Thursday, August 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

PWD-PUNE- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, पुण्याच्या विधानभवनातच,सा.बां. खात्याकडून विधीमंडळ सदस्यांचा अपमान, आमदार निलम गोऱ्हे यांचा संताप!

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन पुणे येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. तथापी या ध्वजारोहन कार्यक्रमात जाणिवपूर्वक स्वातंत्र्य सैनिक व विधीमंडळ सदस्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यात शासन नियुक्त शाखा अभियंता श्री. नवनाथ शेळके यांच्यावर खापर फोडण्याचा हेतू असल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुण्याच्या विधानभवन शाखा अभियंतपदी नवनाथ शेळके यांच्या नियुक्तीमुळे उपअभियंता श्री. अनिल बडे व अनिल काकडे अतिशय व्यथित झाले आहेत. शासनाने दिलेला निर्णय या दोन अभियंत्यांना मान्य नसल्यामुळे, श्री. बडे व श्री. काकडे यांनी त्यांचा राग स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक व आमदारांवर काढला असल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

उपअभियंता श्री. अनिल बडे व अनिल काकडे यांच्याकडून नियमांचे उल्लंघन-
महाराष्ट्र शासकीय बदल्यांचे विनिमय- 2005 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयाकडून शाखा अभियंता यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उपविभाग क्र. 1 मधील विधानभवनच्या शाखा अभियंतापदी नवनाथ शेळके यांची पदस्थापना केली आहे.

शासनाच्या 21 जुलै 2026 रोजीच्या बदली आदेशान्वये श्री. नवनाथ शेळके यांची पदस्थापना पुण्याच्या विधानभवन शाखा अभियंता पदी करण्यात आली आहे. तसेच विधानभवनाचे शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांचा या पदावर कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची बदली सा.बां. उपविभाग क्र. 1 मधीलच कारागृह शाखेमध्ये करण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता श्री. पराग  नाईक यांची बदली सा.बां. वैदयकीय उपविभागातील प्रादेशिक मनोरूग्णालय येथे करण्यात आली आहे. दरम्यान उपअभियंता श्री. अनिल बडे यांना सा.बां. विधानभवन शाखेमध्ये त्यांचे मर्जीतील श्री. नाईक व श्री. मळेकरांना बसवावे अशी तीव्र इच्छा आहे. एका पदाबाबत सांशकता असल्यामुळे श्री. काकडे यांच्या बदलीचे आदेश येवून देखील ते बदलीच्या ठिकाणी रुजु झाले नाहीत. 

दरम्यान 21 जुलै 2026 रोजी शासनाच्या आदेशातील परिच्छेद क्र. 4 मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पदमुक्त व पदमोचक अभियंत्यांनी पदभार सोडल्याचा व स्वीकारल्याचा दिनांक त्वरीत शासनाच्या ई मेल वर कळवावा. विहीत कालावधीत संबंधित अभियंता बदलीच्या ठिकाणी रुजु न झाल्यास, त्याबाबत शासनास त्वरीत अवगत करण्यात यावे. ज्यांनी आदेशांचे उल्लंघन केले त्यांच्या विरूद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल असेही नमूद आहे. तथापी पुण्यासारख्या ठिकाणी बदलीवरून रणकंदन सुरू आहे. शासनाच्या आदेशांची अवहेलना सुरू असतांना देखील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता बदलीचा तमाशा बघण्यात दंग असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

उपअभियंता अनिल बडे यांना शेळके का नको आहेत-
मूळतः श्री. अनिल बडे यांच्याकडील चारही शाखामध्ये मागील काही वर्षात बोगस कामांचा धडाका सुरू आहे. कामे केल्याचा बनाव करून (इस्टीमेट ते कामाची एमबी) तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करून शासकीय निधीचा एखाद्या सरावलेल्या गुन्हेगारासारखे संगनमताने अपहार केल्याच्या बाबी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे नवनाथ शेळके यांनी पुढे जावून बोगस प्रकरणे समोर आणली तर श्री. अनिल बडे व श्री. अनिल काकडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होवून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची शक्यता असल्याने,नवनाथ शेळके यांना पदभार देण्यास मागील दोन महिन्यांपासून टाळाटाळ केली जात असल्याची खात्यात चर्चा आहे.

आमदार निलम गोऱ्हे यांचा तीव्र संताप-
पुण्याच्या विधानभवनात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवनात ध्वजारोहन करण्यात आले. या प्रसंगी पुण्याच्या सा.बां. विभागाकडून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उपआयुक्त, अधीक्षक तसेच सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. तथापी लोकप्रतिनिधींना जाणिवपूर्वक मागच्या रांगेत बसविण्यात आले. आमदारांना मागच्या रांगेत बसविल्यामुळे विधानपरिषदेच्या माजी उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी माध्यमांच्या समोरच तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांचे नातेवाईक, स्वातंत्र्य सैनिक यांचाही जाणिवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे समोर आले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे खापर श्री. शेळके यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न-
दरम्यान शासनाच्या आदेशानुसार विधानभवनाचे शाखा अभियंता म्हणून नवनाथ शेळके हे अधिकृत आहेत. तथापी श्री. अनिल काकडे यांनीच अद्यापही विधानभवनाचा ताबा सोडलेला नाही. हे पद जबरीने स्वःतच्या कब्यात ठेवले आहे. दरम्यान या बैठकीचे नियोजनही श्री. शेळके यांनीच केले होते. परंतु लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, सैन्यदलातील अधिकारी व त्यांचे नातेवाईक यांचा अवमान केल्यानंतर, त्याची तक्रार शासनाकडे गेल्यास, या सर्व कृतीस श्री. नवनाथ शेळके जबाबदार असल्याचे भासविण्यासाठी, श्री. अनिल बडे व अनिल काकडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गैरकृत्य केले आहे. ( उपअभियंता श्री.अनिल बडे व शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांनी विधानभवनात केलेल्या गैरकृत्यांच्या पाढ्यांचे वाचन सोमवार पासून….)