Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punelawandorder

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलीस क्राइम
राज्याचे गृहमंत्री महोदय, पुण्यातील गुटखा विक्रीकडे लक्ष देतील काय…सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपरी,चहा टपरीसह किराणामाल दुकानदार धर्म संकटातपोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात गुटखाबंदी करून दहा पंधरा वर्ष उलटून गेले तरी पुण्यात गुटखा बंदी असल्याचे कुठे जाणवत नाही. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी ही केवळ सरकारी कागदांवर असून, ती प्रत्यक्षात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते व संस्था गुटख्याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु कारवाई होत नाही. मध्यंतरी कोंढवा व वानवडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुटख्याची तक्रार केली तर त्यांच्या विरूद्ध मागाहून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात गुटखा बंदी आहे, परंतु ती केवळ कागदावर आहे हेच दाखवुन दिले आहे. सामाजिक क...
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पोलीस क्राइम
खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…! नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavanपुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत ...
पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती, पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या कामगार नाक्यावर थांबलेल्या महिला देखील सुरक्षित राहिल्या नाहीत असे आज पकडल्या गेलेल्या आरोपींच्या कृत्य व गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दि. 24 जून रोजी एका कामगार महिलेस काम देतो असे सांगून चार अनोळखी इसमांनी रस्त्यावरून चालणाऱ्या एका चार चाकी प्रवासी वाहनातून संबंधित महिला कामगार व इतरांना घेऊन जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे गाडीतून उतरून, डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट रोख असे एकूण 76 हजार रुपयांची जबरीने चोरी केल्याचा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून लुटणाऱ्या...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक स...
शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील...
पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल...
अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्मा...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील न...
गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,<br>कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

पोलीस क्राइम
bandgardenpolicepune ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून क...
हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

पोलीस क्राइम
Phoenix Market City, Vimannagar विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकान...