Friday, April 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस क्राइम

Police Crime News in Pune

समर्थ वाहतुक पोलीसांची हद्द म्हणजे दिवसा ढवळ्या लुटमारी, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिकांची दादागिरी, व्यवसायिकाला डांबून केली मारहाण

समर्थ वाहतुक पोलीसांची हद्द म्हणजे दिवसा ढवळ्या लुटमारी, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिकांची दादागिरी, व्यवसायिकाला डांबून केली मारहाण

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/शहरातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकाने कार्यालयातच एका व्यवसायिकाला ( इंटेरिअर डेकोरेट) डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी समर्थ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याविरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. निरीक्षकाच्या घरातील इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित केले नाही, असे म्हणत दिलेले पैसे परत मागण्यात आल्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या नाना पेठ परिसरातील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम कार्तिक ओझा यांनी घेतले होते. कामाचे कोटेशन पुराणिक यांना देउन कार्तिक यांनी कामाला सुरूवात केली. त्यांच्या घराचे अंतर्गत डिझाईनचे काम जवळपास ७० ट...
शेअर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणून बसवून लुट करणार्‍या टोळक्यास सहकारनगर पोलीसांनी केली अटक

शेअर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणून बसवून लुट करणार्‍या टोळक्यास सहकारनगर पोलीसांनी केली अटक

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/सराईत गुन्हेगारांनी गुन्ह्याची पद्धत बदलली, तसतशी पुणे शहर पोलीसांनी देखील आपल्या पारंपारीक पद्धतीसह गुन्हयाची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेअर रिक्षामध्ये पॅसंजर बसवुन मागाहून अंधाराचा फायदा घेवून त्यांना लुटणारी टोळी पुण्यात कार्यरत होती. परंतु पुणे शहर पोलीसांनी समक्षमपणे अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा छडा लावुन त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर भर दुपारीच शेअर रिक्षा मध्ये पॅसेंजर बसवुन मागाहून प्रचंड रहदारीच्या ठिकाणी पॅसेंजर लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, सेलवम पिल्ले वय ४८ रा दत्तनगर हे गृहस्थ २ जुलै रोजी मार्केटयार्ड येथून शेअर रिक्षाने बालाजीनगर येथील अहिल्यादेवी चौक येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. परंतु रिक्षा चालक व त्याच्या तीन साथीदारांनी पिल्ले यांना धक्काबुक्की करून त्यांच...
पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीसांना (अतिविलंबाने) पदोन्नती

पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीसांना (अतिविलंबाने) पदोन्नती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५७५ पोलीस अंमलदार यांना पोलीस नाईक ते सहा. पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २४ बाय ७ अशी ड्युटी असणार्‍या पोलीसांना अतिविलंबाने का होईना आज पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या बहुतांश खात्यातील कर्मचारी पदोन्नतीसाठी कागदी तलवारी घेवून उभे असतात. परंतू शासनाच्या पोलीस विभागातील कर्मचार्‍यांच्या हातात खरे खुरे घोडे असतांना देखील त्यांना कागदी घोडा नाचविता येत नाही हे खरे वास्तव आहे. पुणे शहर पोलीस दलातील गट क संवर्गातील पोलीस शिपाई ते सहा. पोलीस फौजदार यांची २०२०-२१ मधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीची माहिती, माहितीच्या अधिकारान्वये अनिरूद्ध चव्हाण यांनी विचारण्यात आली होती. जन माहिती अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त श्री. बजरंग देसाई यांनी आस्था - ३ कडील प्रशासकीय अधिकारी श्रीमती एस.आर. भालचिम यांचेकड...
पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा, २ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलीसी कैदेत,

पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा, २ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलीसी कैदेत,

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात कोरोना संसर्ग वाढलेला आहे. मागील दोन वर्षांपासून पुणे शहर लॉकडाऊन आहे. पोलीसांचा दिवस-रात्र कडक पहारा आहे. तरी देखील पुणे शहरात वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, तसेच गांजा, मेफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ सहज आणि सर्रासपणे मिळत आहेत. यावरून शहरात नेमकं लॉकडाऊन कोणत्या बाबीतीत आहे हा सहज प्रश्‍न पडत असेल. परंतु पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पंधरवड्यानिमित्त, पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ गुन्हे शाखा यांनी धडक कारवाई करून, एका इसमाला २ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. दि. २२ जुन पासून अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ कडील अधिकारी व कर्मचारी हे बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग ...
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास सहकारनगर पोलीसांनी केले ४८ तासात जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास सहकारनगर पोलीसांनी केले ४८ तासात जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/अट्टल गुन्हेगार हा नेमका कसा असतो हे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील धनकवडी येथील घरफोडी प्रकरणांवरून दिसून येते. धनकवडी येथील राजमुद्र सोसायटीत पाच लाख रुपयांची घरफोडी करून, त्याचा कोणताही आणि कसल्याही प्रकारचा पुरावा मागे न ठेवता त्याने घरफोडी केली होती. त्यामुळे घरफोडी ज्या पद्धतीने केली आहे त्याचा मागोवा घेत असतांना, थोडक्यात घरफोडी करतांना चोरट्याने वापरलेल्या मोडसवरून अशा प्रकारचा गुन्हा हा एखादया सरावलेल्या गुन्हेगाराने केलेला असावा असा संशय बळावला. मग सहकार नगर पोलीसांनी, पोलीसी खाक्या पद्धतीने तपास सुरू केला आणि ४८ तासाच्या आतच खरा गुन्हेगार पोलीसांच्या हाती लागला. गुन्ह्याची खबरबात अशी की, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीमध्ये २२ जुन रोजी दुपारच्या वेळी एका अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील पाच लाख रुपय...
वाहनचालकांच्या डोळ्यात मिरची पुड टाकुन लुटमार करणार्‍या टोळीला, भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद,  भारती विद्यापीठाचे पोलीस अंमलदार आकाश फासगे यांची कामगिरी

वाहनचालकांच्या डोळ्यात मिरची पुड टाकुन लुटमार करणार्‍या टोळीला, भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद, भारती विद्यापीठाचे पोलीस अंमलदार आकाश फासगे यांची कामगिरी

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस यंत्रणा जितक्या सक्षम असतील, तितकेच गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे शक्य असते. पोलीस स्टेशन हद्दीतील सरावलेले गुन्हेगार आणि पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील गुन्हेगार यांच्या कृत्यांवर सातत्याने बारकाईन नजर ठेवल्यास, गुन्हेगारीचा बिमोड करणे अशक्य नाही. अगदी अशाच पद्धतीनं भारती विदयापीठ पोलीसांनी गुन्हेगारांच्या कृत्यांवर बारकाईने नजर ठेवून, वाहनचालकांना अडवुन त्यांना लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सातारा रोडवरील कात्रज येथील हिल हॉटेल समोर उमेर अन्सारी, नोमेन अस्लम खान, आशरूफ शेख, जैद जमीर दलाल व एक अनोळखी इसमाने दरोडा टाकण्याच्या इरादयाने आणि वाहन चालकांना अडवून लुटण्याच्या तयारी सोबत तलवारी आणि मिरची पुड हे दुचाकीवरून घेवून, घातक शस्त्रांचा धाक दाखवुन वाहने चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.या गुन्हयाचा तपास भारती विदया...
मार्च एंडला- शहर पोलीसांना धरले ओलीस

मार्च एंडला- शहर पोलीसांना धरले ओलीस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/मागील वर्षीचा मार्च २०२० ते चालु वर्षातील मार्च २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्याच्या तिजोरीत ठणठणाट झाल्याची बोंब सध्या सुरू आहे. जीएसटीची रक्कम केंद्र सरकारने दिली नसल्यामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम झाल्याचेही बोलले जात आहे. आपल्या गटारी आमावस्सेला जशी कोंबड्या बकर्‍यांवर जिवावार येत तसं आता मार्च एंड ला पोलीसांना ओलीस धरले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महसुल गोळा करण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांच्या शिव्या शापांचे धनी मात्र पोलीसांना व्हावे लागत आहे. त्यातल्या त्यात वाहतुक शाखेला तर धारेवर धरले असल्याचे समजते. दरवर्षी मार्च एंडला सर्वच प्रकारच्या कारवाया अधिक प्रमाणात होतात असा अनुभव आहे. परंतु यावर्षी अधिक जाणवत आहे. प्रत्येक चौका चौकात, हेल्मेट नाही.. गाडी बाजूला घे, मास्क नाही… गाडी बाजूला घे, मास्क हनवटीवर होता… गाडी बाजूला घे, गाडीला साईड आरसा नाही… ...
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय पाठबळ, सत्तेची हवा आणि पैशाचा माज, गुन्हेगारी अधिक वाढवित आहे

