Friday, May 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या सावरकर भवन येथील बांधकाम विभागाच्या झोन क्र. ७ च्या कार्यालयाने नागरीकांना येण्यापासून परावृत्त करण्यासाठी दाराला आतुन बाकडाच आडवा लावला- हा आयुक्तांचा आदेश आहे की, कुणाचा नकटा कारभार…?

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन हळु हळु संपुष्टात येवून पाचव्या टप्प्यांवर अनलॉकडाऊन आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील सर्व कार्यालये पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. सर्व क्षेत्रिय कार्यालये आणि उपायुक्त कार्यालये देखील पूर्वी सारखी सुरळीत सुरू झाली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी देखील विहीत वेळेनुसार कर्तव्यावर हजर आहेत. तथापी पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातील झोन क्र. ७ चे कार्यालय सावरकर भवन, बालगंधर्व जवळ आहे. या कार्यालयाने पुण्यातील नागरीकांना आत प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्यासाठी दाराला आतुन बसण्याचा भला मोठा बाकडा आडवा लावुन ठेवला आहे. तसेच अभियंत्यांच्या टेबलाजवळ दोरी रश्शी बांधून ठेवली आहे.
सावरकर भवनात बांधकाम विभागाची आणखी दोन कार्यालये आहेत. तिथे मात्र काहीच अडचण नाही. मग झोन क्र. ७ मध्येच नेमकं दाराला आतल्या बाजूने आडवा बाकडा लावुन नागरीकांना प्रवेश बंद नेमका का करण्यात आला आहे. हा आदेश पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे काय…. शहर अभियंता कार्यालयाने दिला आहे काय… असा प्रश्‍न पडतो. परंतु शहर अभियंता कार्यालयात देखील येण्यापासून कुणी वंचित ठेवत नाही. मग बांधकाम विकास विभागाच्या झोन क्र. ७ मध्ये आडवा बाकडा लावण्याचा नकटा कारभार नेमका कुणी केला… कुणाच्या आदेशाने हा आडवा बाकडा लावुन नागरीकांना आत येण्यापासून परावृत्त करीत आहेत. बांधकाम विकास विभागाच सावरकर भवन मधील कार्यालय हे पुणेकरांचे आहे आणि पुणेकरांनाच आत येण्यापासून हे वंचित ठेवणारे नेमके कोण आहेत.
ज्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची एवढी भिती वाटत आहे त्यांना सरळ घरचा रस्ता दाखविणेच योग्य आहे. पुणेकरांबरोबर असल्या प्रकारचा भेदभाव कशासाठी…एवढा मोठा नकटा कारभार करीत असतांना इतर अधिकारी गप्प ते कसे… या सर्व प्रकरणांचा योग्य तो तपास करून दोषी विरूद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी कसबा पेठेतील नागरीकांनी व्यक्त केली आहे.