Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

देशातील ८ एजन्सीज माझा फोन टॅप करतायत; बाळासाहेब आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

देशातील ८ एजन्सीज माझा फोन टॅप करतायत; बाळासाहेब आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/तब्बल आठ एजन्सीकडून माझा फोन टॅप केला जात आहे. माझे त्याबद्दल काहीही आक्षेप नाही. त्यांनी खुशाल माझा फोन टॅप करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी याबद्दलचे उत्तर दिले. माझं फोन टॅपिंग होतो. माझा फोन आता ऑन केला तरीही फोन टॅप होतो हे मी दाखवू शकतो. माझा फोन टॅप करणार्‍या एक एजन्सी नाही. आठ एजन्सी आहेत. त्यांच्याकडून फोन टॅप केला जात आहे, असा खळबळजनक दावा बाळासाहेब आंबेडकरांनी केला आहे. मी खुशाल म्हणतो, माझे फोन टॅप करा. माझे त्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही. मी कोणत्याही गुन्हेगाराशी बोलत नाही. तसेच कोणालाही फोन करुन पैसे मागत नाही, असेही ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांना कणा नाहीमहाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे...
५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ- राज्य सरकार

५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ- राज्य सरकार

राजकीय
पुणे/दि/इंद्रा सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असा युक्तीवाद राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात आली. यावेळी इंद्रा साहनी खटल्यानंतर घालून देण्याती आलेली ५० टाक्यांची मर्यादा आ फार काळ धरून बसता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी यांनी मांडली.याचवेळी राज्य सरकारचे दुसरे वकील पटवाले यांनी सुद्धा युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या रिपोर्टचे वाचन केले. यावेळी न्यायालयाने काही प्रश्नही उपस्थित केले.त्यानंतर पटवाले यांनी पुढील युक्तिवादसाठी सोमवारपर्यंत वेळ मागून घेतला..त्यामुळे आता मुख्य सुनावणीला सुरुवात झाली...
देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्या’त सापडले, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्या’त सापडले, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

राजकीय
मुंबई/दि/मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्यानंतरही तब्बल तीन महिने उशिरा फडणवीस सरकारने राज्यात आरक्षण कायदा मंजूर केला होता, आणि त्यामुळेच आज हा मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडले असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये आरक्षण संदर्भात १०२ वी घटना दुरुस्ती करत, राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही. हे स्पष्ट केले. तसेच असे आरक्षण या घटना दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतींना देता येते असेही स्पष्ट केले.त्यानंतर फडणवीस सरकारने आरक्षण कायदा राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ मंजूर केला. मात्र, घटनादुरुस्ती आधीच केली असतानाही फडणवीस सरकारने राज्यात मराठा आरक्षण कायदा तीन महिने उशिरा संमत केला. त्यामुळे मराठा आरक्षण कायदाच्या कचाट्यात...
देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करणारा गजाआड

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करणारा गजाआड

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणार्‍या पिंपरी चिंचवड येथील युवराज दाखले या व्यक्तीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. फडणवीस यांनी तृतीयपंथीय व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा खळबळजनक दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत केला होता. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली होती. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत केला होता.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले होते. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्या कोमल शिं...
दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित- आंबेडकर

दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित- आंबेडकर

राजकीय
नागपुर/दि/दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून, यासाठी भाजपा आणि कॉंग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, २००६ साली शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या विविध संघटनांनी सरकारला एक कायदा करायला भाग पाडले. तो कायदा म्हणजे, खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा कायदा होय. यात एसटी, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, आदिंना विविध जागांचे आरक्षण देण्यात आले. हा कायदा एक वर्ष बरोबर चालला. नंतर सरकारने एक अधिनियम पास करून, या कायदयात ५० टक्के कपात केली.त्यामुळे दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे देशाचे मोठे नुकसान आहे. याविषयावर इतक्या वर्षात शिक्षक पदविधर मतदार संघातून निवडणून गेलेल्या एकाही आमदाराने आवाज उठविला नाही, त...
कॉंग्रेस राष्ट्रवादीत लायकीची माणसं नसल्यामुळेच या पक्षांना भाडोत्री नेत्यांची गरज – आंबेडकर

कॉंग्रेस राष्ट्रवादीत लायकीची माणसं नसल्यामुळेच या पक्षांना भाडोत्री नेत्यांची गरज – आंबेडकर

राजकीय
अहमदनगर (अकोला)/दि/वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूद्ध अनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे बनकर हे राजकीय प्रलोभनाला बळी पडले असून, या दोघांचेही राजकारण शॉर्ट टाईम टर्मचेच आहे आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाडोत्री नेत्यांचीच गरज पडते असे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने राज्यात सक्षम पर्याय उभा केला आहे. ही चळवळ बांधतांना अनेक नेत्यांना घडविले. महाराष्ट्रा समोर उभे केले. त्यांनी लाखालाखांच्या सभा घेतल्या, पण ते वंचितला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीला काहीच फरक पडत नाही. भगदाड तर मुळीच नाही. जे वंचित मध्ये असतांना, लाखांची सभा घेत होत, ते दुसर्‍या ...
मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे

मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे

राजकीय
जळगाव/दि/भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला म्हणून दिलं आहे. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत खडसेंनी भाजपावर टिका केली आहे. ते मुक्ताईनगर येथे बोलत होते.मला फाशी घेण्याची वेळ आली होती. इतकं भाजपामधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशी खंत देखील एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविले. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळ झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं.मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खं आय...
मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा – वडेट्टीवार

मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा – वडेट्टीवार

राजकीय
नागपुर/दि/मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसीसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.ओेबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापी वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको. पण असे करतांना ओबीसी वरील अन्याय नको असे ते म्हणाले. नोकरभरतीसाठी ओबीसी तरूणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको अशा भावना वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.या संदर्भात ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेवून लवकरच निर्णय घेवू. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकर्‍यांत १२ टक्के आरक्षण दिले आहे. याला कुणी कोर्टात आव्हान दे...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा

राजकीय
पुणे/दि/परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा बाळासाहेब आंबेडकरांना दिला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर चझडउ ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करतो. शेतकरी कृषी बिलवर महाराष्ट्र सरकारने कायदा लागू होऊ देणार नाही असे म्हणतो. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू ...
महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई:आंबेडकर

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई:आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली. भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.यावेळी...