भारतात डॉक्टरांना ओळखता येत नाही क्षयरोगाची लक्षणे
नवी दिल्ली/दि/ भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे क्षयरोग
या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ
शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.
या अभ्यासात
त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते जे या आजाराची लक्षणे दाखवण्याचा अभिनय
करु शकतील. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असून भारत, चीन आणि इंडोनेशियासहीत इतरही
काही देशांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, २०१७ मध्ये
या आजाराने १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी बुधवारी
संयुक्त राष्ट्रमध्ये एक वैश्विक आरोग्य संमेलन आयोजित केले होते, परंतु हा गंभीर
आजार दूर कऱण्यात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर कमी पडत आहेत. जे रुग्णांना सुरुवातीला
त्य...