Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वाहनचालकांच्या डोळ्यात मिरची पुड टाकुन लुटमार करणार्‍या टोळीला, भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद, भारती विद्यापीठाचे पोलीस अंमलदार आकाश फासगे यांची कामगिरी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस यंत्रणा जितक्या सक्षम असतील, तितकेच गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे शक्य असते. पोलीस स्टेशन हद्दीतील सरावलेले गुन्हेगार आणि पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील गुन्हेगार यांच्या कृत्यांवर सातत्याने बारकाईन नजर ठेवल्यास, गुन्हेगारीचा बिमोड करणे अशक्य नाही. अगदी अशाच पद्धतीनं भारती विदयापीठ पोलीसांनी गुन्हेगारांच्या कृत्यांवर बारकाईने नजर ठेवून, वाहनचालकांना अडवुन त्यांना लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे.


भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सातारा रोडवरील कात्रज येथील हिल हॉटेल समोर उमेर अन्सारी, नोमेन अस्लम खान, आशरूफ शेख, जैद जमीर दलाल व एक अनोळखी इसमाने दरोडा टाकण्याच्या इरादयाने आणि वाहन चालकांना अडवून लुटण्याच्या तयारी सोबत तलवारी आणि मिरची पुड हे दुचाकीवरून घेवून, घातक शस्त्रांचा धाक दाखवुन वाहने चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्हयाचा तपास भारती विदयापीठ पोलीसांकडून सुरू होता. दरम्यान ३१ मे रोजी कात्रज येथील गोकुळनगर चौक येथे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अशरफ आरिफ शेख हा येणार असल्याची खबर मिळाल्याने व गोकुळनगर येथून तो गावी पळुन जाणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार आकाश फासगे यांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ वरीष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधुन, ट्रॅप लावला. पोलीसांना पाहुन शेख पळुन जाण्याच्या तयारीत असतांना, सपोनि वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक समाधान मचाले, पोलीस अंमलदार आकाश फासगे, मनोज बदडे यांनी त्याला शिताफीने पकडुन अटक केली. त्याचा कसुन तपास करीत असतांना, त्याचा आणखी एक साथीदार ओवेस कुरेशी रा. घोरपडी पेठ हा कात्रज चौकातील किनारा हॉटेलसमोर थांबला असल्याचे समजल्याने, पोलीसांनी तातडीने हालचाली करून, कुरेशी यालाही अटक केली आहे. ओवेसी कुरेशी हा रेकॉर्डवरील सराईत फरार गुन्हेगार होता. तो देखील पुणे सोडून जाण्याच्या तयारीत होता. त्याला देखील जेरबंद करण्यात आले आहे.
पुण्यातील कात्रज जुना घटक येथे दुचाकी वाहनावरून दरोडा टाकण्याचा व वाहनचालकांना अडवुन लुटणार्‍या आरोपींना जेरबंद करून गुन्हा करणार्‍यांचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये भारतीचे पोलीस अंमलदार आकाश फासगे यांनी गुन्हेगाराची पळुन जाण्याची पद्धत व एक गुन्हेगाला अटक केल्यानंतर, दुसरा साथीदार असण्याची शक्यता गृहित धरूनच, शेख याच्याकडून उकल करून, पोलीसांना पाहिजे असलेल्या व फरार असलेल्या गुन्हेगाराला अतिशय शिताफीने अटक केली आहे.
दोन्ही सरावलेल्या गुन्हेगारांना पोलीस अंमलदार आकाश फासगे यांच्यासहित सपोनि वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले, मनोज पदडे यांनी कामगिरी केली आहे.