Thursday, December 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतांना, पुण्यातील कोणत्याही गल्ली बोळात सहज मिळतो…
आता गांजा, मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉईन सारखे अंमली पदार्थ देखील सहज मिळत आहेत…

पुणे शहर अंमली पदार्थ गुन्हे शाखांच्या धाडी…
पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
मध्यवर्ती भारत सरकार मध्ये काँग्रेसच्या राजवटीत 1990 साली डंकेल करार प्रस्ताव मान्य करण्यात आला. डंकेल कराराचे जेवढे फायदे झाले तेवढेच तोटे सहन करावे लागत आहेत. इंटरनेटने तर संपूर्ण जग गावखेड्या सारखे झाले आहे. आज 30/32 वर्षानंतर त्याची विषारी फळे भारताला चाखावी लागत आहे. एकेकाळात तमाशाला जाणे किंवा दारू पिणारा आहे असे म्हटले तर त्या इसमाला संशयाच्या नजरेने पाहत होते. वयाच्या तिशी चाळीशी पर्यंत घरात तंबाखुला हात लावणे तर दूरच. आता मात्र आई बापाच्या समोरच गुटख्याच्या पुड्या रिकाम्या होत आहेत. दारू पिऊन येण नित्याच झालं आहे. एक काळ असाही आला की, तंबाखु, गुटखा आणि दारू इथपर्यंत ठिक आहे असं समजलं जाऊ लागल्याचा काळ होता. मुलं/ मुली दारू पासून ड्रग्जपर्यंत वळली आहेत. हाच तरूण वर्ग भांडवलदारांचा ग्राहक आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे. परंतु कोणताही गुटखा सहजपणे कोणत्याही पान टपरीत मिळतो. महाराष्ट्रातील सरकार आता किराणा माल दुकानातून देखील दारू विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महसुलासाठी सरकार स्तरावरूनच नशाखोरीला खतपाणी घालत असल्यामुळेच संपूर्ण पुणे शहर आणि देश ड्रग्जच्या आहारी गेला आहे.

जागतिकीकरणातील इंटरनेट क्रांतीमुळे, मोबाईल क्रांतीमुळे कॉल सेंटर, मॉल संस्कृती निर्माण झाली. त्यातच या ठिकाणी मोठा पगार मिळत असल्यामुळे नशेखोरीची पद्धत बदलली. आता तंबाखु कुठेही मिळते.... दारू सहज उपलब्ध होते.... गुटखा पाहिजे त्या ठिकाणी मिळतो.... गांजा असो की मेफेड्रॉन सहज मिळत आहेत. नशेचे इंजेक्शन सहज मिळत आहेत. आणि पोलीस हातावर हात धरून बसले आहेत. याचा निश्चित अर्थ समजत नाही. त्यातल्या त्यात पुणे शहर पोलीस विभाग सतर्क असून पुण्यात शेकडो किलोचा गांजा, मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉईन उपलब्ध असले तरी निदान 10 ग्रॅम, 20 ग्रॅम मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉईन जप्त करून कारवाई तरी करीत आहेत. गांजा शेकडो किलो असला तरी निदोन 10 किलो, 20 किलो, एक पोते, दोन पोती जप्त करून कारवाई केल्याचा धाक तरी निर्माण करीत आहेत... हे नशिबच म्हणावे लागेल. 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विभाग शाखा 1 व शाखा 2 यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. चालुच्या सप्ताहात अनेक ठिकाणी धाडी टाकुन अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 

