शासनाच्या ७ मे च्या जीआर नंतर देखील पदोन्नती देण्यासाठी आता पुणे महापालिकेला पंचांग बघायचे आहे काय
शाखा अभियंता ते उपअभियंता पदावरील पदोन्नतीचे आदेश देण्यात एवढा विलंब कशासाठी…
पुणे/दि/ प्रतिनिधी/शासनाच्या नगरविकास मंत्रालय नावि कार्यासन क्र. २२ यांनी १४ जानेवारी २०२० रोजी पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदी पदोन्नती देत असतांना, कनिष्ठ अभियंता पदाचा अनुभव विचारात घेऊन पदोन्नती देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. दरम्यान २०१८ रोजीच्या शासन पत्रव्यवहारानुसार ९/१०/२०१८ रोजी अनेकांना पदोन्नती देण्यात आली होती. परंतु शासनाच्या २०२० रोजीच्या पत्रानुसार पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदावर पदोन्नती देणे अपेक्षित असतांना देखील त्यांना अद्याप पर्यंत पदोन्नती देण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात नेहमीच अडचणी निर्माण केल्या जात असून, ७ मे २०२० रोजीचा शासन निर्णय आलेला असतांना देखील पदोन्नतीचे आदेश दिले जात नस...