Thursday, May 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुणे महापालिकेतील कोर्ट केसचे वाटप आता आयुक्तांनीच करावे

पुणे महापालिकेतील कोर्ट केसचे वाटप आता आयुक्तांनीच करावे

सर्व साधारण
1.सर्वच कोर्टात, दे दण्णादण केसेस का हारत आहे…. मुख्य विधी अधिकारी पदच रद्द करावे3.मु.वि.अ. ॲड.निशा चव्हाण यांची बौद्धीक दिवाळखोरी… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या वतीने व पुणे महापालिकेविरूद्ध करण्यात आलेले पुणे महापालिका कोर्ट, जिल्हा कोर्ट, लेबर कोर्ट, उच्च न्यायालय यासह सर्वच न्यायालयातील कोर्ट केसेस पुणे महापालिका दे दण्णा-दण्ण हारत आहे. मुख्य विधी अधिकारी श्री.रविंद्र थोरात, श्रीमती मंजुषा इधाटे आणि आता श्रीमती निशा चव्हाण या तिनही मुख्य विधी अधिकाऱ्यांच्या कालावधीत आत्तापर्यंत सुमारे 5 हजार पेक्षा अधिक कोर्ट केसेस झालेल्या असतांना, त्यातील एकुण जिंकलेल्या कोर्ट केसची संख्या आणि हारलेल्या कोर्ट केसेसची संख्या पाहिली असता, हारणाऱ्या कोर्ट केसेसची संख्या अधिक झाली आहे. इकडे कोर्ट केसेचा आकडा वाढत आहे, तिकडे कोर्ट केसेस हारण्याचे प्रमाण विमानाच्या वेगापेक्षा अधिक ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंदयावरील कारवाई संस्थगीत ….

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंदयावरील कारवाई संस्थगीत ….

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा शाखेविरूद्ध स्थानिक पोलीसांचा एल्गार… परिणामी….. पुणे शहर अवैध धंदे मुक्त करण्याचा संकल्प, अवैध कृत्यांपासून पुणे शहराचे शुद्धीकरण मोहिमेला स्थानिक पोलीसांकडून खिळ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी पुणे शहर अवैध धंदे मुक्त करण्याचा संकल्प केला असून, अवैध कृत्यांपासून पुणे शहराचे शुद्धीकरण मोहिम सुरू असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने मध्यवर्ती पुणे शहरासह, संपूर्ण पुणे शहरात कारवाईचा धडाका सुरू ठेवला होता. तथापी स्थानिक पोलीसांनी, सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईविरूद्ध एल्गार पुकारल्यामुळे आजमितीस ही कारवाई तुर्त संस्थगित झाली असल्याचे दिसून येत आहे. तथापी अवैध धंदयाविरूद्ध कारवाई करतांना, पुणे शहर पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाविरूद्ध एल्गार पुकारणे योग्य नसून, सा...
बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश

बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश

सामाजिक
बारामती येथील सैराट पार्ट - 2बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेशॲड. अंबादास बनसोडे यांचा युक्तीवाद न्यायालयाकडून मान्य,न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयालयात अपिल करणार - ॲड. अंबादास बनसोडे पुणे/दि/ प्रतिनिधी/बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जे. पी. शेख यांनी यवत पोलीस स्टेशन येथील जातीय अत्याचार गुन्ह्यातील फिर्यादी दत्तात्रय चव्हाण यांना 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ॲड. अंबादास बनसोडे यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला असला तरी न्यायनिर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे ॲड. अंबादास बनेसाडे यांनी नॅशनल फोरम वार्ताहरांशी बोलाताना सांगितले आहे. जातीय अत्याचार गुन्ह्याची हकीकत अशी की, मार्च 2022 मध्य दापोडे ता. दौंड येथील आरोपी रमेश बाबु करडे व इतर जाण यांनी फिर्यादी श्री. चव्हाण...
या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

शासन यंत्रणा
आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात सांगताहेत ॲड. विश्वास कश्यप…. एका महत्त्वाच्या बातमीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .बातमी अशी आहे की , दिल्ली सरकार मधील आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्या कुत्र्यास मोकळेपणाने मैदानात फिरता यावे म्हणून दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममधील क्रीडापटूंचे प्रशिक्षण लवकर बंद केले जायचे . कुत्रा आणि खिरवार पती पत्नीला मुक्तपणे फिरता यावे यासाठी संध्याकाळी सात वाजता त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण संपूर्णपणे बंद केले जात असे . याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुरुवार दिनांक 26 मे 2022 रोजी पहिल्या पानावर प्रकाशित झाले . संजीव खिरवार सोबत त्यांची ...
पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..

पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना पगार नाही, सुट्टी नाही, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी, पुणे /दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या आस्थांपना मध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची आर्थिक सुरक्षाच हरवली आहे. सलगपणे वेतन मिळत नाही, कामावरून कधीही काढले जाते, वेतनात काहीही पूर्वकल्पना न देता कपात केली जाते, अशा अनेक गोष्टींनी हे सुरक्षा रक्षक हवालदिल झाले आहेत. भारत सरकार व जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे धाडस नितीन केंजळे मध्ये आले तरी कुठून…….भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपआयुक्त माधव जगताप यांचे नाव सांगुन- सुरक्षा रक्षकामार्फत दंडेली करण्यामागे नितीन केंजळेचा बोलविता धनी कोण आहे…नितीन केंजळें- शिपाई ते क्लार्क… स्टेनो… आता कामगार कल्याण अधिकारी - सह सुरक्षा अधिकारी पद देखील आहे. लेखी परिक्षेत अर्धपास- ...
पोलीसांच्या भागिदारीतील जुगार अड्यांवर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची कारवाई

