Thursday, March 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune news

पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस क्राइम
कायदा म्हणजे काय… सासुचे कारवाईचे आजचे स्वरूप… मटका - जुगार अड्डे चालविणाऱ्यांना धमकाविणे, पोलीस स्टेशनवर डोळे वटारूण पाहणे, कारवाई करीत असल्याचे आलेख अभिलेखा वाढविणे, दोन्हीकडे धमकावून सासुचे वजन वाढविणे,…. यातून निष्पन्न काय होत आहे….वरील अनु. क्र. 1 ते 4 चे प्रकार घडवुन- सासुचा आलेख वाढविणे आणि खात्याची प्रतिमा मलिन करणे.. यापेक्षा वेगळे ते काय…खंबीर कारवाईसाठी पुराणिक पॅटर्नच लय भारी…. कुठे हयगयच करायची न्हाई…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील तीन/चार महिन्यांत 32 पैकी काही विशिष्ठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा धडाका लावला आहे. ह्या कारवाया नेमक्या कशासाठी केल्या जात आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. अवैध धंदयावर कारवाई केली तर तो अवैध धंदा पोलीसांच्या व कायदयाच्या भीतीने बंद होणे अपेक्षित आहे. परंतु साम...
पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पोलीस क्राइम
पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळखंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाईपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्य...
पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पोलीस क्राइम
मला आमदार झाल्यासारखं वाटतय…गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुनर्रचना करणे आवश्यकपुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन… गुटख्यावर धडक कारवाई, ड्रग्जवर हातोडा, सरावलेल्या 3,700 गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई 9 गुन्हेगारी टोळयां मधील 65 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई 3 गुन्हेगार स्थानबध्द तर 42 गुन्हेगार तडीपार… आता…. आता पुढे….1) खाजगी सावकारी,2) लँड माफिया व रिअल इस्टेट,3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी4) बांधकाम व्यावसायिक5) दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर,6) फायनान्स कंपन्या व त्यांचे वसुलीचे एजंटआता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सलग पाच पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यांवर जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत तेवढ्या कारवाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्व...
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,<br>चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,
चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँग आणि अल्पवयीन मुलांकडून शहरात जबरी गुन्हे घडविले जात असल्याचे पुणे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच पोलीस स्टेशन स्तरावरून फरार आरोपींचा शोध लागत नसल्याची सततची ओरड वरीष्ठांकडून होत होती. पोलीस स्टेशन स्तरावरून गुन्ह्यांचे अन्वेषण होऊन फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत अधिकचे पाऊल उचलले गेल्यामुळे आज पुणे शहरातील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपी मिळून आले आहेत. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याकडून प्रत्येक एक फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंदननगर पोलीस स्टेशन कडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या -चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्य...
विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,<br>पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा मधील 12 ए चे पुरस्कर्ते आता भारती विद्यापीठात.. तर विशेष शाखेच्या भरत जाधवांना सामाजिक सुरक्षेची जबाबदारी… बंडगार्डनचे मानकर खंडणी विरोधी पथकातहुश्यऽऽ… अखेर विश्रामबागला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात बदलुन आलेल्या पोलीस निरीक्षकांना या बदल्यांत पदस्थापना देण्यात आली आहे. या शिवाय पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 3 सहाय्यक पोलीस आयुक्त व 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग या पदाला पुर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. तर राजेश पुराणिक यांच्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाचा भार पेलणारे व 12 ए चे पुरस्कर्ते विजय कुंभार य...
पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पोलीस क्राइम
pune police attack पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेळेस पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतही तीन/चार पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. पाच सहा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसांवर हल्ले झाले आहेत. या हल्यामागे नेमके कोण आहे.विमानतळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार श्री. सचिन जगदाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. त्यात कारण तर काय, श्री. जगदाळे हे नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यामुळे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. परंतु आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय- 24 रा. जिल्हा उस्मानाबाद याला जेवायला मिळाले नाही म्हणून त्याने पोलीसांवर चाकुने हल्ला केला अशी सर्वत्र बातमी प्रसारित झाली आहे. भले… भले… नागरीक आणि गुन्हेगारही पोलीसांपासून चार हात दूर राहतात. त्यात उस्मानाबाद म्हटल्यानंतर तर … पाहुणा...
बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

