
आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा
national forum Daily Crime Report 11-01-2023
आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन
सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध्...