Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

नॅशनल फोरम/सोलापुर (माळशिरस)/ दि/ प्रतिनिधी/
माढा लोकसभा मतदारसंघात कायमस्वरूपी घराणेशाहीचे राज्य आहे. प्रस्थापित शक्तींच्या हातात कायमस्वरूपी सत्ता असल्याने त्यांना जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे माढ्यातून कायमस्वरूपी घराणेशाही संपवुन आता लोकशाहीतील मूल्यांनुसार, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी ह्या सुत्रानुसार माढ्यात आता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांचा देखील मोठा असंतोष पहायला मिळत असून, माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवानी यावेळी, माढ्यातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तरच मतदान करणार अन्यथा मतदान करणार नसल्याचीही भूमिका जाहीर केली आहे. यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष पारंपारीक घराणेशाहीला उमेदवारी देणार की, ओबीसी समाजाला न्याय देणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

ॲड. जोरे यांचा माढ्यात धावता संपर्क-
दरम्यान 2019 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले व इंदापुर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांची मते मिळविलेले ॲड. सचिन जोरे हे देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे सातत्याने जनसंपर्क कार्यक्रम होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मतदान माझा अधिकार आणि मी मतदान करणारच या अभियानांतर्गत ॲड. सचिन जोरे यांचे मतदारसंघात जनजागृती अभियान सुरू आहे. या जनजागृती अभियानांतर्गत त्यांचा गावागावात संपर्क वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एका माळशिसर तालुक्यात अभियान सुरू असतांनाच, फोंडशिरस या गावातील एका मस्जिद मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता. याच वेळी मुस्लिम समाजातील सर्वाधिक वयोवृद्ध असलेले खाजी खान उर्फ बापू मणेरी यांचा आजच 91 वा वाढदिवस असल्याने, ॲड. जोरे यांनी श्री. बापू मणेरी यांचा सत्कार केला. तसेच मुस्लिम समाजाशी संवाद साधला.   

ॲड. जोरे यांच्यापुढे नागरीकांनी वाचला समस्यांचा पाढा-
यावेळी अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी त्यांच्या समस्या ॲड. सचिन जोरे यांच्या समोर मांडल्या. आम्ही आमच्या समस्या घेवून खासदार साहेबांकडे गेल्यानंतर, खासदार आम्हाला भेटत नाहीत. अनेकदा जावूनही भेटी होत नाहीत. आमच्या अनेक समस्या आहेत, परंतु आमच्या समस्यांकडे कुणीच लक्ष देत नसल्याची खंत देखील यावेळी मुस्लिम समाजने व्यक्त केली. त्यामुळे यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात आमच्यातील ओबीसी समाजाचा प्रतिनिधी निवडणूकीला उभा राहिला पाहिजे, मुस्लिम समाज त्याच्या पाठीशी उभा राहिल याचीही ग्वाही यावेळी देण्यात आली. ॲड. सचिन जोरे हे उच्चशिक्षित असून, त्यांनी काही वर्ष न्यायाधिश म्हणून देखील काम केले आहे. ते स्वतःच धनगर समाजातील असल्याने त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी खाजा खान उर्फ बापू मणेरी यांनी देखील हिंदू- मुस्लिम ऐक्य असले पाहिजे अशी भूमिका मांडली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. जोरे यांनी देखील नमूद केले की, बापू मणेरी यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. 

फोंडशिरस येथील बैठकीत मुस्लिम जमातचे अध्यक्ष बशीर मुलांनी, इनुस मुलानी, जमीर मुलानी, असलम मुलानी, राजू कबीर, अन्वर मनेरी, अरुण मनेरी,  इरफान शेख, साहिल मुलाने, सोनू नदाब, स्माईल मनेरी, अल्ताफ मनेरी, मगन मुलानी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.