पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सोंगाड्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे? नुतन अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण सोंगाड्यांना साथ देणार की लाथ देणार?
pwd pune
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सोंगाड्यांचा कट्टा झाला आहे. अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून मागील १५ वर्षांपासून वर्ग ३ मधील कर्मचार्यांचे पाच पाच वेळा बदली आदेश येवून देखील जुनं कार्यालय सोडून नवीन कार्यालयात संसार करायला तयार नाहीत. काही ना काही बहाणा करून बदली टाळण्याच्या त्यांच्या कहाण्या ऐकल्या तर दादा कोंडकेंची आठवण झालीच म्हणून समजा. शासकीय मध्यवर्ती इमारतीतील सा.बां. पुणे विभागातून पूर्व विभागात, दक्षिण विभागात बदली झाल्यानंतर, माझ्या पोटात दुखतय, मला डायबेटीस आहे, सध्या निवडणूक कामे आहेत, परिक्षेसाठी नियुक्त केले आहे, सध्या कोरोना आहे, अशी सबब सांगुन बदली टाळली जाते. परंतु ह्या बदल्या मुळातच एकाच आवारात करण्यात आलेल्या आहेत, जिल्हास्तर किंवा तालुका स्तरावर बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. परंतु शिमग्याला जशी सांग आणतात तशी सोंग आज पुण्याच्या सा...