पोलीस क्राइम
वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशापुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात… पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात्‌‍… जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, जागतिक दर्जाचे ससुन हॉस्पीटल आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, पुणे रेल्वे स्टेशन आहे, रूबी व जहाँगिर सारखी हॉस्पीटल्स आहेत. त्या ठिकाणी ताडीवाला रोड व इतर स्लम परिसर आहे. याच ठिकाणी अवैध जुगाराचा बाजार भरला जातोय, याच ठिकाणी राजाबहाद्दुर मिल्स आवारात यंत्रमागाची धडधड बंद होवून तिथं आता आठ पब मधुन डीस्कोचा धडाधड आवाज धडकत आहे. आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान तर होतच आहे. परंतु हातभट्टी, गांजांची देखील विक्रीचे हब निर्माण व्हावे अशी अतिशय शोकांतिक...
नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद<br>पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/साऊथचे टपोरी चित्रपट, त्यातील जब्बर फायटींग, सोशल मिडीयावरील भाईंच्या वाढदिवसाचे पोस्टर, भाईंना घाबरून जाणारे दुकानदार, बिल्डर यामुळे आता, आपण भाई झालंच पाहिजे असे हल्लीच्या युवकामध्ये नवीन फॅशन तयार झाली असल्यासारखे वातावरण सध्या पुणे शहरात दिसून येत आहे. त्यातच खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्याच्या वसुलीसाठी त्यात अशा नवीन तयार होणाऱ्या भाईंना मोठी डिमांड वाढली असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे मोठ्ठा भाई बनण्यासाठी पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन भाईंनी तर कायदा आणि पोलीसांचा धाक मुळा मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे वर्तन ठेवले होते. त्यातच हिंदी चित्रपटातील व्हिलन सारखे ड्रग्ज घेतल्यानंतर पॉवर येते की काय असे मनांशी बाळगुन आता शहरात ड्रग्जचेही फॅड अधिक वाढले आहे. परंतु आता नवीन भाईंनो, रस्त्यावर येवून राडा कराल तर पुणे शहर पोलीस नियमितपण...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 6 लाख 50 हजार रुपयांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ पथक क्र. 2 ची धडक कारवाई

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 6 लाख 50 हजार रुपयांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ पथक क्र. 2 ची धडक कारवाई

पोलीस क्राइम
सुनिल थोपटे, योगेश मांढरे व दिगंबर चव्हाण यांची अंमली पदार्थ विरोधातील धडक मोहिम पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँगची दशहत निर्माण झाली आहे. तथापी कोयता, तलवार घेवून नाचणारे नॉर्मल स्थितीतील असल्याचे आढळत नाही. त्यामुळे कोयता किंवा तलवारी हवेत फिरविणारे हे कुठली ना कुठली तरी नशा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यात अंमली पदार्थांचे सेवन हा महत्वाचा भाग असू शकतो असे काही मानसोपचार तज्ज्ञ व डॉक्टरांनी नॅशनल फोरमशी बोलतांना व्यक्त केले होते. त्यामुळेच संबंधित कोयता व तलवारीची दहशत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत असतांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई बाबतचे वृत्त नॅशनल फोरममध्ये प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान अंमली पदार्थ विभाग क्र. 1 व 2 यांच्या थेट कारवाया सुरू होत्या परंतु इतरही पोलीस स्टेशन यांनी पुढे येवून कोयता, तलवार आणि अंमली पदार्थ विरोधाची तलवार अधिक ग...
पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पोलीस क्राइम
Eknath shinde cm पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 7 जानेवारी पासून करण्यात आले असून आज त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. तथापी काही कारणास्तव पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटनास मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना साथीनंतर तब्बल तीन वर्षानंतर ह्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला असल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले आहे. दरम्यान या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिक...