Tuesday, May 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात पार्कींगच्या नावाखाली भुसार विभागातील ट्रकचालक-व्यापार्‍यांची दुहेरी- तिहेरी लुट

छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात पार्कींगच्या नावाखाली भुसार विभागातील ट्रकचालक-व्यापार्‍यांची दुहेरी- तिहेरी लुट

सर्व साधारण
APMC Market Pune पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करारावरील कंत्राटी नोकरदाराकडे प्रशासकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंत्राटी नोकरदार म्हणून नोकरी मिळविण्यापूर्वी हेच कंत्राटी नोकरदार शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. परंतु सेवानिवृत्तीनंतर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासनाकडे एकही अनुभवी कर्मचारी नसल्यामुळे म्हणा किंवा सेवानिवृत्त कर्मचार्‍याची सर्वांगसेवा सर्वांना आवडली असल्यामुळे म्हणा, संबंधितावर बाजारात धोरणात्मक निर्णय वगळता कंत्राटी कामगारासारखे काम करण्याची अनुमती शासनाने दिली आहे. कंत्राटी प्रशासकीचा पगार मात्र बाजार समिती पुणे हीच देत आहे. परंतु पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ह्याच कंत्राटी नोकरदाराचा इतका दबाव आहे की, त्यांच्या दबावापुढे कुणालाही कामच करता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. नव्हे अनेकांनी आमच्या बातमीदारापुढे भावना...
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने मराठी बेरोजगार व लहान शेतकर्‍यांना देशोधडीला लावले

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने मराठी बेरोजगार व लहान शेतकर्‍यांना देशोधडीला लावले

सर्व साधारण
APMC Market Pune नियमांच्या अधिन राहून, राऊत बाईसाहेबांचा थाटच मोठा, देणार्‍याचं चांगभल, न देणार्‍याचा बाजार उठविला पुणे/दि/ रिजवान अली शेख/लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशातील उद्योग व्यवसाय बंद आहेत. मोठे उदयोग बंद असल्यामुळे साहजिकच लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग धंदे बंद आहेत. बहुतांश जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. थोडक्यात उद्योग धंदे बंद पडल्याने नोकर्‍या गेल्या, शासकीय उदासिनता आणि बँकांच्या आडमुठे धोरणामुळे रोजगारही गेला. आता जगायचं कस हा प्रश्‍न राज्यातील सर्वच नागरीकांपुढे पडला आहे. त्यामुळे आपले व आपल्या कुटूंबियांचे पोट भरण्यासाठी नागरीक वाट्टेल तो धंदा करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सध्याची अवस्था अशी झाली आहे की, कुटूंबिय मरू देत नाहीत आणि मायबाप सरकार जगु देत नाहीत अशी आजची अवस्था झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिनस्थ असलेले बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालया...
हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा – बाळासाहेब आंबेडकर

हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा – बाळासाहेब आंबेडकर

सर्व साधारण
मुंबई/दि/प्रतिनिधी/ आरएसएस भाजपावाले विरोधकांना ऐनकेनप्रकारे घाबरवतात. देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालिन सरकारने आणि केंद्रातील सरकारने मलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकथित खूनाच्या कटात अडकाविण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात काहीच त्यांना मिळाले नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवा असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेसवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भाजपा, आरएसएस देशात अराजकता माजवित आहे. हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात आहे. कूंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी त...
सा.बां. पुणे विभागातील कार्यमुक्ततेचा दहावा …. आतारी शासनाला कळवा

सा.बां. पुणे विभागातील कार्यमुक्ततेचा दहावा …. आतारी शासनाला कळवा

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ सा.बां. उपविभाग क्र. १ तद्नंतर २ ते थेट ३ व ५ आणि ससुन या पाच उवविभगाचं डोळ्यात न मावणारं स्थापत्य तंत्राशी जुलळेलं सा.बं. पुणे विभागाचं पवित्र कार्यक्षेत्र (पवित्र म्हणूया का…. नाहीतर एखादा फारच तोंड वंगाडून बाष्कळ खिल्ली उडवायचा. तुमचा तिसरा मजला रिकामाच राहिला. मग तुम्हाला सा.बां. पुणे डिव्हीजन कळलेच नाही.) हळु हळु उमगेल तेंव्हा उमगेल. पापभिरू व्यक्तीला सारच पवित्र भासते. वास्तवात या पाच उवविभगांवर हक्क सांगणारा सा.बां. पुणे विभाग म्हणजे उपविभागांची जीवन रेखाच म्हटलं पाहिजे (म्हणावं लागेल का…) शाखा ते उपविभाग, उपविभाग ते थेट विभागात कार्यरत असणार्‍यांची आस्पिना ही सा.बां. मंडळ पुणेकडे जुळलेल्या तत्पुर्वी सा.बां. पुणे विभगााच्या आस्थपनेच्या नमनाला घडाभर तेल आहेच. सा.बां. पुणे विभागातील वेतनधारित भक्तांचे अनेक अर्थाने कागदावर नाचणारे अपराध पोटात घे...
पुणे महापालिकेचं जेवढं आर्थिक नुकसान करता येईल तितकं करण्याचा बिल्डर व अभियंत्याचा सपाटा

