Monday, May 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: balasaheb ambedkar

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असल्याची माहिती प्रबुद्ध भारतने प्रसारित केली आहे. प्रबुद्ध भारतच्या वृत्तात नमूद केले आहे की, आमच्या सुत्रानुसार हे निमंत्रण फक्त ‘भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल असेही त्या वृत्तात नमूद केले आहे. ...
नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आमची बाळासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले. कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही तर खोटारडे पणाचा हा पराक्रम झाल्याचे आंबेडकरांनी यात म्हटले आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात अजून कोणताही कार्यक्रम सुरू झाला नाही, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडकडून अजून कोणताही संवाद झाला नाही. तर, मग निमंत्रण न देताच जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सह...
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये -सिद्धार्थ मोकळे

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये -सिद्धार्थ मोकळे

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही? याबाबत उलटसुलट विधाने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याला मी राजकिय भडवेगीरी म्हणतो. ती राजकीय भडवेगीरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे, असा घणाघाती पलटवार वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला. आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजनांचा मोठा समूह घेऊन व्यवस्थेने नाकारलेल्या, सत्तेच्या बाहेर फेकलेल्यांचा एकत्रित पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणात आणतात आणि सत्तेकडे कूच करतात. समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिंमतीने, ताकदी...
“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाल...
संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, काँग्रेस खासदार गप्प का होते -बाळासाहेब आंबेडकर

संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, काँग्रेस खासदार गप्प का होते -बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेसचे खासदार गप्प होते असं म्हणत त्यांनी काँग्रेस खासदार गप्प का होते असा प्रश्न विचारला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा आरोप केला. ॲड.आंबेडकर म्हणाले, “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत एका भाजप खासदाराने मुस्लीम खासदारासाठी भडवा, कटवा (खंता झालेला), मुल्ला दहशतवादी आणि कट्टरवादी अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अपमान केला. मला आश्चर्य वाटते की, विरोधी बाकावरील एका मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस ...
बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोविड नसता तर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी, त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे. परंतु आयोगाच्या हातात काहीही नाही. पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय ही सुनावणी पूर्ण होणार नाही. पूर्वीच्या अनेक गोष्टी परत नव्याने काढल्या जात आहे असे ते म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकार काळजीपूर्वक बघत नाही. कल्पकता असल्याशिवाय इथला दुष्काळ संपणार नाही. पाणी वळवले तर दुष्काळ संपेल अशी येथील परिस्थिती आहे. इंडिया आघाडीवर बहिष्कार घातला. कारण, ...
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा-आंबेडकर

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा-आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/जालना/दि/ प्रतिनिधी/मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारे मेले तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा. आमदार- खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार मालक आहे. त्यामुळे प्रश्नांची जाण असण़ाऱ्यांना संसदेत पाठवा. जोपर्यंत प्रश्नांची जाण असणारे संसदेत जाणार नाहीत तोपर्यंत प्रश्न तसाच राहणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांची ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षे मी लोकसभेत या प्रश्नाला अनेक वेळा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्यांच्या संबंधित हा प्रश्न आहे त्यांनी सभागृहात उदासिनता दाखविली. त्यामुळे आपण कोणाला दोष देत नाही. कोणावर टिका करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांना या प्रश्नांची ज...
‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/इंडीया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत पार पडली. भाजप विरोधात एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाहीत. वंचित सोबत नसेल तर महाराष्ट्रात इंडीया आघाडीचे भविष्य काय असेल? आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बैठकीमध्ये 2024 ला भाजपला घेरण्याचे मनसुभे आखले गेले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणात प्रबळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिले नसल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचितचा झंझावात निर्माण झाला होता. युतीची बोलणी फिस्कटल्याने वंचितने एम आय एम सोबत निवडणुका लढवल्या होत...
बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून हे सात प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोकसभेत त्यांची वापसी झाली आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यात व्यस्त आहेत. तरीही 2 वेळा माजी खासदार म्हणून मला त्यांच्यासह सहयोगी पक्षांचे मूलभूत मुद्यांकडे लक्ष वळवायचे आहे' असे म्हणत त्यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत. कोणते आहेत ते सात प्रश्न1.दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसी यांच्या खऱ्या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार...
भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर बाळासाहेब आंबेडकरांनी ओढले ताशेरे !

भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर बाळासाहेब आंबेडकरांनी ओढले ताशेरे !

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forumभाजप ओबीसींना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेय पण, ओबीसींना मंडल कमिशनद्वारे 27 टक्के आरक्षण लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान वी.पी. सिंग यांचा जयघोष करायला ते का तयार नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान वी.पी. सिंगांनी भाजपला आजार म्हटले होते म्हणून ते असं करीत आहेत का? की भाजप देशाच्या स्थैऱ्याला सर्वात मोठा धोका आहे असं म्हटलं म्हणून? की वी. पी. सिंगांच्या कार्यकाळात आडवाणी आणि त्यांच्या गुंडांना अडवून अटक करण्यात आली होती म्हणून भाजपा त्यांचा उल्लेख टाळते आहे असा रोकडा सवाल ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपला विचारला आहे. पुढे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ओबीसींना आवाहन करत असे म्हटले आहे की, “माझ्या ओबीसी बंधू आण...