पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील लोकसेवक ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, श्रीधर येवलेकरांचा जुजबी प्रवास.
pmc pune yewalkar
छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील आणाजी पंत सुरनीस आणि पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे श्रीधरपंत येवलेकर
थोडक्यात.............
ते आणाजी पंत आणि हे श्रीधरपंत, दोघात नेमकं साम्य आहे काय...?
पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महापालिका आणि राज्य शासनाचं प्रचंड आर्थिक नुकसान करायच. पुणे महापालिकेच्या नागरी सुविधांवर प्रचंड ताण आणायचा. प्रसंगी नगरसेवकांनाही हाताशी धरायचं, विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांना यामध्ये नाहक गुंतवून ठेवायचं. आणि मुठभर भांडवलदारांचा आर्थिक फायदा करून दयायचा व त्यायोगे स्वतःचाही आर्थिक फायदा करून घ्यायचा हे सुत्र भयंकर आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या पदांचा आणि अधिकारांचा एवढा वापर पुणे महापालिकेच्या इतिहासात कधीचा झाला नव्हता. त्याचा हा इतिहास पुणेकरांपुढे सादर करीत आहोत.
काही लोकांना सांगुन पैसे खाण्याची सवय असते,...









