Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाणेर येथील टेरेस हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई, डीजे मिक्सर जप्त

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे गोल्डन एम्पायर बिल्डींगमधील हेवन रुफटॉप हॉटेल तसेच 5 व्या मजल्यावरील हेवन क्लव बाणेर, पुणे या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडून कारवाई साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त करण्यात आला आहे.


बाणेर हायस्ट्रीट परीसरातील हॉटेल / पब मध्ये रात्री साउंड सिस्टीम वर मोठयाने संगीत वाजवले जात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दि. 09/12/2022 रोजी गोल्डन एम्पायर बिल्डींगमधील हेवन रुफटॉप हॉटेल तसेच 5 व्या मजल्यावरील हेवन क्लब बाणेर, पुणे येथे साउंड सिस्टीम सुरु असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेल चेक केले असता रात्री मोठया आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनतर सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्यात आली असुन गोल्डन एम्पायर बिल्डींग मधील हेवन रुफटॉप हॉटेल व 5 व्या मजल्यावरील हेवन क्लब बाणेर पुणे या हॉटेल मध्ये मोठया आवाजात साउंड सिस्टिमवर संगीत सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून 01.60,000/- रू. चे (एक लाख साठ हजार) किमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहेत.
ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन 2000 ) नियम मधील तरतुदींचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असुन सदर हॉटेलचे चालक/मॅनजर तसेच डिजे चालक यांचे विरुध्द पुढील कारवाईसाठी चतुःृंगी पोलीस स्टेशन येथे अहवालासह मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय कुंभार तसेच स.पो.निरी अश्विनी पाटील, स.पो.निरी अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत. अजय राणे, आण्णा माने, हनमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.