Monday, April 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य सभेच्या ठरावाला कर्मचार्‍यांचा ठेंगा,

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य सभेच्या ठरावाला कर्मचार्‍यांचा ठेंगा,

सर्व साधारण
स्थापत्य आणि विद्युत विभाग म्हणजे निगरगट्टांचा अड्डा…अति.आयुक्तांना देखील स्वतःचे परिपत्रक मागे घेण्यास लावण्याची यांची हिंम्मत आहे, हे खरं आहे काय… पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकी शाखेतील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना बदली हा प्रकारच आवडत नाहीये. वर्षानुवर्षे एकाच खात्यात व एकाच विभाग-कार्यालयात राहण्याची सवय जडली आहे. नियुक्तीपासून रग्गड १०/१२ वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर, उपअभियंता पदापर्यंत संबंधित अभियंता महाशय, आहे त्याच कार्यालयात कार्यरत असतांना अनेकांनी अनेकांना पाहिले आहे. बदली आणि पदोन्नती झाली तरीही पगाराला बदलीच्या ठिकाणी व कामाला आहे त्याच कार्यालयात कार्यरत असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त श्री. बिनवडे यांनी चार परिपत...
पुण्याच्या पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मध्ये , पोलीस व गुन्हेगारांची संयुक्त आघाडी

पुण्याच्या पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मध्ये , पोलीस व गुन्हेगारांची संयुक्त आघाडी

सर्व साधारण
परिमंडळात दोनच भारी-एक समर्थ आणि दुसरे खडक पुणे/दि/ प्रतिनिधी/कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे या दोन मुख्य कामांसाठी पोलीसांची कर्तव्यावर नेमणूक केली जाते. परंतु पोलीस आणि गुन्हेगार एकत्र येवून संयुक्त आघाडी उभी करीत असतील तर त्यावर कारवाईसाठी नेमक्या कोणत्या पोलीसाची नियुक्ती करायची.एक पोलीस दुसर्‍या पोलीसाची सुपारी देत असेल, एक पोलीस हद्दीतील व हद्दीबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या इसमांना नियुक्तीवरील हद्दीत बेकायदा व गैरधंदे करण्यासाठी भागीदारी करीत असेल तर त्यावर कारवाई नेमकंपणाने कुणी करायची असा गहन प्रश्‍न आज निर्माण झाला आहे. मध्यवर्ती भारत सरकार आणि राज्य शासनाच्या सेवेतून आलेले वर्ग एक व दोन मधील अधिकारी स्वतःच्या मनाने निर्णयच घेत नसतील तर कारवाईची अपेक्षा शिपाई अंमलदाराकडून करायची काय…. पोलीसाने दिली दुसर्‍या पोलीसाची सुपारी - पुणे शहर पोलीस द...
पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…

पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/दरवर्षी डिसेंबर महिना उजडला की, पुणे शहर पोलीसांना बदलीचे वेध लागु लागतात. अमुकच एक पोलीस स्टेशन पाहिजे म्हणून पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेकांच्या वार्‍या सुरू होतात. मंत्री आणि पुढार्‍यांच्या पायर्‍या झिजवु लागतात. थोडक्यात क्रिम पोलीस स्टेशन मिळावे म्हणून अनेकजन धडपड करीत असतात. आज तीच धडपड पुणे शहरातील बहुतांश सगळ्या पोलीस स्टेशनसहित गुन्हे युनिट व आयुक्तालयातील वेगवेगळ्या सेल मध्ये सुरू आहे. चौकातील कट्टयावर थांबुन माझे पोलीस स्टेशन फिक्स झाले, आता बघा फरासखान्याला आलोच म्हणून समजा… येरवड्यात आलोच म्हणून समजा… अशा गप्पा आता सुरू झाल्या आहेत. खरंच, पुण्या मुंबईच्या वार्‍या करून मनासारखे पोलीस स्टेशन मिळते काय, हा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच मलाही पडला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच आता या प्रश्‍नांची उत्तरे देणे संयुक्तिक ठरेल. ब...
पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या ,विदयुत कामातील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी

पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या ,विदयुत कामातील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी

सर्व साधारण
पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील नोंदणीकृत ठेकेदार आशय एंटरप्राईजेस यांनी प्रमुख स्मशानभूमीत विद्युत विषयक कामे न करताच सुमारे एक कोटी रुपयांची बनावट व बोगस बिले तयार करून ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. बनावट बिल प्रकरणी मागाहुन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आशय एंटरप्राईजेस ही एकच संस्था नसुन पुण्यात अशा प्रकारच्या अनेक ठेकेदारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. पुणे शहरातील धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने देखील विद्युत विषयक कामे न करताच बीलांची अदायगी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी उपआयुक्त कार्यालयाकडे केली आहे. तसेच या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बोबडे व श्रीमती नाथी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय क...
पुण्यात बेकायदा सावकारी करणार्‍यांचा उच्छाद, शस्त्रांचा धाक दाखविणे, घराचा ताबा घेणे, घरातील सदस्यांना धमकी देणे, रस्त्यात गाठून मारहाण करण्याच्या संख्येत झाली वाढ

पुण्यात बेकायदा सावकारी करणार्‍यांचा उच्छाद, शस्त्रांचा धाक दाखविणे, घराचा ताबा घेणे, घरातील सदस्यांना धमकी देणे, रस्त्यात गाठून मारहाण करण्याच्या संख्येत झाली वाढ

सर्व साधारण
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काळ्या पैशांना बिल्डरांची साथपुण्यातील महत्वाच्या पेठा, बाणेर, खराडी, वाकड, कोंढवा, मगरपट्टा, नांदेड आदि ठिकाणच्या बांधकामात नेमका कुणाचा पैसा लावण्यात आला आहे… मंजुर लेआऊट मधील ओपन स्पेस आणि ऍमिनिटी स्पेसवर धडाधड १० ते १२ मजल्याच्या इमारती उभ्या, पण कारवाईच्या नावाने शिमगा कशासाठी…. पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. लॉकडाऊन काळात संपूर्ण देशातील उद्योग धंदे बंदच होते. त्यामुळे साहजिकच मोठ्या उद्योगांवर अवलंबुन असलेले इतर उद्योग व्यापार पूर्णपणे ठप्प अवस्थेत होता. आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु बंद पडलेला धंदा कसा सुरू करायचा या विवंचनेत असलेल्या गरजू नागरीकांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरू केला. परंतु नागरीकांच्या गरजेचा गैरफायदा घेवून, खाजगी साव...
पुणे महापालिका निवडणूका होईपर्यंत आता कुणाच्याही बदल्या नाहीत…, खाते प्रमुखांनी प्रशासकीय मान्यतेशिवाय खात्यामध्ये परस्पर बदल करू नयेत

पुणे महापालिका निवडणूका होईपर्यंत आता कुणाच्याही बदल्या नाहीत…, खाते प्रमुखांनी प्रशासकीय मान्यतेशिवाय खात्यामध्ये परस्पर बदल करू नयेत

सर्व साधारण
पुणे/ दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ लगतच्या काळात होणार आहेत. अशा परिस्थितीत क्षेत्रिय स्तरावर कामकाज सुरू झाले असल्याने स्थानिक माहितगार कर्मचारी यांची बदली केल्यास निवडणूक कामकाजामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अभियांत्रिकी संवर्गातील कोणत्याही कर्मचार्‍याची विहीत सेवाकालावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्याबाबत किंवा अतिरिक्त पदभार देण्याबाबत परस्पर निर्णय घेण्यात येऊ नयेत असे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी आज काढले आहेत. काय आहेत नेमके आदेश -पुणे महापालिका सभासद व खातेप्रमुख यांच्याकडून अभियांत्रिकी संवर्गातील विविध पदांवरील सेवकांची बदलीसाठी विहित सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्याबाबत किंवा अतिरिक्त पदभार देण्याबाबत खात्याची आवश्यकता विचारात न घेताच वारंवार प्रस्ताव सादर होत असल्याने बदलीबाबत आदेश द...
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

