गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –
गुन्हेगारी मंडळी केवळ मटका, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध विदेशी मद्याची तस्करी करतात हे खरे असले तरी त्यांचे अनेकही प्रताप आहेत. आजही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने पुण्या मुंबईतील कॉल सेंटर, मॉल, मोठ्या सोसायट्या, व्हीआयपी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग सारखी कामे तसेच मॉल व व्यावसायिक आस्थापनेतील स्क्रॅपचे टेंडरही याच गुन्हेगारी टोळ्यांना दिले आहे. आजकाल खाजगी फायनान्स करणार्या कंपन्या शेकडोंनी कार्यरत आहेत. पुण्यातही अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या खाजगी फायनान्स कंपन्या, दुचाकी वाहन खरेदी, तीन चाकी वाहन, टेम्पो, ट्रक खरेदी, घर जमिन खरेदीसाठी फायनान्स पुरविते. मात्र एखादा कर्जाचा हप्ता थकला तरी ह्याच कंपन्या दिवसात चार/पाच फोन करून कर्जदारांना धमकावित असतात. त्यांची वाहने ओढुन आणतात. टोळ्या घेवून कर्जदारांच्या घरी ...