पुणे महापालिकेचं जेवढं आर्थिक नुकसान करता येईल तितकं करण्याचा बिल्डर व अभियंत्याचा सपाटा

सर्व साधारण
pmc loss money पुणे/दि/ प्रतिनिधी/ पिसाळलेलं कुत्र जसं रस्त्यार जाणार्‍या-येणार्‍यांना चावा काढते, लचके तोडते, मोठ्याने गुरगुरते अगदी तस्संच पुणे महापालिकेतील काही अभियंत्यांचे व अधिकार्‍यांचे झाले आहे. पुणे महापालिकेचे लचके तोडण्यासाठी बाहेरचे कमी पण आतलेच अधिक वाढले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून, विकास कामांना कात्री लागत आहे. त्यात पुणे महापालिकेचे विश्‍वस्त सातत्याने नियोजित व मान्य अंदाजपत्रकाची ओढा-तोडी करीत असून, वर्गीकरणातून निधीची पळवा पळवी सुरू आहे. पुणे महापालिकेतील खराडी परिसर हा सध्या आय टी हब झाला आहे. त्यामुळे या भागात अनेक अनाधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. काही ठिकाणी तर अधिकृत मान्यता घेवून, जागेवर दुसर्‍याचे प्रकारचे मनमानी बांधकाम सुरू आहे. तथापी अभियंता मंडळी मात्र या प्रश्‍नाकडे गांभिर्यान पाहत नाहीत, यामागे महापालिकेचे लचके तोडणार्‍यांच...
पुण्यातील पर्यावरणाचा विनाश करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाची मुजोरी, १ कोटी ५८ लाख रुपये + २०१६ पासूनचे व्याज भरण्यात टाळाटाळ

पुण्यातील पर्यावरणाचा विनाश करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाची मुजोरी, १ कोटी ५८ लाख रुपये + २०१६ पासूनचे व्याज भरण्यात टाळाटाळ

सर्व साधारण
न्यायालयाने ठोठावला होता २०० कोटीचा दंड महापालिकेलाही यांच्यामुळे बसला होता ५ लाखाचा दंड पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पातुन पुणे महापालिकेला बांधकामाचे डेव्हलपमेंट चार्जेस प्राप्त होत असतात. या विकास शुल्कातूनच पुणे शहरातील नागरी सुविधा निर्माण व पुरविल्या जातात. तथापी वडगाव बु॥ येथील स.नं. ३५ ते ४० येथील बांधकाम व्यावसायिकाने पुणे महापालिकेचे एकुण १ कोटी ५८ लाख ३७ हजार ७७५ रुपयांचे विकास शुल्क व त्यावरील व्याज थकविले असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान याच बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील पर्यावरणाचा विनाश केल्या कारणाने न्यायालयाने सुमारे २०० कोटीचा दंड ठोठावला आहे व या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याबद्दल पुणे महापालिकेला देखील सुमारे ५ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाने वडगाव बु. येथील बांधकाम प्रकल्पाचे नि...
कोंढवा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याने पोसलेल्या सांडांची पुणे महापालिकेत झुंडशाही

कोंढवा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याने पोसलेल्या सांडांची पुणे महापालिकेत झुंडशाही

