दिवसभरात ज्यांच्या गल्ला ५० हजारापासून ५ लाख रुपयांपर्यंत होतो. त्यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. गरीबांनी पोटासाठी टिचभर जागेवर केलेले अतिक्रमण हे अतिक्रमण आणि गब्बर श्रीमंतांनी हातभर केलेले अतिक्रमण हे अतिक्रमण नाहीच. ऊसाच्या हातगाडी गुर्‍हांळावर कारवाई करून, गरजु पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून, नेमका कोणता तीर माधव जगताप मारत आहेत. खरं तर आजचा विषय नाही. पुढे पाहणारच आहोत. परंतु अनाधिकृत बांधकाम प्रकरणी देखील माधव जगताप मूग गिळून वा मिठाची गुळणी भरून नेमके का आहेत असा प्रश्‍न सद्या उपस्थित होत आहे.

अनाधिकृत बांधकामांवर करण्यात आलेल्या कारवाईची तपासणी नेमकी कशी केली जाते

    अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निदेश बांधकाम विकास विभागांना आहेत. संबंधित विभागांनी कारवाई केल्यानंतर त्याचा अहवाल उपायुक्त अतिक्रपण यांचेकडे पाठविला जातो. बांधकाम विभागाने केलेल्या कारवाईनुसार वा पाठविण्यात आलेला अहवालातील माहिती खरी आहे की, बनावट याची खातरजमा केली जाते काय, खातरजामा केली तर कोण करतय, कारवाई झाली नाही आणि कारवाई केल्याची बनावट माहिती समोर आली तर अभियंत्याविरूद्ध नक्की कोणती व कोण कारवाई करणार हे महत्वाचे प्रश्‍न आहेत.

    बांधकाम विकास विभागातील झोन ५ मधील कनिष्ठ अभियंता विशाल पाटील व रेखा चौधरी यांनी ज्या  बनावट कारवाईचे दस्तऐवज उपायुक्त अतिक्रमण विभागांना पाठविले आहेत. त्यांची चौकशी नेमकंपणाने कोण करणार आहे हा एक प्रश्‍नच आहे. बांधकाम विकास विभागातील झोन पाच मधील विशाल पाटील हे एक मैदयाच पोत असल्याचे बोललं जातं. कारवाई काहीच नाही पण फस्स्कन अंगावर धावून जाणं ही त्याच्या कामाची पद्धत आहे. पुढील एक दीड महिन्यात या मैदयाच्या पोत्यानं काय काय केलं हे आपण पाहणार आहोतच. तुर्तात इतकच.

पुढील अंकात –

१. विशाल पाटील नावांच मैदयाच पोतं, कसं करतय बघा उकडीच्या पुर्‍या. कसं काय पाटील बरं हाय का… मार्केटयार्डात जे बघितलं ते खरं हाय का…

२. मचाले की मसाले, फीर पीएमसीमे धूम मचाले….