सरकारी कर्मचार्यांनाही ड्रेस कोडचे बंधन, … आणि पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांना शिष्ठाचाराचे रट्टे देण्याची गरज
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/शासकीय कर्मचार्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांना देखील डे्रस कोड बरोबरच शिष्ठाचार पाळण्याचे रट्टे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग याकडे लक्षच देत नाहीये. सेवक वर्ग विभाग म्हणजे सध्या तरी पाणथळ जागेत रवंथ करण्यासाठी बसलेल्या गुरांचा तांडा झाला आहे.
राज्य शासनाने त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्यांसाठी डे्रस कोड लागु करण्यात आला आहे. शासकीय कार्यालये व मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही. महिलांनाी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचार्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.गडद रंगाच...