सर्व साधारण
अगरवाल व हुसेन पठाण या बेकायदा बांधकामाच्या टोळीविरोधात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली महापालिका आयुक्त व शहर अभियंता कार्यालयाच्या कुंभकर्ण झोपेमुळे पुण्यातील पेठांचे उध्वस्तीकरण पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावानं पोलीस आयुक्तालयात दिवस-रात्र धोसरा काढला जातो. गुन्हेगारांवर नियंत्रण, गैरवाजवी वाहतुकीवर सनियंत्रण ही तर पोलीस ड्युटी तक्त्यावर नियमित छापलेलं ब्रिदवाक्यच. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, पोलीसांची ना गुन्हेगारांवर पाळत, ना वाहतुकीवर नियंत्रण अशी आजची अवस्था पुणे शहर पोलीसांची झाली आहे. नागरीक व संघटनांकडून एखाद्या गुन्हेगाराबाबत तक्रार अर्ज आल्यास, त्यावर कार्यवाही केली जातच नाही. एका पोलीस स्टेशन मधुन दुसर्‍या पोलीस ठाण्यात व दुसर्‍या पोलीस ठाण्यातून पहिल्या पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाचा प्रवास सुरू असतो. महिलांची स...
लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांचे ऑडीट अर्थात लेखापरीक्षण केले जाते. ज्या खात्यांनी पुणे महापालिकेचे हित लक्षात न धेता विशिष्ठ वर्गाला अधिकचा लाभ देवून, पुणे महापालिकेचे नुकसान केले, त्या बाबतचे आक्षेप नोंदवून त्या रकमा संबधित खात्याने वसुल करण्याबाबतचे निदेश दिले जातात. ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कोट्यवधी रुपयांचे येणे आहे, त्या रकमा बांधकाम विभागासह अन्य विभागांनी वसुल केलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. अनाधिकृत बांधकामाबाबत मागील १५ वर्षांपासून उच्च न्यायालय, राज्य शासनाने वेगवेगळ्या आदेशांव्दारे कारवाईचे आदेश दिले आहेत. तथापी त्याची अंमलबजावणी देखील बांधकाम विभागाकडुन केली जात नाही. नागरीकांनी तक्रारी नोंदविल्यानंतर निव्वळ नोटीसा देण्याचे काम केले जाते, परंतु कारवाई केली जात नाही. महापालिका आयुक्त कार्यालय व शहर अभियंता कार्यालयास दर मंग...
बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

सर्व साधारण
unligal mandir pmc पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुण्यातील बहुतांश सर्व पेठांमध्ये भगवान शंकर, गणपती व मारूतीची अनेक मंदिर आहेत. सोमवार मंगळवार कसब्यात तर जागोजाग शिवमंदिर शिवलिंग आहेत. त्यातील काही समाधीस्थळ आहेत. मारूतीची तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत. गणपतीसह विविध देवी देवतांची मंदिर आहेत. जुन्या काळातील मस्जिद व दर्गा आहेत. परंतु १९९० नंतर जागतिकीकरणानंतर देवी देवतांचे अधिक महत्व वाढले. त्यामुळे पुण्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिर - मस्जिदची संख्या पाच हजार पटींनी वाढली. पुण्यातील सोमवार, मंगळवार व रास्तापेठेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या धंद्यासाठी रस्त्यावरच साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज व गणपतीची मंदिर उभी करण्यात आली. पुण्यातील ५०० ते ६०० झोपडपट्यांमध्ये तर एका एका गल्ली बोळात विविध देवी देवतांची मंदिर, मस्जिद व इतर धर्मियांची प...
बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणं शहर हे मूळातच एक सुंदर शहर आहे. एकापेक्षा एक वेगवेगळे वाडे आणि त्यांची रचना, वेगवेगळी आखिव- रेखिव मंदिर, वेगवेगळे दर्गा आणि मस्जिद, चर्च ह्यांची देखील एक सुंदर रचना आहे. प्रत्येक वाड्यात आखिव- रेखीव सुंदर पाण्याच्या विहीरी आहेत. मुळा मुठा नदीवर एक राजा महाराजांची वेगवेगळी बघण्यासारखी समाधीस्थळ आहेत. रस्त्यांची सुबक रचना. तसेच बाजारपेठांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पुणं शहर भलं मोठ्ठं झालं तरी मंडई, लक्ष्मी रोड वर आल्याशिवाय पुणेकरांचा एक दिवसही जात नाही. निदान सणावाराला तरी पुणेकर ह्या रस्त्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पुण्याची मुहूर्तमेढ सोन्याचा नांगर फिरवुन, पुनवडीला पुण्यनगरीचं स्थान निर्माण केलं आहे. अशा ह्या पुणे शहरावर मोघलांसह ब्रिटीशांनी देखील आक्रमणे केली, परंतु पुणे शहर हादरलं नाही, घाबरलं नाही. पानशेतच्या प्रलयानंतर २०१...