येरवडा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील दोन इसमांकडून 10 किलो 310 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त-
अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ-4 मधील येरवडा पोलीस ठाणेच्या परिसरात दिनांक 23/11/2022 रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम खिश्चन स्मशान भुमी समोर अमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहेत. सदर मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक-2, कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1) अजय मुक्तीलाल पवार, वय-28 वर्ष, रा. मु.पो. खुटवाडी, पोस्ट वरला, जिल्हा वडवानी, राज्य मध्य प्रदेश 2 ) अरविन सुखलाल सोलंकी, वय 28 वर्षे, रा. मु.पो. मोहदा, ता. पासेमल, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश हे दोघे त्यांचे पाठीवरील काळया रंगाचे सॅकबॅगमध्ये 2.06.200/- रु किचा 10 किलो 310 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, किं.रु.1,000/- रू च्या दोन काळ्या रंगाची सॅकबॅग व 20,000/- रू किचे दोन मोबाईल संच असा एकुण 2,27,200/-रूकिचे अंमली पदार्थ व इतर ऐवजासह संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्यांचेविरुध्द येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. 543/2022, एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क), 20 (च) () (), 29 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक-2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, साहिल शेख, दिशा खेवलकर, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझीम शेख व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे किंमत रुपये 81.490/- रु किमतीचा एकुण 06 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला-
अंमली पदार्थ विरोधी पथक -2 कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उप-निरीक्षक दिगवर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक -2 कडील पोलीस अमलदार हे परिमंडळ 4 मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक 19/11/2022 रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार 1683 चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राजस्थान येथील एक इसम सिध्दार्थ नगर, धानोरी येथे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे मिळालेल्या माहिती नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 2. कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, उप- निरीक्षक दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी सिध्दार्थ नगर, लेन नं. 1, धानोरी, पुणे येथे सापळा लावला असता दि. 19/11/2022 रोजी एक इसम सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेउन उभा असलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारता करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित वय 38 वर्षे रा. हिस्सा नं. 1 सी / 1/39 सिध्दार्थ नगर, धानोरी पुणे मुळ गाव मु-दुरासनी, तहसिल सोजत, जि.पाली राज्य राजस्थान असे सांगीतले त्याची झडती घेता त्याचे ताब्यात कि.रु 81.490/- रु किमतीचा एकुन 06 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी जप्त केला.
त्याचे विरुध्द पोलीस हवालदार 1683 चेतन गायकवाड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाणे. येथे गु.र.नं. 289 / 2022 एनडीपिएस ॲक्ट कलम 8 (क). 15 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक सातपुते नेमणुक विश्रांतवाडी पो. स्टे, पुणे हे करत आहेत..
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक. 2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, आझीम शेख, जगदाळे, योगेश मांढरे, खेवलकर, बास्टेवाड यांनी केली आहे.

पुणे शहर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक-
अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलीस अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पो स्टे कार्यक्षेत्रात ब्रम्हा हॉटेल चौकातुन रामनगरकडे जाणा-या सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना, अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरा समोरील सार्वजनिक रोडवर इसम नामे 1) आकाश महेंद्र ठाकर, वय-22 वर्षे, रा. सनसिटी, आनंदनगर हिंगणे, पुणे 2) अनिकेत जनार्दन धांडेकर, वय-20 वर्षे, रा. आनंद विहार कॉलनी नं. 1, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, पुणे या आरोपीपैकी आकाश ठाकर याने त्याचे ताव्यात 47,650/- रु किचे 47 ग्रॅम 650 मिलीग्रॅम चरस हा अंमली पदार्थ एक मोबाईल हॅण्डसेट 10,000/- चे एक पेंशन प्लस दुचाकी क्रमांक क्र. एमएच/12/इके /0037 किरू 20,000/- असा 77,650/- रु किया व अनिकेत धांडेकर याचे ताब्यात 86,400/- रुकिंचा 05 ग्रॅम 760 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व एक आयफोन किरु 50,000/- रु किचा 1,36,400/- असा एकुण 2,14,050/- रू किचा ऐवज व अंमली पदार्थ संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
सदरचा मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ त्यांनी दोन अज्ञात इसमांकडुन विकत घेवुन त्याची पुणे शहरामध्ये विक्री करीता घेतला असल्याचे त्यांचेकडे करण्यात आलेल्या चौकशी मध्ये आदुळन आल्याने त्यांचेवर तसेच इतर दोघांविरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 484/2022, एन.डी.पि.एस. ॲक्ट कलम 8 (क), 20 (ब), (अ), 21 (ब), 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अंमली पदार्थ विरोधी पथक- 1. गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, सचिन माळवे संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.