सर्व साधारण
उपायुक्त जयंत भोसेकरांकडून होत होती पाठराखण, अखेर गिते आणि परदेशी निलंबित….,रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण /धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील निविदा कामात झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर चौकशी होवून, अखेर शाखा अभियंता अजय परदेशी आणि कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता. कामे न करताच बिलांची वसूली करण्यात येत होती. एका ठिकाणी कामाचे क्षेत्र दाखवुन दुसर्‍या ठिकाणी ...
पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

सर्व साधारण
पुणे महापालिकेचं बांधकाम विभाग पुणेकरांच्या जीवावर उठलय…अबबऽऽ… दीड गुंठ्यावर ११ मजली इमारतधन्य ते पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील जुने वाडे आणि अंतर्गत रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकसंख्या वाढली परंतु अंतर्गत रस्त्यांची लांबी आणि रूंदी आहे तेवढीच आहे. त्यामुळे बांधकाम नियमानुसार रस्तारूंदी क्षेत्र सोडून बांधकामांना परवानगी देण्यात येत असली तरी, नियमानुसार कुणीही बांधकाम परवानगी घेत नाही. बांधकाम व्यावसायिक रस्तारूंदी क्षेत्र शून्य ठेवून अनाधिकृत बांधकामे करीत आहेत. मध्यवर्ती पुण्यातील रास्तापेठ व सोमवार पेठेत सध्या दर आठवड्याला एक स्लॅब पडत आहे, दिवस-रात्र बांधकामे केली जात आहेत. तरी देखील बांधकाम विभागातील अभियंते अनाधिकृत बांधकामांना अटकाव न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. तक्रार अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जात ना...
पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

सर्व साधारण
कनिष्ठ अभियंत्यांची बदली… हाकलपट्टी की प्रकरण दाबुन टाकण्यासाठी करण्यात आलेले नाटक….. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/माहितीच्या अधिकारात अपिल सुनावणी सुरू असतांना, कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीने प्रथम अपिल सुनावणीत अर्जदाराला धक्का मारल्याचा बहाणा करून, त्यांना शासकीय कार्यालयात गलिच्छ शिवीगाळ करून चल इथून निघुन जा म्हटल्याचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीने पुणे महापालिकेत राडा घातल्याने सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अर्जदार श्री. दीक्षित यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आलेली असतांना, आज एक आठवडा उलटून गेला तरी कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीखेरीज कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, पत्नीचे राडा प्रकरण दाबुन टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. रामचंद्र शिंदे यांची ...
बांधकाम विभागातील २०० कोटींचा गैरव्यवहार लपविण्यासाठी….गुन्हेगारी टोळ्यांसह आता तृतीयपंथी व महिलांचाही वापर….

बांधकाम विभागातील २०० कोटींचा गैरव्यवहार लपविण्यासाठी….गुन्हेगारी टोळ्यांसह आता तृतीयपंथी व महिलांचाही वापर….

सर्व साधारण
दिक्षित लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेले, मग जिन्यात धक्का दिला तरी कसा… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ७ च्या कार्यालयात सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा मोठा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार अनेक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांनी केलेली आहे. तसेच अजुनही पुण्यातील पेठांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची माहिती घेत असतांना, माहिती अधिकारात अर्ज करू नये यासाठी अर्जदारांना बांधकाम व्यावसायिकांच्या गुंडाकरवी धमकाविले जात आहे, जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे, कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. तथापी अशाही परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते काम करीत असतांना आता त्यांच्या अंगावर तृतीयपंथी व महिलांना पाठवुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामु...