Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मध्ये , पोलीस व गुन्हेगारांची संयुक्त आघाडी

परिमंडळात दोनच भारी-एक समर्थ आणि दुसरे खडक


पुणे/दि/ प्रतिनिधी/
कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे या दोन मुख्य कामांसाठी पोलीसांची कर्तव्यावर नेमणूक केली जाते. परंतु पोलीस आणि गुन्हेगार एकत्र येवून संयुक्त आघाडी उभी करीत असतील तर त्यावर कारवाईसाठी नेमक्या कोणत्या पोलीसाची नियुक्ती करायची.एक पोलीस दुसर्‍या पोलीसाची सुपारी देत असेल, एक पोलीस हद्दीतील व हद्दीबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या इसमांना नियुक्तीवरील हद्दीत बेकायदा व गैरधंदे करण्यासाठी भागीदारी करीत असेल तर त्यावर कारवाई नेमकंपणाने कुणी करायची असा गहन प्रश्‍न आज निर्माण झाला आहे. मध्यवर्ती भारत सरकार आणि राज्य शासनाच्या सेवेतून आलेले वर्ग एक व दोन मधील अधिकारी स्वतःच्या मनाने निर्णयच घेत नसतील तर कारवाईची अपेक्षा शिपाई अंमलदाराकडून करायची काय….


पोलीसाने दिली दुसर्‍या पोलीसाची सुपारी – पुणे शहर पोलीस दलातील बेदिलीचा कडेलोट –
कालच पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. १ मधील बातमी लिहीत असतांनाच अचानक, दत्तवाडी आणि फरासखान्यातील पोलीसांनी पोलीसाला ठार करण्याची सुपारी दिल्याची बातमी धडकली. त्यात आश्‍चर्याचा धक्का बसण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु पोलीसांच्या कृत्यांचा मात्र कडेलोट झाला आहे. मागील अंकातच आम्ही पुणे शहर पोलीस दलात कशी बेदिली माजली आहे, याची काही उदाहरणे दिली होती. आणि आज ही बातमी धडकली आहे.
सबंधित पोलीस कर्मचार्‍याला ठार कर, मारहाण कर नाहीतर अपघातात अपंगत्व आले तरी बेहत्तर पण त्याला कसेही करून संपवून टाक. मारून टाक. त्यात त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहुन घेईन, इतःपर्यंत त्या पोलीसाची मजल गेली आहे. पेरॉलवर सुटलेल्या गुन्हेगाराकरवी हे कृत्य करून घेत होता. याचा अर्थ पोलीस आणि गुन्हेगारांची ही संयुक्त आघाडी किती वर्षांपासून अबाधित आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पोलीस आयुक्त – मोक्का आणि तडीपारी –
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर, शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शंभरावर दोन जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याच्या बातम्या आणल्या गेल्या आहेत. परंतु वास्तवात ज्यांच्यावर मोक्का व तडीपारीची कारवाई केली, त्या तडीपारीतील अनेक गुन्हेगार आजही पुणे शहर व आसपास वास्तव्याला आहेत, कोंबिंग ऑपरेशन करून त्यानंतर पुनः या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत असली तरी तडीपार असलेले गुन्हेगार हे पुणे शहरात वास्तव्याला आहेत याची माहिती पोलीसच देत आहेत.
त्यामुळे तडीपारी केली, मोक्का अंतर्गत कारवाई करून अब तक ५६च्या पुढे गेले असले तरी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता आले आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. गुन्हेगारांवर नियंत्रण आणि गुन्हेगारी साम्राज्य उध्वस्त करणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. मोक्का आणि तडीपारी ही मलमट्टी आहे, कायमचा उपाय नाही. त्यामुळेच पुणे शहरात गुन्हेगारी साम्राज्य टिकुन आहे.
पोलीस आणि गुन्हेगारांची संयुक्त आघाडी -संयुक्त भागीदारीचे उद्योग –
पुणे शहर पोलीस दलात, पोलीस आणि गुन्हेगारांची संयुक्त आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ज्या गुन्हेगारांना तडीपार केले होते, ज्यांच्या यापूर्वी देखील मोक्का सारख्या गुन्ह्यात कारवाई केली होती, त्या सर्व गुन्हेगारांनी पोलीसांशी संयुक्त आघाडी अर्थात संयुक्त भागीदारी करून अनेक उद्योग व व्यवसाय सुरू केले आहेत. अवैध आणि बेकायदा स्वरूपाचे अधिक व्यवसाय असून यात लॉटरी, मटका, जुगार अड्डे यांचा मोठा समावेश आहे. त्यानंतर मसाज पार्लरच्या, स्पाच्या नावाखाली सुरू असलेले वेश्यालये, लॉजेस आणि रेस्टोबारच्या माध्यमातून सुरू असलेली अंमली पदार्थांची विक्री या सर्व बेकायदा आणि गैर धंदयामध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांची संयुक्त आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोणत्याही पानाच्या टपरीवर गेलात तरी गुटखा हा हमखास मिळतोच. आता तर गांजाच्या पुड्या देखील मिळत आहेत. पब मध्ये तर दिवस रात्रौ अंमली पदार्थांची विक्री आणि वापर होत आहे. तर कोकेन मॅफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ देखील सर्रासपणे मिळत आहेत. यामागे पोलीसांचे कडक संरक्षण हेच त्याचे उत्तर आहे.

पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. १ हद्दीतील पोलीस आणि गुन्हेगारांची संयुक्त आघाडी –
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. १ यांच्याकडे एकुण सहा पोलीस ठाणी आहेत. पैकी फरासखाना येथील एका पोलीस कर्मचार्‍याने दुसर्‍या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याची सुपारी दिल्याचे उदाहरण ताजेतवाणे असतांना, उपाआयुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यक्षेत्रातील समर्थ पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन ही तीन पोलीस स्टेशन आज आघाडीवर आहेत. सगळे गैर व बेकायदा धंदे याच पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील नोंदी व कारवाई वरील सगळे बेकायदा धंदे आजही सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका एका पोलीस स्टेशन हद्दीत गॅम्बलिंग व एनडीपीएसचे ५०/ ५० धंदे कार्यरत असल्याचे आजही दिसून येत आहे. यामागे गुन्हेगार आणि पोलीसांची संयुक्त आघाडी असल्याखेरीज अशा प्रकारचे गैरधंदे सुरू राहणे शक्यच नाही.


पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मधील समर्थ पोलीस स्टेशची भरारी आणि घोडदौड-
पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले व पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यक्षेत्रातील समर्थ पोलीस स्टेशन यांची संपूर्ण परिमंडळात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत गॅम्बलिंग, एनडीपीएस अवैध धंदे सुरू आहेतच. या शिवाय समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत असलेले एकुण ४८ लॉजेस मधील वेश्या व्यवसाय हा तर कुप्रसिद्ध आहे. तसेच रेस्टोबारच्या माध्यमातून मद्यपींचा राडा हे देखील कुप्रसिद्ध आहे.
सध्या परिमंडळ एक मध्ये समर्थ पोलीस स्टेशन यांनी आघाडी घेतली आहे. युनियन स्कुल शेजारील गल्ली व सिंचन भवन रोडवरील अप्पाचे गोलगप्पे प्रसिद्ध आहेत. प्रकाशातील कोमकर, शांताई मधील क्लब,सगळीकडे आनंदी आनंद आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी सातत्याने या सगळ्या धंदयाचे रक्षण करण्यासाठी तैनात ठेवण्यात आलेला आहे. कारण जिथं रिस्क असते, तिथे त्याची एंन्ट्री फिक्स असते, असंच त्यानं त्यांच्या मोबाईलच्या व्हॉटसऍप डीपीवर स्टेटस ठेवलं आहे. कारण बेकायदा गैरकृत्य करणार्‍या धंदेवाल्यांना सर्वसामान्य स्थानिक पुणेकर नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे कार्यकर्ते, पत्रकार यांचा त्रास सहन करावा लागतो. यांना नियंत्रणात आणून धंंदा कायम ठेवणे हे खरं तर रिस्की असते. एवढी रिस्क ते घेत असतात.


खडकची तडक-भडक –
खडक हद्दीतही जुगार,मटका, क्लब यांचे पेव फुटले आहे. प्रसिद्ध प्यासा समोरील गल्लीतील भाईचा धंदा तर तेजित आहे. कासेवाडी, लोहियानगरातील लहान मोठे मिळुन १०/१२ धंदे ते कोरोना लॉकडाऊन काळातही सुरू आहे. त्यामुळे आता तर त्यांनी आघाडी घेतली आहे. सगळे अलबेल आहे. एक आकडी लॉटरी सुसाट झाली आहे. क्लब आणि अंमली पदार्थांची देखील चलती आहे. नंदूवर मोक्का लावल्याने पोलीसांची कमाईवर तसा काहीच फरक पडला नाही. उलट नव्याने काही भाई उदयाला आले आहेत. यामागे खडकची तडफ व दिलदारपणा दिसून येत आहे.
इतर फरासखान्यात नेहमीसारखे उद्योग व्यवसाय भरभराटीला आले आहेत. डेक्कन आणि शिवाजीगनर स्पा आणि पार्लर, हॉटेलिंग मध्ये सुस्त आहे. सगळं मस्त चाललं आहे. तरीही पोलीस उपआयुक्त परिमंडळात सगळे अलबेल असल्याचे दाखविले जाते हे विशेषच म्हणावे लागेल.
आता पुढे जावुन समर्थ, खडक, शिवाजीनगर, डेक्कन आणि फरासखाना पो.स्टे चा स्वतंत्रपणे पोलीस आणि गुन्हेगारांच्या संयुक्त आघाडीचा आढावा घेवू. तुर्तास इतकेच.