मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका
मुंबई/दि/ प्रतिनिधी/
काश्मीरमध्ये
दगडफेक करणार्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जात असतील, तर महाराष्ट्र बंदमध्ये सामील
झालेल्या कार्यकर्त्यांवरील का नाही, असा सवाल उपस्थित करीत सकल मराठा समाजाच्या महिला
कार्यकर्त्यांनी गुरुवारी आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
उमेदीच्या
काळात गुन्हे दाखल करून मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादाकडे वळण्यास भाग पाडू नका,
असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.आंदोलनात विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या
सहभागी झाल्या आहेत.
रूपाली
पाटील म्हणाल्या, न्यायप्रविष्ट मागण्यांवर...


