
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 2026 मधील सार्वत्रिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात पुण्याच्या सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत विधानभवन शाखा अभियंतापदी श्री. नवनाथ शेळके यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आहेत. तथापी मागील 3/4 वर्षांपासून विधानभवन शाखेत बोगस बीलांवर ताव मारणाऱ्या श्री. अनिल काकडे यांनी महाराष्ट्र शासनाचा आदेश धुडकावुन लावला आहे. श्री. अनिल काकडे यांची नियतकालिक बदली झालेली असतांना देखील विधानभवनाचा पदभार सोडण्यास तयार नाहीत. नवनाथ शेळकेंनी पदभार स्वीकारलेला असतांना देखील, श्री. काकडे हे विधानभवन शाखेचा पदभार सोडायला तयार नाहीत. त्यातच शेळके यांनी शासनाच्या आदेशानुसार विधानभवन शाखेत स्वतःच्या नावाचा लावलेला नामफलकही काढुन टाकण्यात आल्याने, विधानभवन शाखेत राडा झाला आहे.
विधानभवन शाखेतील शेळकेंचा नामफलक काढला, पोलीसात तक्रार गेली –
पुण्यातील सा.बां. विभागाच्या उपविभाग क्र. 1 अंतर्गत असलेल्या विधानभवन शाखेचा पदभार श्री. नवनाथ शेळके यांनी स्वीकारल्यानंतर, त्यांना विधानभवन शाखेत बसण्यास व येण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. या दरम्यान श्री. शेळके यांनी शासनाच्या आदेशानुसार व पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या नावाचा नामफलक लावण्यात आला होता. तथापी आखाड पार्टी करून आलेल्या उपअभियंता श्री. अनिल बडे व शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांनी दारूच्या नशेतच श्री. शेळके यांचा नामफलक काढुन टाकल्याने विधानभवन शाखेतील वातावरण तणावाचे निर्माण झाले होते.
श्री. शेळके यांनी कोणताही प्रतिकार न करता, त्यांनी थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर बंडगार्डन पोलीसांनी उपअभियंता श्री. अनिल बडे व अनिल काकडे यांना बोलावुन घेण्यात आले. यावेळी अनिल बडे व अनिल काकडे यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. पोलीसांसमोरच गयावया करीत असल्याचे समजले आहे. तसेच बोर्ड मी काढला नाही असेही सांगत होते. मग नामफलक काढला कुणी हे तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झाले आहेच, ते चित्रिकरण बाहेर आले तर दारूच्या नशेत झिंगलेले सर्व अभियंत्यांचे नको ते चेहरे समोर येतील ही भिती देखील त्यांच्या मनांत निर्माण झाली होती.
दरम्यान श्री. शेळके यांनी शासनाच्या आदेशाची प्रत बंडगार्डन पोलीसांना दिल्यामुळे, बंडगार्डन पोलीसांनी शासनाच्या आदेशाची प्रत दाखवित संबंधितांना सांगितले की, महाराष्ट्र शासनाने श्री. नवनाथ शेळके यांची बदली विधानभवन शाखेत केलेली आहे. त्यामुळे तुम्ही श्री. शेळके यांना प्रतिकार करू शकत नाही. अन्यथा शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे लागतील असा सज्जड दम भरला असल्याचे ज्ञात आहे.
दरम्यान शासनातील दोन्ही अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपआपसात प्रकरण मिटवावे, अन्यथा सदरील प्रकरण कागदावर घेतले तर कारवाई करावे लागेल असाही सल्ला बंडगार्डन पोलीसांनी दिला आहे.

काकडेंची शुगर लेवल कमी झाली, हॉस्पीटल मध्ये ॲडमिट करावे लागले –
विधानभवनात झालेल्या ह्या प्रकारामुळे शाखा अभियंता श्री. शेळके यांना जबर धक्का बसला आहे. त्यांची तब्येत नाजुक झाली. त्यांची शुगर अचानक 50 च्या खाली आल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. घरचे अधिक घाबरून गेले होते. उपचारानंतर शेळके यांना घरी सोडण्यात आले असले तरी श्री. शेळके हे अजुनही त्या धक्यातून सावरले नसल्याचे समजते.
नवीन सर्कीट हाऊसमध्ये जंगी मटण-दारू पार्टी- लुंकड काय म्हणाले…
अनिल बडे, अनिल काकडे, पराग नाईक, मळेकरांसह त्यांच्या नातेवाईकांनी नवीन शासकीय विश्रामगृहात आखाड दारू-मटण पार्टी साजरी करण्यात आली….. काय झाले पार्टीत… कोणती चर्चा झाली…. लुंकडने मटण कुठून आणले… ते… बिर्याणीच्या मसाल्यापर्यंत आणि …. आणि…. आणि… सगळा राडाऽऽऽ …. पाहुयात पुढील बातमीत….
