Sunday, June 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत – बाळासाहेब आंबेडकरांची टीका

अमरावती/दि/
देशात संविधानाप्रमाणे वागायचे नाही असे ठरल्याचे दिसत आहे. संविधानाची घटनात्मक चौकट तोडण्याची प्रक्रिया केंद्राने सुरु केली असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत. तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून अपेक्षीत होते असेही ते म्हणाले. आयोगाला वाटेल तेव्हा निवडणुका घ्याव्यात हा निर्णय अयोग्य असल्याचे आंबेडकर म्हणाले.
सभागृहाचा कालखंड हा पाच वर्षाचा आहे. तो संपण्याअगोदर नवीन सदस्यांचे गठीत होणे गरजेचे आहे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभा आणि लोकसभा ही केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. दरम्यान,

राज्याच्या निवडणूक आयोगाने निवडणुका योग्य वेळी घेतल्या नाहीत. त्यानंतर दाखल झालेल्या याचिकेबाबत कोर्टाने देखील संविधानाला धरुन निर्णय दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले. ते अमरावतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्राकडून घटनात्मक चौकट मोडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत, त्यात सर्वोच्च न्यायालयाने भर टाकण्याचे काम करु नये असेही आंबेडकर म्हणाले. सभागृह अस्तित्वात नसताना टॅक्स गोळा करण्याचा प्रशासकाला अधिकार आहे का? हा प्रश्न कोर्टाला विचारला

असता तर कोर्टाने टॅक्स भरू नका असाच निर्णय दिला असता असे ते म्हणाले. टॅक्स लावण्याचा अधिकार हा प्रशासकाला नाही तर निवडून गेलेल्या सभागृहाला असल्याचे आंबेडकर म्हणाले. निवडणुकांची तयारी आम्ही केली आहे. आजही अमरावतीमध्ये 100

कार्यकर्त्यांचेशिबिर आयोजत केले आहे. त्याला मी उपस्थित राहणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. युपीएससी बाजूला ठेवून उमेदवारांची निवड होत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
निवडणुकांच्या बाबतीत प्रत्येक जिल्ह्याला स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील नगरपालिका, महानगपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुकीत कोणाबरोबर युती करायची आणि कोणाबरोबर नाही याचे अधिकार त्यांना दिले असल्याचे

आंबेडकर म्हणाले.