Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...
पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या...
पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

सर्व साधारण
मुंबई पोलीस दलातील सुनिल टोके हे आहेत तरी कोण….पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाया होणार काय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील तत्कालिन मुख्य कामगार अधिकारी व नगरसचिव श्री.शिवाजी दौंडकर यांनी तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ प्रमुख पदासह पुणे महानगरपालिकेतील विविध ठिकाणी सेवेत रुजू झाल्या पासून सेवानिवृत्त होई पर्यंत अनेक भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना हाताशी धरून अनेक मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत. अनेक बेकायदेशीर, मनमानी कारभार, गुन्हेगारी स्वरूपाच्या कामाचे उदात्तीकरण करून, अनेक भ्रष्टाचार करून स्वतःची व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आर्थिक विकास करण्याची कोणतीही बेकायदेशीर संधी सेवानिवृत्ती होईपर्यंत सोडलेली नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी देखील कारवाई करण्यात कसुरी केल्याने या सर्वांविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मुंबई पोली...
पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?

पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत ज्या खात्यातून पैसे मिळतील, त्या खात्यातील सेवकांच्या पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहेत. ज्या खात्यातुन टेंडर सिस्टिम कार्यरत आहे, त्याच खात्यात केवळ जवळच्या सेवकांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या जात आहेत. पैसे देणाऱ्या सेवकांनाच अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभारावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. असा सर्व प्रकार आज पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटी सुरू असल्याची ओरड आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर उघडपणे किती पैसे घेतात याचे तक्रार अर्ज शासन दरबारी पाठविले आहेत. तसेच ज्या सेवकांना अतिरिक्त व प्रभारी पदभार दिला आहे, आज तेच सेवक कोणताही अधिकार नसतांना, तसेच भारतीय दंड विधान संहितेतील कलम 171 चा भंग करीत असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिन...
पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहाराव यांच्या 1991-92 या आर्थिक वर्षात सुधारणांना सुरूवात झाली होती. गॅट व डंकेल करारावर स्वाक्षऱ्या करून संपूर्ण जगाला भारताचे दरवाजे खुले करण्यात आले. याच 1980-90 काळात हर्षद मेहताने सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला, जो आजच्या काळात 50 हजार कोटी पेक्षा अधिक आहे. तर अब्दुल करीम तेलगी याने देखील 1992 मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा केला, जो 2003 मध्ये उघड झाला. त्याने 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, आजच्या काळात त्याचे 150 हजार कोटी रुपये मूल्य होते. अशाच प्रकारचा महाघोटाळा पुणे महापालिकेत झाला आहे. 2014 मध्ये पुणे महापालिकेचा आकृतीबंध अर्थात सेवा प्रवेश नियम शासनाकडून मंजुर करून घेण्यात आला. सेवकांच्या भर्ती, पदोन्नतीमध्ये मनमानी अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. आता 9 वर्षानंतर पुन्हा त्यात बदल करून पुन्हा मनमानी...
पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

सर्व साधारण
नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या खाबुगिरीला कुठेतरी लगाम घालण्याची 10 हजार कंत्राटी कामगारांची मागणीनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचा आकृतीबंध हा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना निमंत्रण देणारा आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये अनुभव, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्तींमध्ये कमालीचा भेदभाव करण्यात आला आहे. पदोन्नतीमध्ये देखील नियमबाह्य तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात जो पैसे घेवून येईल त्याला पदभार देण्यासाठीच ह्या तरतुदी केल्या आहेत. केवळ शासन आणि मंजुर आकृतीबंधावर खापर फोडण्यापेक्षा त्यातील त्रुटी काढुन आकृतीबंध परिपूर्ण करणे आवश्यक ठरत आहे. तथापी जाणिवपूर्वक त्यात त्रुटी ठेवून, चुकीच्या आकृतीबंधाची गैरमार्गाने अंमलबजावणी सुरू आहे. सुरक्षा अधिकारी हे पद देखील भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले आहे. यापर्वी देखील आम्ही कामगार विभाग, विधी विभागातील आकृतीबंधातील तरतुदींमध्ये कशी व...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाह...
कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. कैलास वाळेकर हे पुणे महापालिकेच्या सेवेत 2011 साली नेमणूक झाली. परंतु ते रुजु झाले नाहीत. त्यांच्या 16/12/2011 च्या आज्ञापत्रकात अट क्र. 8 मध्ये नमूद आहे की, संबंधित उमेदवार हे आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत कामावर हजर न झाल्यास त्यांची नेमणूक रद्द समजण्यात येईल असे नमूद केले आहे. तरी देखील श्री. वाळेकर हे रुजु झाले नाहीत. आज्ञापत्रकाच्या चार वर्षानंतर त्यांना पुणे महापालिकेत रुजु करून घेण्यात आले. तथापी वाळेकर यांनी पुणे महापालिका नियमभंग केलेला असतांना देखील तसेच प्रोव्हिबिशन परियड पूर्ण केलेला नसतांना देखील त्यांची सेवा विलोपित करून सेवेत कायम करून घेवून त्यांना थेट टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालिन अति. आयुक्त श्री. राजेंद्र जगताप व उपआयुक्त सामान्य प...
पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
अनु. जाती आदिवासी समाजातील अधिकाऱ्याला जातीव्देषातून पदोन्नतीपासून रोखणाऱ्या….आयुक्त-प्रशासक विक्रम कुमार, अति. आयुक्त रविंद्र बिनवडे, उपआयुक्त सचिन इथापे, सहआयुक्त उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा, आर.आर.मध्ये मनमानी बदल, ठराविक सेवकांना डोळ्यासमोर ठेवून आकृतीबंधाची रचना, मुळात आकृतीबंधच सदोष असतांना, पुनः त्यात दोष वाढविण्याचा गुन्हा का केला जात आहे…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सेवकवर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत. नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या दि. 6 एप्रिल 2023 च्या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील प्रत्येक बदली व पदोन्नती प्रकरणांत पदनिहाय लाखोंची बोली लावली जात असून, 10 लाख, 20 लाख व 30 लाख रुपये घेतल्याशिवाय...
दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करू देत नाहीत, सतत दबाव सहन करावा लागतो म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सतत ओरड होत होती. मागील दोन अडीज वर्षात पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदयातील तरतुदीनुसार काम करण्यासाठी त्यांचे कुणी हात धरले आहेत काय, ते आता नियमानुसार काम का करीत नाहीत. त्या उलट पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून बाहेरून अर्थात सरळसेवेने नोकर भरतीचा धडाका सुरू आहे. परंतु 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना पदोन्नती देत नाहीत, पदोन्नतीची साखळी खिळखिळी केली आहे. त्यामुळे पुढील किमान 10 वर्ष याचा फटका पुणे महापालिकेतील सेवकांना बसणार आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय 10 लाख, 20 लाख व काही प्रकरणांत...