
पुणे महापालिकेतील कामगार संघटनांची, कामगार आयुक्तांकडे तक्रार –
पुणे महानगरपालिकेतील कामगारांना किमान वेतन मिळत नाही म्हणून विविध कामगार संघटनांनी अपर कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे विविध स्वरूपात तक्रारी अर्ज देवून त्यामध्ये सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुधारित वेतन मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती. तसेच कामगार कायदयाप्रमाणे कायदेशिर कारवाई करण्याची विनंती २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार अपर कामागार आयुक्त पुणे यांनी, महापालिका आयुक्त यांना कामगारांच्या किमान वेतनाबाबत कळविले होते की, किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था या रोजगार असलेल्या उद्योंगासाठी किंवा आस्थापनांसाठी नवीन अनुसूचित रोजगारांची/ उद्योगांची स्वतंत्र अनुसूची मध्ये समाविष्ठ करून किमान वेतनाचे दर २४/२/२०१५ रेाजी अधिसुचना जारी करून निर्धारित केलेले आहेत. सदरील दर हे नमूद केल्याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कायम,...