Friday, April 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecpoffice

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाह...
पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 65 गुन्हेगारांवर व त्यांच्या टोळक्यांवर कारवाई करण्यात आलेल आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी गुन्ह्यांची आकडेवारी प्रथमच सुरू केली. त्यात मोक्का व एमपीडीएच्या किती कारवाया केल्या याचे जाहीर प्रगटन करणे सुरू केले. त्यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक पूर्ण केले आहे. सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत शतक गाठले आहे. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता व श्री. रितेश कुमार यांच्यापूर्वी मागील 50 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला असता कोणत्याही पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे किती, कु...
आंतरजिल्हा सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला पर्वती पोलीसांनी केले जेरबंद, सोनसाखळी चोरांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आंतरजिल्हा सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला पर्वती पोलीसांनी केले जेरबंद, सोनसाखळी चोरांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
जळगाव, अकोला, पुणे अमरावती शहरासह पुण्यातील पर्वती, भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या टोळीने जळगावसह अकोला, अमरावती व पुणे शहरातील भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पर्वती पोलीसांच्या तपास पथकाने ही कारवाई करून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चैन स्नॅचिंग करून दुचाकीवरील दोघे चोरटे पसार झाले. त्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं 246/2023 भा.द.वि. कलम ...
दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार दि. 20 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे गुप्त बातमी दराकडून बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6 लाख 30 हजार 750/- रु चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प...
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील ...
बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाईपुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्...
पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलीस क्राइम
राज्याचे गृहमंत्री महोदय, पुण्यातील गुटखा विक्रीकडे लक्ष देतील काय…सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपरी,चहा टपरीसह किराणामाल दुकानदार धर्म संकटातपोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात गुटखाबंदी करून दहा पंधरा वर्ष उलटून गेले तरी पुण्यात गुटखा बंदी असल्याचे कुठे जाणवत नाही. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी ही केवळ सरकारी कागदांवर असून, ती प्रत्यक्षात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते व संस्था गुटख्याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु कारवाई होत नाही. मध्यंतरी कोंढवा व वानवडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुटख्याची तक्रार केली तर त्यांच्या विरूद्ध मागाहून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात गुटखा बंदी आहे, परंतु ती केवळ कागदावर आहे हेच दाखवुन दिले आहे. सामाजिक क...
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पोलीस क्राइम
खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…! नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavanपुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत ...