विनायक गायकवाड यांची सुपर – डुपर कारवाई, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई . दोन कोटी 20 लाखांचा कोकेन ड्रग्ज जप्त
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरासहित संपूर्ण जगाला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. कालपर्यंत देशी- विदेशी मदय आणि गांजा-पन्नीपर्यंत नशेखोरी होती. परंतु आता नशेचे प्रकार बदलत गेले आहेत. आता गांजासहित मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉईन, चर्रस यासारखी अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. नशेचे इंजेक्शन घेतले जात आहे. यावर पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेने कंबर कसली असून, संपूर्ण पुणे शहरात धाडसत्र सुरू आहे. काल कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विभाग गुन्हे शाखा युनिट एक चे विनायक गायकवाड यांनी सुपर-डूपर कारवाई करून सुमारे दोन कोटी 20 लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच अंमली पदार्थ विभाग युनिट क्र. दोन यांनी देखील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई करून सुमारे 21 किलो गांजा जप्त करून 10 लाख 63 हजार रुपयांचा एैवज जप्त केला आहे. दोन्ही गुन्हे शाखा युनिटस्नीदमदार कारवाई करून अंमली पदार्थ विक्...