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय पाठबळ, सत्तेची हवा आणि पैशाचा माज, गुन्हेगारी अधिक वाढवित आहे

पोलीस क्राइम
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यात दोन वरून ३५ वर आणि ३५ वरून २०२१ मध्ये हीच गुन्हेगारी टोळ्यांची संख्या दिडशे ते २०० च्या आसपास आलेली आहे. एका टोळीतून दुसरी टोळी आणि दुसरीतून तिसरी टोळी निर्माण झाली आहे. जुने गुन्हेगार गब्बर/ कोट्यवधी/ अब्जाधीश झाले, त्यामुळे त्यांचे अनुकरणं करीत नव नवीन गुन्हेगार तयार होत राहिले, धंदयाचा कल, राजकीय वारं आणि सत्तेची हवा मिळाल्यामुळे अनेक जुन्या टोळ्यांतून नवीन टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु गुन्हेगारी टोळ्या एवढ्या मोठ्या संख्येने पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात कशा उभ्या राहिल्या याचाही विचार होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांना निवडणूका लढवायच्या असतात. निवडणूका जिंकण्यासाठी आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारी टोळ्यांचा वापर केला आहे व ते ह्यांचा वापर करीत आहेत. गुन्हेगार हे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर...
गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –

गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –

पोलीस क्राइम
गुन्हेगारी मंडळी केवळ मटका, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध विदेशी मद्याची तस्करी करतात हे खरे असले तरी त्यांचे अनेकही प्रताप आहेत. आजही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने पुण्या मुंबईतील कॉल सेंटर, मॉल, मोठ्या सोसायट्या, व्हीआयपी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग सारखी कामे तसेच मॉल व व्यावसायिक आस्थापनेतील स्क्रॅपचे टेंडरही याच गुन्हेगारी टोळ्यांना दिले आहे. आजकाल खाजगी फायनान्स करणार्‍या कंपन्या शेकडोंनी कार्यरत आहेत. पुण्यातही अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या खाजगी फायनान्स कंपन्या, दुचाकी वाहन खरेदी, तीन चाकी वाहन, टेम्पो, ट्रक खरेदी, घर जमिन खरेदीसाठी फायनान्स पुरविते. मात्र एखादा कर्जाचा हप्ता थकला तरी ह्याच कंपन्या दिवसात चार/पाच फोन करून कर्जदारांना धमकावित असतात. त्यांची वाहने ओढुन आणतात. टोळ्या घेवून कर्जदारांच्या...
मध्यवर्ती पुण्यातील हॉटेल प्यासा वर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची धडक कारवाई, कित्येक तुर्रमखान आले आणि गेले… नारनवरे यांनी करून दाखविलेच…

मध्यवर्ती पुण्यातील हॉटेल प्यासा वर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची धडक कारवाई, कित्येक तुर्रमखान आले आणि गेले… नारनवरे यांनी करून दाखविलेच…

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/मध्यवर्ती पुणे शहरातील हॉटेल प्यासावर कधीच कारवाई होऊ शकत नाही. ड्राय डे असो की लॉकडाऊन. कोणत्याही काळात प्यासा कधीच बंद नव्हतं. सदासर्वदा २४ बाय ७ प्यासा सुरूच होतं. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ वर मागील ३० वर्षात अनेक तुर्रमखान आले आणि गेले, परंतु त्यांनी देखील प्यासावर कारवाई करण्याची हिंम्मत दाखविली नाही. प्यासा चा इतिहास, भुगोल, नागरीकशास्त्र त्याही पुढे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा सर्वांनीच अभ्यास केला होता. परंतु हिंमत कुणामध्येच नव्हती. परंतु आर्यन लेडी प्रियंका नारनवरे यांनी कोणाचाही मुलहिजा न बाळगता प्यासावर कारवाई करून, मध्यवर्ती शहरातील गुन्हेगारी मोडीत काढली आहे. मध्यवर्ती पुण्यातील हॉटेल प्यासा मध्ये अवैध मद्य विक्री आणि हुक्का पार्लर चालविल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी रात्री विशेष पथक तयार करून, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांन...