Saturday, February 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

national forum pune

पोलीस स्टेशन – कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय

1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

 1. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,
  चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…
  3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला
  4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी
  5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडी

  बातम्या विस्ताराने-

कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा
पुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला असून या ठिकाणावरून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच लाना स्पर्श स्पा, गुलमोहर, आरसीबी बिल्डिंग पहिला मजला, फ्लॅट नंबर 1 लुल्लानगर येथील स्पा मालक व मॅनेजर यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम याच्या कलम 3,4,5, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच स्पाचे मालक व मॅनेजर तसेच पीडित महिलांना पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. कोंढव्यातील लुल्लानगर येथील कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा करपे, अजय राणे, अण्णा माने, श्री.मोहिते पुष्पेन्द्र चव्हाण या पथकाने केली आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,
चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…

पुणे/दि/ सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी करवाया वाढत असल्याचे दिसून येत आहे. हर्षद खिलारे वय 18 रा. गुलटेकडी हे फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत तळजाई पठारावरील शिंदे क्रिकेट स्टेडियम जवळील सेल्फी पॉईंटवर मित्रांसोबत मोबाईल मध्ये फोटो काढत असताना, फिर्यादीच्या ओळखीच्या तीन चार साथीदारांनी वरील ठिकाणी येऊन, तू आमच्या चिक्या भाईला का शिव्या देतो…. या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून, आता याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून फिर्यादी हर्षद खिलारे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या बाजूचे बरगडी जवळ चाकूने वार करून, त्यांना गंभीर जखमी केले.
दरम्यान फिर्यादी हर्षद खिलारे यांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र आतिश पाटोळे हा आला असता, त्याच्यावर देखील चाकूने पाठीवर मारून हातातील चाकू हवेत फिरवून कोणी मध्ये आला तर त्यालाही असेच खल्लास करू… असे म्हणून तळजाई पठारावर व परिसरात दहशत निर्माण केली आहे. एक इसम व त्याच्या तीन साथीदारांवर सहकार नगर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 307, 323, 504 व 34 तसेच महा.का 37 (एक) 135 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट क्रमांक 3 व 7 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे अधिक तपास करीत आहेत.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला
पुणे/दि/ मु. पो. तरडे (वरचे तरडे) तालुका हवेली जिल्हा पुणे येथे एक 22 वर्षीय महिला त्यांचे राहते घरासमोरील शेतात काम करीत असताना, मोटरसायकल वरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या जवळ येऊन ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने त्यांचा 12,500 रू. किमतीचा मोबाईल चोरी करून नेला आहे. मोटार सायकल वरील दोन आळखी अनोळखी इसमाविरुद्ध भादवि 392 34 प्रमाणे लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी
पुणे/दि/ श्री. अंकुश केंडे पोलीस अंमलदार मोटार परिवहन विभाग, आय. जी. एम. टी. औंध पुणे येथे तांत्रिक नेमणुकीस असून आरोपी इसम अनिल काळे वय- 19 वर्ष रा. माऊली पेट्रोल पंपा मागे बाणेर पुणे व एक अनोळखी इसम यांनी आई जी एम टी ऑफिस बाणेर औंध पुणे या शासकीय कार्यालयातील स्टेनलेस स्टीलचे पाईप असलेले जिना चढण्याचे रेलिंग किंमत 15,000 रुपये किमतीचे चोरी करून घेऊन जात असताना मिळून आला आहे. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार वाईकर करीत आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता 379, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडी
पुणे/दि/ अराफत खान यांचे कोंढवा खुर्द येथील बशीरत अल मदिना नियर ब्राईट फीचर्स स्कूल न्यू ग्रेस शाळेजवळ यांचा फ्लॅट कुलूप बंद असताना, कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घरातील फ्लॅटचा दरवाजाचे कुलूप उचकटून, त्यात आत प्रवेश करून बेडरूम मधील सोन्या-चांदीचे एकूण चार लाख 46 हजार रुपये किमतीचा ऐवज घरपोडी करून चोरी केला आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध कोंडवा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहिता 454, 457 व 380 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक भाबड करीत आहेत

पुणे शहरात तडीपार आरोपींचा वेशांतर करून वावर, क्राईम ब्रँच युनिट क्र. 2 ची धडक कारवाई,
पुणे/दि/ पुणे शहरात तडीपार केलेले तसेच पोलिसांना पाहिजे असलेले फरार आरोपी व आर्म ऍक्ट मध्ये अटक आरोपी हे पुणे शहरात गुपचूपपणे येऊन गुन्हे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी अशा तडीपार व फरार पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत तसेच यापूर्वी आर ॲक्ट 3 (25) मध्ये अटक आरोपी चेकिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले होते.
या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करून बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील ताडीवाला रोड येथे तडीपार फरार आरोपींची तपासणी करीत थांबले होते. यावेळी तडीपार इसम वसीम अब्दुल सत्तार हा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर थांबला असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अंमलदार निखिल जाधव व पोलीस हवालदार मोहसीन शेख यांना मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेऊन वसीम अब्दुल सत्तार शेख वय -24 वर्ष, रा. प्रायव्हेट रोड, इनाम मजीद गल्ली नंबर 41 यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश केला असल्याकारणामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करता बंडगार्डन पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी गुन्हे युनिट क्रमांक 2 कडील पोलीस निरीक्षक श्री क्रांतीकुमार पाटील, सपोनि विशाल मोहिते, पोलीस अंमलदार मोहसीन शेख, विनोद चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, कादिर शेख, निखिल जाधव, समीर पटेल, विनोद कोकणे, अजय थोरात, उत्तम तारू व नवनाथ राख या पथकाने केली आहे.