Wednesday, June 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीस क्राइम

30 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीतून 10 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

30 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीतून 10 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/थेऊर येथील धुमाळ मळा येथून 30 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीतून सुमारे 10 लाख 60 हजार रुपये किंमतीचा एकुण 53 किलो 14 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 ने पकडण्यात यश आले आहे. मध्यरात्रौ 11 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत थेऊर येथे सापळा लावण्यात आला होता. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-1. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचेकडील पोलीस अधिकारी व पथक असे पुणे शहर हद्दीत दि. 11 मार्च रोजी गस्त करीत असताना स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम पांढऱ्या रंगाच्या अलिशान फॉर्च्युनर गाडीमधून गांजाचा मोठा साठा विक्री करीता थेऊर परीसरात घेवून येणार आहे अशी बातमी प्राप्त झाली. लगेचच मध्यरात्रौ 11 वाजण्याच्या सुमारास अंमली विरोधी ...
स्पोर्ट बाईकवर भरधाव येवून मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्वती पोलीसांनी केला पर्दाफाश, चोरांचा पाठलाग, 8 मोबाईल व 1 मोटारसायकल जप्त

स्पोर्ट बाईकवर भरधाव येवून मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्वती पोलीसांनी केला पर्दाफाश, चोरांचा पाठलाग, 8 मोबाईल व 1 मोटारसायकल जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात रस्त्याने एकटे मोबाईलवर बोलत चालणाऱ्या इसमांचे फोन स्पोर्ट बाईकवर भरधाव वेगात येवुन, अचानक हिसकावून घेवून, चोरी झाल्या दोन घटना पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या. पर्वती पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी सी.सी.टी.व्ही. च्या आधारे शोध घेत असतांना, नवी मुंबई पासिंग असलेल्या वाहनावर पुण्यात चलन पडले होते. यमाहा आर-15 या वाहनावर पुणे शहरात वाहतुक पोलीसांकडून चलन करण्यात आल्याने पोलीस वाहनाच्या मालकाचा शोध घेत असतांना, नवी मुंबई येथून संबंधित वाहन चोरी झाल्याची नोंद आढळुन आली. सदरील वाहन चोरीचे असल्याचे व ते पुण्यामध्ये वापरात असल्याचे धागेदारे मिळाल्यानंतर, पुण्यामध्ये संबधित बाईक चालविणाऱ्या चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने पकडले असता त्यांच्याकडुन सुमारे 8 मोबाईल फोन व चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली....
होळी,धुलीवंदन व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, आदेशांचे उल्लंघन केल्यास, दंड-जप्ती-आणि- शिक्षेची तरतुद

होळी,धुलीवंदन व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, आदेशांचे उल्लंघन केल्यास, दंड-जप्ती-आणि- शिक्षेची तरतुद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात साजरा होत असलेल्या होळी, धुलिवंदन, रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडाच्या आकारणीसह जप्ती व शिक्षा केली जाणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी खालील प्रमाणे निदेश देण्यात आलेले आहेत. डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय...
गुंड निलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला सोलापूरच्या बार्शीतून अटक

गुंड निलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला सोलापूरच्या बार्शीतून अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल गुन्ह्यातील आरोपी अमोल दत्तात्रय लाखे हा मागील काही महिन्यांपासून गुन्हे केल्यापासून फरार होता. पोलीस त्याचा तपास करीत असतांना, तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे असल्याची खबर लागल्यानंतर, वारजे माळवाडी पोलीसांनी थेट बार्शी गाठत लाखे याला अटक केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,अमोल लाखे याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील कायदा कलम भा.न्या.सं.क 189 (1),189(2).190. 308(4),126(2):351 (1).351 (2),111 सह मोक्का, कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. 277/2025 भा.न्या.सं.क 189(1). 189(2). 191(2), 191(3), 190, 329 (4), 308(2), 308(4), 308 (5), 352, 351 (2) (3) सह मोक्का गुन्ह्यामधील व वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील कायदा कलम भा.न्या.सं.क 318(4) सह टेली कम...
होळीसाठी सणासाठी 6 लाखांची हातभट्टीची दारू, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कारवाई करीत, हातभट्टी लावणाऱ्यांना करायला लावला शिमगा

होळीसाठी सणासाठी 6 लाखांची हातभट्टीची दारू, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कारवाई करीत, हातभट्टी लावणाऱ्यांना करायला लावला शिमगा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/होळी सण दोन दिवसांवर आलेला असतांना, वाघोली पोलीसांनी हातभट्टी बनविणाऱ्यांच्या अड्डयावर छापा मारून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे मिश्रण जप्त करीत कारवाई केली आहे. होळी सणासाठी हातभट्टी तयार केली जात असल्याचे समोर आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,क्राईम ब्रॅंच युनिट 7 कडील पथक अवैध धंदे विरोधी कारवाईचे अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना, पोलीस अंमलदार नितीन धाडगे व प्रतिक्षा पानसरे यांना माहीती मिळाली की, मौजे भावडी गावचे हद्दीत तांबे यांचे क्रशर प्लांट जवळ एक महीला गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावुन तयार करीत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे गुन्हे शाखा युनिट 7 कडील पथकासह छापा कारवाई केली. भावडी येथे भट्टी राखण करताना आरोपी महीला अनिशा योगेश गुडदावत, वय 20 वर्षे, (रा. 5 नंबर भावडी, हवेली जि. पुणे) मिळुन आल्याने त...
खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून पुणे शहरातील सराईत गुन्हेगारासह ड्रग्ज तस्करांवर कारवाई

खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून पुणे शहरातील सराईत गुन्हेगारासह ड्रग्ज तस्करांवर कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून सराईत गुन्हेगारांसह ड्रग्ज तस्करांविरूद्ध कारवाई केली आहे. यात दरोडा व वाहन चोरी पथ क्र. 1 यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 1 लाख 92 हजार रुपयांचे एम.डी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे, तर खंडणी विरोधी पथक क्र. 1 यांनी एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा-1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा 9 ग्रॅम 63 मिलीग्रॅम एम. डी. (मेफेड्रान) अंमली पदार्थ बाळगणा-या इसमावर कारवाई - दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पि.के.जी.एम शाळेसमोर, गंगाधाम ते अप्पर येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिक...
महंमदवाडी येथे 4 लाखाची घरफोडी चोरी करणा-या दोन चोरांना, काळेपडळ पोलीसांनी ठोकल्या बेड्या

महंमदवाडी येथे 4 लाखाची घरफोडी चोरी करणा-या दोन चोरांना, काळेपडळ पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील तरवडेवस्ती महंमदवाडी हडपसर येथील बंद घराचे दरवाजाचा कोयंडा तोडुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. काळेपडळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील व तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव यांनी तात्काळ काळेपडळ पोलीस ठाणे तपास पथकास तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक तपास करुन आणि पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व गिरीराज जगदाळे यांनी हद्दीतील गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळवली. त्यानुसार सापळा लावुन वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड वय 19 वर्षे व प्रशांत ऊर्फ चिक्या भारत कसबे वय 19 वर्षे (...
मार्केटयार्ड, बिबवेवाडी व आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 9 गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

मार्केटयार्ड, बिबवेवाडी व आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 9 गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

पोलीस क्राइम
मार्केटयार्ड झोपडपट्टीतून सोमगौडा चौधरी तर प्रेमनगर मधुन साहिल अष्टगे, बिबवेवाडीतून मोरे, ठाकर, सणस, डोंगळे तर आंबेगाव शनिनगरातील आकाश कांबळे व स्मशानभुमीजवळील आर्यन बेलदरे तडीपारनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 02 मधील पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील बेकायदेशीर हत्यार वापरणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, दंगा करणे, हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, इतरांचे जीवन धोक्यात आणणारी कृती करणे, दहशत माजवणे, जबरी चोरी करणे, दुखापतसह जबरी चोरी करणे, बलत्कार करणे, जातीवाचक भाष्य करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर अतिक्रमण करणे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, चोरीचा माल जवळ बाळगणे, बेकायदेशीर अंगली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे, स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, घरफ...
एकमेकांकडे रागाने पाहिल्याने, धारदार शस्त्रासंह हॉकी स्टीकने कोंढव्यात जबरी मारहाण

एकमेकांकडे रागाने पाहिल्याने, धारदार शस्त्रासंह हॉकी स्टीकने कोंढव्यात जबरी मारहाण

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोंढवा हे नाव जरी उच्चारले तरी, धारदार शस्त्रे आणि बंदूकांच्या फायरिंगचा आवाज कानाजवळ घुमल्याचा भास होतो. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश भांडण आणि हाणामाऱ्यात धारदार शस्त्रा शिवाय गुन्हा नोंदच होत नाही. आपण घरात कांदा कापण्यासाठी जशी सुरी वापरतो, तसे कोंढव्यात साधी मारामारी करीत असतांना देखील धारदार शस्त्रे आणि बंदूका वापरल्या जात आहेत. पुण्याचा बिहार झालाय म्हणून बोंब मारण्यात काहीच अर्थ नसला तरी, कोंढव्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. शुक्रवारी दि. 20 रोजी रात्रौ साडेदहाच्या सुमारास सनं. 42 गल्ली नं. 2 येथे एक 17 वर्षीय फिर्यादी बसले असतांना, फिर्यादी याचा मित्र व आरोपी 1) आसीफ हिदायत शेख, वय- 24 वर्ष (रा. टेम्पल टॉवर बिल्डींगच्या समोर, स.नं. 42 फ्लॅट नं. 302, कोंढवा पुणे व 2) आवेज इलियास शेख, वय5 24 (रा. तिसरा मजला, ...
गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या नवताऱ्यांकडून पुणे शहरात अब तक 21 दरोडे

गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या नवताऱ्यांकडून पुणे शहरात अब तक 21 दरोडे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील सोमवार पेठ येथुन 8 हजार कोटीचे एमडी हा अंमली पदार्थ पकडून ज्यांनी अंमली पदार्थांची बाजारपेठ उध्वस्त केली, त्या क्राईम युनिट क्र. 1 यांनी त्यांच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी व गुन्हयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करीत असतांना, हडपसर येथुन गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या नवताऱ्यांना पकडून त्यांनी घातलेल्या 21 दरोड्यांचा उलगडा केला आहे. याकामी पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व निलेश साबळे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, गुन्हे शाखा युनिट-1, कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गुन्हयांना आळा घालण्याकामी गुन्हे प्रतिबंध करण्याकामी हद्दीत गस्त घालित असतांना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या बातमी मिळाली क...