Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

Phoenix Market City, Vimannagar

विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,

दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकानात प्रवेश करुन दागिने खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी यांची नजर चुकवुन एक सोन्याचे ब्रेसलेट 2 लाख 82 हजार 750/- रु किचे लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 380 अन्वये गुन्हा दाखल आहे.
त्या अनुशंगाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आदेश दिले. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-4 कडील पथक यांनी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत संशयीत महिलेचा शोध घेत वडगांव शेरी येथील विठ्ठलनगर येथे आले असताना “फिनिक्स मॉल मध्ये चोरी करुन काळया रंगाची स्कुटरवरुन पळुन गेलेली संशईत महिला ही अनुग्रह सोसायटी येथे रहात आहे.“ अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

प्राप्त बातमीप्रमाणे युनिट-4 कडील पथक अनुग्रह सोसायटी, वडगांव शेरी, पुणे या सोसायटीचे पार्किंग मध्ये काळया रंगाची स्कुटर पार्क केलेली दिसली. त्याबाबत अधिक माहिती घेता सोसायटीतील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.11 मध्ये राहणारी महिलेची असल्याचे समजले. त्याप्रमाणे फ्लॅट मध्ये जाऊन खात्री करता, नमुद फ्लॅट मध्ये राहणा-या महिलेस महिला पोलीस अंमलदार वैशाली माकडी यांनी ताब्यात घेवून तिचे नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव अनु वेदप्रकाश शर्मा, वय 30 वर्षे, रा. फ्लॅट नंबर 11, अनुग्रह सोसायटी, विठ्ठलनगर, वडगांव शेरी, पुणे, मुळ रा. गांधीनगर, दिल्ली असे असल्याचे सांगितले. तिचेकडे दाखल गुन्हयाच्या अनुषांगने अधिक तपास करता, तीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 
दरम्यान दाखल गुन्ह्यातील चोरलेले 2 लाख 82 हजार 750/- रु किचे ब्रेसलेट पंचनाम्याने जप्त करणेत आले आहे. तसेच शर्मा हीस अधिक विश्वासात घेवून तपास करता तीने जुन 2022 मध्ये फिनिक्स मॉल येथील रिलायन्स ज्वेलर्स येथे अश्याच पध्दतीने एक सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची कबुली दिली त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 222/2022 भा.द.वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. 

अनु शर्मा हिचेकडून 1) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं 124 / 2023 भा. द. वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर महिलेकडून 

1)विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. 124 / 2023 भा. द. वि. कलम 380
2) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं.222 / 2022 भा.द.वि. कलम 380 हे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे. संबंधित महिला आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी विमानतळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

वरील उल्लेखनिय कामगिरी  पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे, श्री. अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे - 2, श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक, गणेश माने यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार, संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपिसे, वैशाली माकडी यांनी केली आहे.