Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या सा.बां. विभागातील स्थापत्य अभियंता सहायकांची बदली होतच नाही

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील बदल्या हा एक चर्चेचा विषय झाला आहे. अधीक्षक अभियंता हे नियमानुसार बदल्यांचे आदेश जारी करतात, परंतु बदलीच्या जागी कुणीच हजर होत नाही. पुण्याच्या सा.बां. विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसण्याचा ठेका इथल्या कर्मचार्‍यांनी घेतला आहे. अधीक्षक अभियंत्यांचा आदेश असला तरी तो बासनात कसा गुंडाळून ठेवायचा ह्याच गणित या खात्यातील अभियंत्यांना पुरतेपणी ठाऊक झाले आहे. त्यामुळे पुण्यातील सा.बां. विभागातील बदल्यांबाबत काही ठोस निर्णय अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण हे घेणार आहेत की, ये रे माझ्या मागल्या म्हणून कारकुनी पद्धतीचा कारभार करणार आहेत असा प्रश्‍न आज याच खात्यातील कारभारी मंडळी करीत आहेत.


मागच्या आठवड्यात पुण्यातील सा.बां. विभागातील क.लि. बाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर, आता याच विभागातील स्थापत्य अभियंता सहायक यांच्या बदल्याच होत नसल्याची माहिती हाती आली आहे. पुण्यातील सा.बां. विभागातील शाखा अभियंता कार्यालये, उपअभियंता कार्यालयातून स्थापत्य अभियंता सहायक पदाची पोस्ट आहे. या पदांवर देखील १० ते १५ वर्षे एकेकच व्यक्ती कार्यरत आहे. तेथे नवीन अभियंत्यांना संधीच दिली जात नाही.
थोडक्यातच सांगायचे तर पुण्यातील कौन्सिल हॉल शाखेतील एक स्थापत्य अभियंता सहायक आहे. ते गेली १० ते १२ वर्षे आहे त्या पदावर कार्यरत आहेत. त्यांची बदली होत नाही. तसेच आता त्यांना याच विभागातील एका महत्वाच्या खुर्चीवर जावून बसायचे आहे, त्यामुळे शाखा अभियंता कौन्सिल हॉल यांनी स्वतःचे वजन खर्च करून, अधीक्षक अभियंत्यांच्या मागे धोशा लावला आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी या महाशयांची शिफारस केली असल्याचे समजते. राजभवन, वैदयकीय विभाग, क्र. २, ३, आणि विशेष म्हणजे क्र. एक मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांची अशीच अवस्था आहे.
सा.बां. पुणे विभागातील उपविभाग क्र. एक मधील एक लिपिक वर्गीय कर्मचारी असून त्यांच्यासाठी देखील कौन्सिल हॉलच्या शाखा अभियंत्यांनी स्वतःची शिफारस चालविली असल्याचे समजले आहेत. पुण्यात अधिक्षक अभियंता या पदावर अतुल चव्हाण नामक अभियंता आल्यापासून काही अधिकारी आनंदोन भरभरून गेले आहेत. जस काय त्यांचा सख्खा भाऊच या पदावर बसल्या सारखे ते वागत आहेत. बदल्यांची कामे या दोघानिघांमार्फतच होत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी स्वतःबुद्धी, परबुद्धीपेक्षा शासनाने विनिर्दिष्टीत केल्यानुसार, आदेशानुसार बदल्या करून, संबंधितांना त्यांच्या जागी रवाना करण्याची जबाबदारी आहे. ते ऐकत नसतील तर एक दोन इन्क्रीमेंट थांबविण्याची धमक अंगात ठेवणे आवश्यक आहे. (अशंतः उत्तरार्ध पुढील अंकात)