Sunday, January 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी राजीव ...
माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

राजकीय
नॅशनल फोरम/सोलापुर (माळशिरस)/ दि/ प्रतिनिधी/माढा लोकसभा मतदारसंघात कायमस्वरूपी घराणेशाहीचे राज्य आहे. प्रस्थापित शक्तींच्या हातात कायमस्वरूपी सत्ता असल्याने त्यांना जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे माढ्यातून कायमस्वरूपी घराणेशाही संपवुन आता लोकशाहीतील मूल्यांनुसार, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी ह्या सुत्रानुसार माढ्यात आता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांचा देखील मोठा असंतोष पहायला मिळत असून, माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवानी यावेळी, माढ्यातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तरच मतदान करणार अन्यथा मतदान करणार नसल्याचीही भूमिका जाहीर केली आहे. यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष पारंपारीक घराणेशाहीला...
बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, “जर पक्षांनी देशापेक्षा महत्वाचा पंथ ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशा पेक्षा जास्त पंथा ला महत्वाचं मानणाऱ्या ” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्री माई, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी पत्रावर सही केली....
राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असल्याची माहिती प्रबुद्ध भारतने प्रसारित केली आहे. प्रबुद्ध भारतच्या वृत्तात नमूद केले आहे की, आमच्या सुत्रानुसार हे निमंत्रण फक्त ‘भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल असेही त्या वृत्तात नमूद केले आहे....
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

राजकीय
धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून ते लवकरच शिंदेना रामराम ठोकुन राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजते. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून माहिती समोर येत आहे. कोण आहेत हे सचिन जोरे -ॲड.सचिन जोरे हे माजी न्यायाधीश असून, एमपीएसी मध्ये राज्यात प्रथम आले आहेत. टॉपर असलेले श्री. जोरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीकडून इंदापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सत्ताधारी भाजपा व काँग्रेसच्या उमेदवाराच्या तोडीची मते...
जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, चलो मुंबईचा दिला नारा

जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, चलो मुंबईचा दिला नारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गेले काही महिन्यापासून मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज रंगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी अन्न, पाणी त्याग करत उपोषणासाठी बसले होते. दरम्यान त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठी चार्ज ही करण्यात आला होता. यांनतर सरकारकडून आरक्षण देण्यासाठी वेळ मागीतला होता परंतू अध्याप आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. राज्यातील मराठा समाजांनी एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी लावून धरली यावेळी राज्यात अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर सभा घेण्यात आल्या, या सभेला लाखोंचा जनसमुदाय होता. आज बीड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला होता. मात्र, “सरकार अनेक वेळा तारीख पे तारीख देत आहे. वेळ काढून पणा करत ...
बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र ! मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र ! मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी 48 जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जा...
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये -सिद्धार्थ मोकळे

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये -सिद्धार्थ मोकळे

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही? याबाबत उलटसुलट विधाने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याला मी राजकिय भडवेगीरी म्हणतो. ती राजकीय भडवेगीरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे, असा घणाघाती पलटवार वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला. आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजनांचा मोठा समूह घेऊन व्यवस्थेने नाकारलेल्या, सत्तेच्या बाहेर फेकलेल्यांचा एकत्रित पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणात आणतात आणि सत्तेकडे कूच करतात. समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिंमतीने, ताकदीने, थ...
बाळासाहेब आंबेडकर म्हणतात…

बाळासाहेब आंबेडकर म्हणतात…

राजकीय
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जम्मु काश्मिर चे 370 कलम व संसद भवनात घुसणाऱ्यांबाबत महत्वाचे विधान केले आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे केवळ एक पक्षाचे अध्यक्ष असले तरी सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक चळवळीशी ते अग्रणी व अपरिहार्य असलेले नेते आहेत. घटनाकारांचे नातू तर आहेतच, परंतु घटनेबाबत केंद्र शासन किंवा न्यायालयाकडून काही मते व निर्णय घेतल्यानंतर, त्याबाबतची वस्तुस्थिती ते जनतेसमोर मांडत आहेत. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नांवर ते सातत्याने बाजु मांडत असतात. जम्मु काश्मिरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मत कसे चुकीचे व दुरगामी परिणाम करणारे आहे याबाबत त्यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच संसद भवनात घुसणाऱ्या बेरोजगार तरूणांना माफी देवून हा विषय संपवून टाकावा असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारा घटनेत...
“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाह...