Friday, April 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकर्‍यांची राज्यपालांकडे मागणी

कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकर्‍यांची राज्यपालांकडे मागणी

राजकीय
नाशिक/दि/ज्या प्रमाणे कंगनाची भेट घेतलात, त्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतक-यांचीही भेट घ्या, अशी मागणी आता शेतक-यांकडून केली जात आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संवेदनशील मनाचे आहेत. न्यायासाठी दाद मागणा-यास ते नक्की भेट देतात, असं शेतकरी संघर्ष संघटनेने म्हटलं आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी यासंदर्भात निवेदन आणि सोशल मीडियातील एका व्हिडीओद्वारे आवाहन केले. १४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतक-यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटले होते.इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतक-यांची घरे उद्ध्वस्त झाली ...
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, मात्र मंत्र्यांच्या नव्या वाहनांवर उधळपट्टी सुरुच

सरकारच्या तिजोरीत खडखडाट, मात्र मंत्र्यांच्या नव्या वाहनांवर उधळपट्टी सुरुच

राजकीय
मुंबई/दि/लॉकडाऊनमुळे राज्य सरकार समोरचं आर्थिक संकट वाढलेलं आहे. राज्याच्या सरकारी कर्मचार्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात काटछाट करावी लागेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कालच स्पष्ट केलं होतं. मात्र, तरीही शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्र्यांच्या विभागासाठी पाच नव्या वाहन खरेदीवर कोटींच्या उधळपट्टीला मंजुरी देण्यात आली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, दोन्ही राज्य मंत्री बच्चू कडू आणि अदिती तटकरे यांच्यासह अपर मुख्य सचिव आणि कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्येकी एक अशा एकूण पाच वाहनांसाठी सुमारे १ कोटी ३७ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. २२ लाख ८३ हजार रुपयांची ‘इनोव्हा क्रिस्टा २.४ नद’ मॉडेल खरेदी करण्यासाठी वित्त विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीने २० लाखांपेक्षा जास्त किंमत असल्य...
काही लोकांचा मताधिकार काढुन घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय – आंबेडकर

काही लोकांचा मताधिकार काढुन घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय – आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या परस्पर विरोधी विधानांवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागु करणार नाही असं पंतप्रधान जनसभेला संबोधित करतांना म्हणतात, मग त्यांचेच गृहमंत्री लोकसभेत एनसीआर लागु करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारेडपणावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशावरील संकट असल्याचा आंबेडकर यांनी म्हटल आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसी वरून खोटं बोलत असल्याचा अरोप त्यांनी केला. एनआसी बद्दल मंत्रिमंडळात,संसदेत कधीच चर्चाही झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी ल...
१० रूपयांच्या भोजनावर अटी व शर्थींची मात्रा

१० रूपयांच्या भोजनावर अटी व शर्थींची मात्रा

राजकीय
मुंबई/दि/ १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ मूद भात आणि १ वाटी वरण देण्यात येणार आहे. परंतु ही थाळी खाण्यासाठी काही अटी शर्थींचं पालनही करावं लागणार आहे. या भोजनावर अटी व शर्थींची मात्रा लागू झाल्याने गोरगरीब जनतेने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नावाने खडे फोडले आहेत. दरम्यान, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगराला मिळून १९५० थाळ्या मिळणार आहेत. काय आहेत अटी शर्थी ? हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असणार असून भोजना...
प्रस्थापित पक्ष वंचित समूहांना सत्तेत सहभागी करून घेणार नाहीत – आंबेडकर

प्रस्थापित पक्ष वंचित समूहांना सत्तेत सहभागी करून घेणार नाहीत – आंबेडकर

राजकीय
वंचित घटकांनी सत्तेतील सहभागासाठी संघर्ष उभा केला पाहिजे आंबेडकर भवन दादर मुंबई येथे झालेल्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, आजच्या आढावा बैठकीची सुरूवात मी करतोय. राज्यातील निवडणूका संपल्यावनर जे जे लोक मला भेटतात ते मला दोष देतात. आघाडी केली नाही म्हणून संताप व्यक्त करतात. त्यांना राजकारणात आत आणि बाहेर काय सुरू आहे हे कळत नाहीये. आपण वंचितच्या निमित्ताने या दोन निवडणूकीत प्रस्थापितांनी समवून - लपवून ठेवलेला काळा पैसा संपवला आहे. संपवायला भाग पाडलयं. लोकांना पैसे घ्यायची सवय लागलेली होती ती परिस्थिती बदलत आहे. हा एक मोठा बदल आहे. त्याच बरोबर वंचित हा आता एक ब्रँड झाला आहे आपण लक्षात घेतले पाहिजे. वंचितांचे राजकारण सोपे नाही. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत हा बदल सहजा सहजी स्वीकाला जाणार नाही. यशस्वी होऊ दिला जाणार नाही हे समजुन घ्या. सन १९९५ च्या निवडणूकी नंतर आपले सरकार...
पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचार्‍यांचा संप,  इंधन टंचाईची शक्यता

पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचार्‍यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता

राजकीय
मुंबई/दि/ केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्या नंतर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. या खाजगीकरणाला कंपनीच्या कर्मचार्यांनी विरोध केला आहे. मनमाडजवळच्या पानेवाडी टर्मिनल येथील बीपीसीएल कर्मचार्‍यांनी आज गेट बंद आंदोलन छेडत केंद्र सरकारने केलेल्या खाजगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीतील सर्वच कर्मचारी एकत्रित आंदोलनात उतरल्याने सकाळपासून बीपीसीएल कंपनीतून एकही टँकर इंधन भरुन बाहेर पडलेला नाही. पानेवाडी टर्मिनलमधून उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भ अशा भागात इथून इंधन भरुन टँकर जातात. मात्र आज सकाळपासून एकही टँकर भरुन गेलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून हे आंदोलन आज दिवसभर सुरु राहणार आहे. दिवसभरातून या प्रकल्पातून ४०० टँकर भरुन बाहेर पडत असतात. आज मात्र सर्व टँकर पार्किंगमध्ये उभे असल्याचं ...
महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

राजकीय
महाराष्ट्रात सध्या सत्तेची लंगडीपानी सुरू आहे. सत्तेची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. आमदारांना पोरींसारखं इकडुन तिकडं हॉटेलात पाठवलं जात आहे. कधी कोण पळुन जाईल आणि दुसर्‍याबरोबर निकाह करतील ह्याचा काही भरवसा देता येत नसल्याने सर्वजण आमदारांवर लग्नाच्या पोरीसारखं लक्ष देवून आहेत. तिकडं अजितरावांनी मी राष्ट्रवादीतच आहे, नव्हे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे अस्सं दणकुण सांगितलं आहे. कधी कधी अस्सं वाटतय की, ही खेळी शरद पवार यांची तर नाहीये ना… पण काहीच उत्तर मिळत नाहीये… सध्या राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. शेतकर्‍यांच्या हातातुन पिक निघुन गेले आहे. तिकडे बाजारात भाज्यांसहीत कडधान्याचे भाव वाढत आहेत. व्यापारी साठा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष नेमकं कुठं चाललयं हेच समजत नाहीये. पुण्यातील बाजारपेठांमध्ये धान्याची आवक...
एस.सी, एसटी, ओबीसींनो आपली सत्ता मिळवा – बाळासाहेब आंबेडकर

एस.सी, एसटी, ओबीसींनो आपली सत्ता मिळवा – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
ambedkar-1 नागपुर/दि/ प्रबुद्ध भारत/        आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गालाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर सत्ता आपल्या हातात असायला हवी. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवुन काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे विधानसभेत पाठवा. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी सत्तेत बसले, तर त्यांना कुणाला न्याय मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेंव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आबेडकर यांनी येथे व्यक्त केले.        विविध संघटनांच्या वतीने विवर्य सुरेश भट सभागृह येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणू...
वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/        ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांनी उमेदवारी  मागितली आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा सेना या पक्षातील आजी माजी आमदार, महापालिका-जिल्हा परिषद सदस्य तसेच काही नाराज नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिर कुलकर्णी यांना वंचित कडून         उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती वंचित आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी दिली आहे.        वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील मुलाखती झाल्या आहेत. शनिवार व रविवार पुण्यासह सातार्‍याती...
उध्दवा.. अजब तुझा कारभार तक्रारी खरीप विमा भरपाईच्या, सेनेचा मोर्चा रब्बीच्या कंपनीवर!

उध्दवा.. अजब तुझा कारभार तक्रारी खरीप विमा भरपाईच्या, सेनेचा मोर्चा रब्बीच्या कंपनीवर!

राजकीय
नाशिक/दि/ खासगी विमा कंपन्यांना ‘ठाकरी’ इशारा देत राज्यातील शेतकर्यांच्या हिताचा कळवळा दाखवणार्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मोर्चा ‘आग सोमेश्‍वरी अन् बंब रामेश्‍वरी’ ठरला आहे.        ‘मातोश्री’पासून सोयीच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर बुधवारी ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकर्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे. परंंतु पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या राज्यातील शेतकर्यांच्या सर्वाधिक तक्रारी असताना शिवसेनेने मोर्चा काढलेली कंपनी फक्त रब्बी हंगामासाठी असल्याचे पुढे आले आहे.        परभणीसह सहा जिल्ह्यांतील शेतकर्यांना पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारींचे निवेदन उध्...