Tuesday, April 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

१०० दिवस झाले, रविंद्र बराटे अजूनही फरार

बुधवार, शुक्रवार,कसब्यातील बांधकाम प्रकल्पात बराटेचा निधी,
चूना मनपाला, चुड सामाजिक कार्यकर्त्यांना, लावण्याचा प्रशांतव्यापी विक्रमाची नोंद करण्याचे सोपान आतातरी पूर्ण झालं का

पुणे/दि/ प्रतिनिधी/
शासनात असलेली पराकोटीची ब्रिटीशकालिन गुप्ततेचा भंग करून, भारतीय संविधानाने माहितीचा कायदा नागरीकांसाठी खुला केला. प्रशासनात काहीअंशी बदल झाले. माहिती उघड होण्याच्या भितीने मनमानी कारभाराला काहीअंशी चाप बसला, परंतु काही प्रशासकीय अधिकार्‍यांचे माहिती अधिकारामुळं पितळ उघडे पडले असले तरी या पितळाचे रूपांतर काही मंडळींनी सोन्यात केले आहे. माहिती अधिकार कायदयाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १५ वर्षात प्रशासनात अनेक बदल झाले असले तरी माहिती अधिकार कायदयाचा दुरूपयोग करून काहींनी कोट्यवधी रुपये कमाविण्याचे महसुली अड्डे उभे केले आहेत. तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता, पोलीस आणि पत्रकारांच्या मदतीने २७०० कोटी रुपयांची उलाढाल करू शकतो यावर कुणाचा विश्‍वास बसत नसला तरी हे सत्य आहे. रविंद्र बराटे व त्याच्या साथीदारांनी १५ वर्षात सत्ताविसशे कोटी रुपयांची स्थावर व जंगम मिळकती संपादन केल्या असल्याचे पोलीसांचा अंदाज आहे. तसेच त्याच्या ६ ठिकाणी केलेल्या घरझडतीत सुमारे दोन ट्रक भरून माहितीच्या फाईल्स आढळुन आलेल्या आहेत.

माहिती अधिकाराचा असाही वापर होवू शकतो हे घटनाकारांच्या ध्यानी मनी सुद्धा नसेल इतकं कृत्य तथाकथित माहिती अधिकार कार्रकर्त्यांनी करून दाखविले आहे.
दरम्यान पुणे शहर पोलीस दलातील १५ हजार पोलीस, १०० वरीष्ठ पोलीस अधिकारी, ३० पोलीस स्टेशन आणि ५ गुन्हे शाखेच्या युनिट्सनी जंग जंग पछाडले तरी रविंद्र बराटे हा आढळुन आलेला नाही. एका बाजूला संपूर्ण पुणे शहर पोलीस दल आणि दुसर्‍या बाजूला रविंद्र बराटे असा हा सामना सुरू आहे. संपूर्ण पुणे शहर पोलीस दलाला एका तथाकथित कार्रकर्त्याने आव्हान उभे केले आहे. रविंद्र बराटे हे कृत्य एकट्याने करू शकत नाही. त्याच्यामागे पुण्यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिक उभे आहेत. त्यामुळे त्याला कुठे लपविले आहे ह्याचा पत्ता ते स्वतःच देवू शकतील. तोंडी मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र बराटे व त्याच्या साथीदारांनी ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे केले आहेत, त्या सर्व गुन्ह्यांचा समांतर एकत्रित तपास कोथरूड पोलीस ठाण्यातून केला जात आहे. तसेच काही नवनवीन गुन्ह्याचे प्रकार समोर येत आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम वेगाने सुरू आहे. परंतु बराटे आणि कंपनी अद्याप पर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नाही.


बुधवार, शुक्रवार,कसब्यातील बांधकाम प्रकल्पात बराटेचा निधी


पुण्यातील जुने वाडे खरेदी करणे, संयुक्तरित्या विकसित करणे, बळजबरीने कब्जा करणे, विनावारस वाड्यांवर कब्जा करण, माहिती अधिकारात महसुली पुरावे गोळा करणे आदि पराक्रम करून, रविंद्र बराटे आणि त्याच्या टोळीने पुण्यातील पेठांमध्ये धुडगूस घातला होता.
रविंद्र बराटे याने काही बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून, वेगवेगळ्या फर्म स्थापन करून, बांधकाम प्रकल्प केले आहेत. एका नकाशाला पुणे मनपाकडून मंजुरी घ्यायची आणि दुसर्‍याच प्रकारचे बांधकाम करण्याचा सपाटा सुरू होता. यामागे पुणे महापालिकेतील काही अभियंते सामिल आहेत. त्यामुळे पुण्यातील पेठांमध्ये वेगाने बेकायदा बांधकामे झाली आहेत. विशेषतः आजपर्यंत त्यांना मिळकतकर विभागाने देखील त्यांची आकारणी केली नाही. ह्यामागे बराटेशी माहिती अधिकारातील दहशत, विरोध करणार्‍यांना पत्रकारामार्फत पुण्यातील आघाडीच्या दैनिकात विरोधी बातम्या प्रसारित करणे आणि पोलीसामार्फत बेकायदा दंड शक्तीचा वापर करून त्यांच्यावर बोगस आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे.
पुणे महापालिकेत साधा ठेकेदार म्हणून काम करीत असलेले दोन तीन इसम आज रविंद्र बराटेमुळं आज ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून वावरत आहेत. ज्या बेकायदा कामांना पाठींबा दिला, तोच अभियंता आज शहर अभियंत्यांच्या ऍन्टी चेंबर मध्ये थेट प्रवेश करीत आहे. रविंद्र बराटेची पाळमुळं पुणे महापालिकेत आणि बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पात असतांना देखील पोलीस विनाकारण इकडं तिकडं फिरून वेळ का घालवित आहेत हा एक प्रश्‍नच आहे.
रविंद्र बराटेवर एकुण ४ + १५ एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्याला पकडता आले नाही ही मोठी शोकांतिका आहे.


चूना मनपाला, चुड सामाजिक कार्यकर्त्यांना, लावण्याचा प्रशांतव्यापी विक्रमाची नोंद करण्याचे सोपान आतातरी पूर्ण झालं का –


रविंद्र बराटे आणि त्याच्या साथीदार पोलीस आणि पत्रकारांकरवी काही बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प धडाधड मंजुर करण्यात आले. नियमबाह्य कामे असतांना देखील त्यांना पार्ट कम्प्लीशन देण्यात आली आहेत. बहुतांश प्रकल्पाचा वापर सुरू असतांना देखील कर आकारणी नाही. मिळकत कर शून्य आहे. पुणे महापालिकेला चूना लावण्याचे काम रविंद्र बराटे आणि त्याच्या बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे. ज्या वाडेधारक मालक व भाडेकरू यांचे नुकसान झाले आहे, त्यांची फसवणूक झाली आहे, त्यांची नोद पोलीस घेत नाहीत हे विदारक सत्य आहे.


तसेच याविरूद्ध आवाज उठविणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकुण १२ तक्रार अर्ज सादर आहेत. काही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना चूड लावण्याचे काम देखील रविंद्र बराटे आणि त्याच्या पोलीस आणि पत्रकार व गुन्हेगारी टोळीने केले आहे. हे वास्तव आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबतचा अर्ज सादर आहे. आरोपींची नावे देखील समोर आणली आहेत. त्यांना अटक तर सोडाच परंतु साधी चौकशी देखील करण्याचे काम पोलीस करीत नाहीत हे भिषण वास्तव आहे.
पुणे महानगरपालिकेला चूना लावून सामाजिक कार्यकर्त्यांना चुड लावण्याचा प्रशांतव्यापी विक्रमाची नोंद करण्याचे सोपान पूर्ण झालं आहे. आता पोलीसी कारवाईच शिल्लक आहे. ती विहीत वेळेत होईलच यात शंकाच नाही. हे पुणे पोलीस आहे, थोड थांबुन का होईना, कारवाई ही होणारच हे देखील वास्तव आहे.