Sunday, January 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecitypolice

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार दि. 20 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे गुप्त बातमी दराकडून बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6 लाख 30 हजार 750/- रु चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प्रमाण...
बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाईपुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्या पु...
पुण्यात ना पोलीसांची भिती, ना कायदयाचा धाक, रस्त्यावर पडतायत बिनधोक मुडदे, 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाणार काय…

पुण्यात ना पोलीसांची भिती, ना कायदयाचा धाक, रस्त्यावर पडतायत बिनधोक मुडदे, 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाणार काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबरी कारवाई सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए या कायदयाखाली प्रत्येकी अर्ध शतक गाठले आहे. यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांचा रेकॉर्ड मोडणार यात शंकाच राहिली नाही. दरम्यान जबरी कारवाई करून देखील आजही गुन्हेगारांच्या मनांत पोलीसांची भिती नाही, कायदयाचा धाक राहिला असल्याचे दिसत नाहीये. गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांची शहरात दशहत आहेच, कारवाईचा हाच वेग राहिला तर 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून नावलौकिक मिळवेल असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 18 ते 22 वर्षापर्यंतची मुले गुन्हेगार का होत आहेत यावर विचार मंथन होण्याऐवजी केवळ कारवाईच धडाका सुरू असल्याचे दिसत आहे. मंगला टॉकिजसमोर तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक-पुणे शहर पोलीस आय...
पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलीस क्राइम
राज्याचे गृहमंत्री महोदय, पुण्यातील गुटखा विक्रीकडे लक्ष देतील काय…सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपरी,चहा टपरीसह किराणामाल दुकानदार धर्म संकटातपोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात गुटखाबंदी करून दहा पंधरा वर्ष उलटून गेले तरी पुण्यात गुटखा बंदी असल्याचे कुठे जाणवत नाही. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी ही केवळ सरकारी कागदांवर असून, ती प्रत्यक्षात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते व संस्था गुटख्याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु कारवाई होत नाही. मध्यंतरी कोंढवा व वानवडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुटख्याची तक्रार केली तर त्यांच्या विरूद्ध मागाहून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात गुटखा बंदी आहे, परंतु ती केवळ कागदावर आहे हेच दाखवुन दिले आहे. सामाजिक कार्यक...
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पोलीस क्राइम
खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…! नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavanपुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत नाहीय...
राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात महाराष्ट्राची पुरोगामी अशी ओळख असली तरी याच पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक विषमता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरीकांवर जातीय द्व्‌ेषातून अत्याचार करणे, सामाजिक बहिष्कार, बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात 11 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत सन 2022 चा अहवाल 28 फेब्रुवारी 2023 रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा विशेष कायदा 1989 मध्ये आला. कायद्याचे नियम 1995 मध्ये तयार झाले. सुधारित नियम 2016 ला लागू करण्यात आले. नव्या नियमावली अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार या समितीच्या बैठका दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये घेणे बंधनकारक आहे. तरीही अद्याप राज्यस्तरीय दक्षता व निय...
बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोडून पो...
पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती, पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या कामगार नाक्यावर थांबलेल्या महिला देखील सुरक्षित राहिल्या नाहीत असे आज पकडल्या गेलेल्या आरोपींच्या कृत्य व गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दि. 24 जून रोजी एका कामगार महिलेस काम देतो असे सांगून चार अनोळखी इसमांनी रस्त्यावरून चालणाऱ्या एका चार चाकी प्रवासी वाहनातून संबंधित महिला कामगार व इतरांना घेऊन जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे गाडीतून उतरून, डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट रोख असे एकूण 76 हजार रुपयांची जबरीने चोरी केल्याचा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून लुटणाऱ्या टोळी...
हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील नागपूर चाळीत डिसेंबर 2016 मध्ये एका महिलेस कार्यक्रमांमध्ये नाचत असताना धक्का मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे रा. 611 कासेवाडी, गणेश मित्र मंडळाशेजारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा सात वर्षापासून फरार होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणून त्याला घोषित केले होते. दरम्यान गुन्हे युनिट एक ने फरार आरोपीस जेरबंद केले आहे. दि. 27 जुलै 2023 रोजी युनिट 1 कडील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार श्री. अमोल पवार व श्री. अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील गुन्ह्यात सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अजय उर्फ ब...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक संघटना...