बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी
unligal mandir pmc
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुण्यातील बहुतांश सर्व पेठांमध्ये भगवान शंकर, गणपती व मारूतीची अनेक मंदिर आहेत. सोमवार मंगळवार कसब्यात तर जागोजाग शिवमंदिर शिवलिंग आहेत. त्यातील काही समाधीस्थळ आहेत. मारूतीची तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत. गणपतीसह विविध देवी देवतांची मंदिर आहेत. जुन्या काळातील मस्जिद व दर्गा आहेत. परंतु १९९० नंतर जागतिकीकरणानंतर देवी देवतांचे अधिक महत्व वाढले. त्यामुळे पुण्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिर - मस्जिदची संख्या पाच हजार पटींनी वाढली. पुण्यातील सोमवार, मंगळवार व रास्तापेठेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या धंद्यासाठी रस्त्यावरच साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज व गणपतीची मंदिर उभी करण्यात आली. पुण्यातील ५०० ते ६०० झोपडपट्यांमध्ये तर एका एका गल्ली बोळात विविध देवी देवतांची मंदिर, मस्जिद व इतर धर्मियांची प्...









