बनावट पीएसडी व बोगस कामे करणार्या ठेकेदाराची देयक काढण्याचा आदेश सा.बां.मंडळींनी दिलाय?
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्याच्या सा.बां. खात्यातील निविदा कामांचे टेंडर भरत असतांना, बनावट व बोगस पीएसडी सादर करून, शासनाची फसवणूक करणार्या ठेकेदारावर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप पावेतो अटक केली नसली तरी पुण्याच्या सा.बां. नियमावलीनुसार, फसवणूक करणार्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची शिक्षा दिल्याचे तोंडी सांगण्यात येत आहे. दरम्यान ठेकेदाराने बोगस कामे दाखवुन ज्या प्रकारे बील सादर करून देयक काढली जात आहेत, त्यावरून, बनावट व बोगस कामे आणि पीएसडी सादर करणार्याची देयक काढण्याचा आदेश अधीक्षक अभियंत्यांनी दिला आहे काय अशी प्रश्नावली दस्तुरखुद्द पुण्यात विचारली जात आहे.
पुण्याच्या सा.बां विभागात १० लाखापासून ते २ दोन कोटीपर्यंतची निविदा कामे २० टक्के बिलो, ३० टक्के बिलो या दराने भरून, निविदा कामांच्या वर्कऑर्डर पदरात पाडून, पुन्हा कामे विहीत वेळ...