
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील कल्याणीनगर येरवडा येथील लॉजवर वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्यांवर येरवडा पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. यात अनैतिक व्यापारास प्रवृत्त करणाऱ्या दोघांसह, पिडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. येरवडा पोलीस स्टेशनकडील तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पोलीस अंमलदार वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड व रामेश्वर नवले यांनी ही धडक कारवाई केली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अनैतिक मानवी व्यापार करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार नवले यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील एका हॉटेल मध्ये एक इसम व त्याचे साथीदार हे ग्राहकांना फोनवर बुकींग करुन मुली अनैतिक व्यापार करण्यासाठी पाठवून विशिष्ट रक्कम ठरवून ग्राहकांच्या मागणीनुसार कल्याणी नगर, येरवडा या परीसरात लॉजेसवर पाठवितात.
सदरची बाब वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गिते यांना कळविले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार बातमीची खात्री करुन सदर माहितीची पडताळणी करुन बनावट ग्राहक येरवडा येथील हॉटेल मध्ये पाठवुन, त्याठिकाणी पाळत ठेऊन, छापा टाकुन, अनैतिक व्यापार करणास प्रवृत्त केलेल्या दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. दरम्यान पिडीतांकडे सखोल चौकशी करुन त्यांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांचेकडून हा व्यवसाय करवून घेणा-या इसमांना तात्काळ तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पोलीस अंमलदार वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड यांनी सदर भागात जाऊन सापळा रचुन अप्पर खराडी रोड परीसरातून दोन इसमांना ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे
- राज राजेशाम सविता, (वय-28 वर्ष, रा-खराडी, पुणे )
- सुनिल शिवाजी शिंदे, (वय 37, रा-काळेपडळ, हडपसर, पुणे)
असे असल्याचे सांगितले. वर नमुद आरोपीविरुध्द दि. 14 सप्टेंबर रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143 (2) (3), 3 (5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 04 श्री. चिलुमूला रजनीकांत, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री सुनिल जैतापुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री उमेश गिते, पोनि (गुन्हे), श्रीमती शारदा कोकाटे पोनि (गुन्हे) श्री. केशव दिडे, येरवडा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि शरद देठे, तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार रामेश्वर नवले, कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदिप धादवड, महिला पोलीस अंमलदार ज्योती नाईक यांनी केली आहे.