पोलीसांच्या भागिदारीतील जुगार अड्यांवर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस क्राइम
मार्केटयार्ड, धनकवडीसह सिटी पोस्टाजवळ कारवाई - उपमुख्य सुत्रधार फरार, खाकी वर्दीतील मुख्य सुत्रधार आजही मोकाट…… पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात व राज्यात 7 वा वेतन आयोग लागु झालेला आहे. शासन किंवा महापालिकेतील शिपाई पदाला देखील अर्ध्या लाखाच्यावर पगार मिळत आहे. वर्ग 3 मधील लिपिक टंकलेखक पदाला पाऊन लाखाच्या वर पगार मिळकत आहे. तरीही वरकमाईसाठी दर दिवशी कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. त्यातच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग या गुन्हे शाखेच्या युनिटने सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का दिला आहे. पोलीस खात्यातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सध्या पुणे शहरातील बहुतांश ठिकाणी मटका, जुगार अड्डे, क्लब चालविले जात असल्याची माहिती वारंवार मिळत असल्यानेच त्यांच्यावर धाडी टाकुन कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. मार्केटयार्ड, धनकवडी सह सिटी पोस्टाजवळील मटका व जुगार अड्डयांवर तडाखेबाज...
बुधवार पेठेतील देशद्रोही कारवायात फरासखाना पोलीसांचे योगदान?<br>जुगार-चमडीचा पैसा- पोलीस व सावकारांमार्फत बांधकाम उद्योगात….?

बुधवार पेठेतील देशद्रोही कारवायात फरासखाना पोलीसांचे योगदान?
जुगार-चमडीचा पैसा- पोलीस व सावकारांमार्फत बांधकाम उद्योगात….?

पोलीस क्राइम
बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, थायलंड मधील बंधकांना भारतीय आधार कार्ड, पॅनकार्ड..? पुणे/दि/ प्रतिनिधी/राजकारणी आणि सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवकारांच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. आता आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या देखिल रोज येत आहेत.हे कशामुळे झाले…. पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मीबाई शुक्ला या सत्ताधारी पक्षासाठी कशा खबरेगिरी करीत होत्या हे आता सिद्ध झालं आहे. झारखंड या गरीब राज्यातील एक महिला अधिकारी पुजा सिंघल यांची 300 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. परमबिरसिंग, सत्यपालसिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आणि नंतर राज्याचे पोलीस महासंचालक पदावरील व्यक्ती कुणासाठी काम करीत होते हे आता सर्व जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यांना नाव पत्ता विचारा, ते सध्या कुठे राहत आहेत हे देखील माहिती नाही, आई वडीलांचे नाव… एवढंच काय …. पुण्यातील सा...
ॲट्रॉसिटी ॲक्ट ः समिती का गठीत नाही?

ॲट्रॉसिटी ॲक्ट ः समिती का गठीत नाही?

सामाजिक
: इ झेड खोब्रागडे (माजी सनदी अधिकारी) अट्रोसिटी ऍक्ट च्या अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करणे सरकार वर बंधनकारक आहे. परंतु अजूनही समिती गठीत झाली नाही, सांगताहेत माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडेमाहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीचे पत्र सोबत आहेत, पाहावे. अट्रोसिटी ऍक्ट च्या अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करणे सरकार वर बंधनकारक आहे. परंतु अजूनही समिती गठीत झाली नाही. गृह विभागाचे 24 .2.2021 चे पत्र आणि सामाजिक न्याय विभागाचे दि 13 एप्रिल 2022 च्या पत्रावरून स्पष्ट होते . महाविकास आघाडीचे सरकार येऊन अडीच वर्षे झालीत. सामाजिक न्याय हा एक महत्वाचा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये आहे.त्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची समन्वय समिती...
निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत – बाळासाहेब आंबेडकरांची टीका

निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत – बाळासाहेब आंबेडकरांची टीका

राजकीय
अमरावती/दि/देशात संविधानाप्रमाणे वागायचे नाही असे ठरल्याचे दिसत आहे. संविधानाची घटनात्मक चौकट तोडण्याची प्रक्रिया केंद्राने सुरु केली असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत. तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून अपेक्षीत होते असेही ते म्हणाले. आयोगाला वाटेल तेव्हा निवडणुका घ्याव्यात हा निर्णय अयोग्य असल्याचे आंबेडकर म्हणाले.सभागृहाचा कालखंड हा पाच वर्षाचा आहे. तो संपण्याअगोदर नवीन सदस्यांचे गठीत होणे गरजेचे आहे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभा आणि लोकसभा ही केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. दरम्यान, राज्याच्या निवडणूक आयोगाने निवडणुका योग्य वेळी घेतल्या नाहीत. त्यानंतर दाखल झालेल्या याचिकेबाबत कोर्टाने देखील संविधानाला धरुन निर्णय दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले. ते अमर...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

शासन यंत्रणा
pmc pune पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्ह्याचा दौरा दि. 1 जुन 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये अनु. जाती कल्याण समिती, पुणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती,बढती, आरक्षण व अनुशेष तसेच मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ही बैठक बुधवार दि. 1 जुन 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे दरम्यान पुणे महापालिकेत अनु. जाती प्रवर्गातीलकर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बढती व आरक्षण प्रश्नी सातत्याने बोटचेपे धोरण ठेवले जात आहे. शासनाने आदेश देऊन देखील पदोन्नती दिली जात नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देवून, अनु. जातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखून धरली जात आहे. तरी या विषयाची माहिती असलेल्या पुणे शहरातील संस्था व संघटनांनी ...