Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाश

धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाश
बांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल,
हरपळे, निकाळजे चव्हाणांकडून माहिती लपविण्याचा अटोकाट प्रयत्न

पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे शहरातील उपनगर असलेल्या धनकवडी आणि सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत बांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांच्या कत्तली सुरू आहेत. नियोजित बांधकामास खोदाईत येत असल्याचे कारण देवून वृक्ष तोडण्यास व वृक्ष पुर्नरोपनास मान्यता देण्यात येत आहे, झाडांचा विस्तार मोठा झाला आहे, झाडांच्या फांद्या इमारतीला घासत आहे, खिडक्यांना घासत आहे, विजेच्या तारांना घासत आहे अशा प्रकारची वेगवेगळी कारणे देवून, झाडांच्या फांदया तोडण्यास मान्यता दिल्यानंतर, फांदया तोडण्याऐवजी, संपूर्ण झाड मुळासहित कापुन काढले जात आहे. मागील दोन वर्षात किमान १५०० झाडांच्या कत्तली करण्यात आलेल्या असल्यामुळे तसेच पुर्नरोपनात संपूर्ण झाडे जळुन गेली असल्याने, संबंधित बांधकाम व्यावसायिकासहित पुणे महापालिका परिमंडळ क्र. ३ च्या सहायक उदयान अधीक्षक स्नेहल हरपळे, निकाळजे आणि चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून निलंबित करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.

पुणे शहरात विकास कामांच्या नावाखाली, मेट्रोसाठी, रस्त्यांसाठी आत्तापर्यंत हजोरो झाडांच्या कत्तली करण्यात आलेल्या आहेत. आत्ता देखील बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तली सुरू आहेत. याबाबत माहिती अधिकारात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, सहायक उदयान अधीक्षक स्नेहल हरपळे यांनी आरेरावी केली असून, माहिती देण्यास हेतूपुरस्सरपणे टाळाटाळ केली जात आहे. 
निसर्गर्‍हासामुळे, निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्रदुषणामुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. निसर्गाची चक्रे बदलली, ऋतु बदलले, सामान्य विज्ञान नैसर्गिक आपत्तींना सामारे जावे लागत आहे. वायुप्रदुषण हे वाहनामुळे वाढले. त्यामुळे आजार वाढले, प्रखर उष्णतेमुळे आज झाडांची हानी व्हायला लागली आहे. अकाली पाऊस आणि प्रखर उष्णतेमुळे थंडावा नाहीसा झाला आहे. एकंदरीतच निसर्गाचा तोल बिघडत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारे यांच्यासहित अनेक एनजीओं कडुन झाडे लावा - झाडे जगवा ही मोहित सुरू करण्यात आलेली आहे. परंतु दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेतील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या, बांधकाम व्यावसायिकांबरोबरील साथ संगनमतानमुळे पुणे शहराने वायु आणि ध्वनी प्रदुषणात कमालीची आघाडी घेतली आहे. पुण्यातील थंडावा नाहीसा होवून, प्रखर उष्णतेचे चटके बसू  लागले आहेत. ही वस्तुस्थिती असतांना, आजही पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाकडून झाडांच्या कत्तलीचे प्रकार सुरू आहेत. 

बेकायदा वृक्षतोड प्रकरणी स्नेहल हरपळे यांचेवर गुन्हा दाखल करावा –
पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्र. ३ मधील सहा. उदयान अधीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या स्नेहल हरपळे यांनी बेकायदा वृक्षतोड करणार्‍या इसमांना पाठीशी घालण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बेकायदा वृक्षतोड प्रकरणी किती इसमांवर गुन्हे दाखल केले याबाबतची माहिती घेत असतांना, काही बाबी समोर आलेल्या आहेत. यामध्ये सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाचे बाळासाहेब चव्हाण आणि धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडील निकाळजे या मिस्त्री संवर्गातील कर्मचार्‍यांचे या प्रकरणी गैरकृत्य समोर आले आहेत. बेकायदा वृक्ष तोड करणार्‍यांना पाठीशी घातले जात आहे. या शिवाय अधिकृत वृक्षतोड किंवा झाडाच्या फांदया तोडण्याची परवानगी घेवून, झाड मुळासहित कटरच्या साहाय्याने कापुन काढली गेली आहेत. या सर्व प्रकरणी पुणे महापालिका परिमंडळ क्र. ३ च्या अधीक्षक स्नेहल हरपळे यांचेवर बेकायदा वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून निलंबित करण्याची मागणी होत आहे.
माहिती अधिकारचे अपिल ३० एपिल रोजी आणि हजर राहण्याचे पत्र येते २४ मे २०२१ रोजी –
धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयातील वृक्ष विभागाचे माहिती अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील वृक्ष तोडीची माहिती दिली नाही. त्यामुळे याबाबत माहिती अधिकाराचे प्रथम अपिल करण्यात आले होते. तथापी कार्यालयात विचारणा केली असता, आम्ही अपिलाची सुनावणी ३० एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती. परंतु तुम्ही हजर झाला नाहीत असे सांगण्यात आले. परंतु अपिलाचे पत्र मिळाले नाही. कार्यालयातून फोनही आला नाही. त्यामुळे अपिला सुनावणीत दिरंगाई का झाली हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत अशी विनंती केली असता, स्नेहल हरपळे यांनी, तुम्ही अपिलाची फेर सुनावणी घेण्यात यावी असे आम्हाला पत्र दया, मगच आम्ही तुमची अपिलाची सुनावणी घेवू असे सांगितले होते. दरम्यान काल शुक्रवार दि. २८ मे २१ रोजी धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाचे पत्र प्राप्त झाले असून, अपिलाची सुनावणी ३० एप्रिल २०२१ रोजी ठेवली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील एप्रिल महिन्याचे पत्र मे च्या २४ तारखेला प्राप्त झाले आहे. यावरून धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात नेमके काय चालले आहे याचा हा नमूना पुरेसा आहे.