
रविंद्र बराटे कुठं आहे
पुणे महापालिकेतील अभियंते, मध्यवर्ती पेठातील बांधकाम व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्याशिवाय रविदर्शन कठीणच
पुणे/दि/ प्रतिनिधी/खंडणी, बेकायदा सावकारी, फसवणूकीच्या प्रकरणातील फरार तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटेनी पुणे शहरातील १५ हजार पोलीस, ५ गुन्हे शाखा, शंभरावर वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस स्टेशनच्या कडक पहार्याला वाकुल्या दाखवित आहे. अहोरात्र पोलीस यंत्रणा सज्ज असतांना देखील रवींद्र बराटे शोधूनही सापडत नाही. बराटेशी संबंधित सहा ठिकाणी पोलीसांनी छापासत्र केल्यानंतर, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलमालक, पुणे महापालिका, शासकीय कार्यालयातील ठेकेदार तसेच शासन व महापालिकेतील शेकडोंनी फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान सोन्याची अंडी देणारे पुण्यातील पेठांमध्ये ज्यांनी सोन्याच्या अंड्याची उबवणी केंद्र बांधली आहेत, त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय सध्यातरी रविदर्शन होणे शक्य...