Monday, May 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील मोका गुन्हयातील फरारी आरोपी पोलीसांच्या जाळयात

पुणे/दि/ प्रतिनिधी/
बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद के 162/2022 भादवि क 300.143 144, 147, 148, 149, शस्त्र अधि. 4 (25). मपोका अधि.37 (1) (3) सह 135.कि.लो. अमे. कलम 3 प 7 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चेकलम 3 (1) (), 3(2). 3 (4) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनिल रमेश चव्हाण याने आपले नेतृत्वाखाली त्याचे साथीदार यांचे समवेत संघटित गुन्हेगारी संघटन तयार करून त्यांनी रस्त्यावर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार वेगवेगळ्या सदस्या सोबत संघटितरित्या केलेले आहेत. अनिल रमेश चव्हाण (टोळी प्रमुख) याने व त्याचे संघटित टोळीने सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत पसरून स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणे करीता गुन्हे करीत होते. नमुद गुन्हयातील 07 आरोपीतांना पुर्वी अटक केली असुन दाखल गुन्हयातील उर्वरीत दोन फरारी आरोपी नामे 1) अनिल रमेश चव्हाण, वय 21 वर्षे रा. अंबिकानगर, गल्ली नं.4. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे. 2) रोहित हेमंद बोदरे वय 20 वर्षे रा. गल्ली नं.02 गुजर वस्ती, कात्रज कोंढवा रोड, कात्रज पुणे हे गुन्हा दाखल झाले पासुन फरारी होते.
नमुद पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अमलदार अतुल महागडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की. नमुद पाहीजे आरोपी हे रोहीत बोदरे याचे घरी येणार असल्याची खात्रीशिर माहीती मिळालेने लागलीच सपोनि श्री प्रविण काळुखे यांनी सदर बाबत मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर यांना तसेच मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे यांना मिळालेली माहीती कळविली असता त्यांनी मिळालेले माहीती प्रमाणे सापळा रचून कारवाई करणे बाबत आदेशित केलेने सपोनि श्री प्रविण काळुखे यांनी लागलीच पोलीस अंमलदार यांची एक टिम तयार करुन पाहीजे आरोपी रोहीत बोदरे याचे राहते घराजवळ सापळा रचून थांबले असताना ते ओळखित असलेले नमुद पाहीजे आरोपी हे रोहीत बोदरे याचे राहते घराचे दिशेने पायी चालत येत असताना दिसलेने त्यांनी आपआपसात इशारा करुन पाहीजे आरोपी हा जवळ येताच त्यांना चारही बाजूने घेराव घालून ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पाहिजे आरोपीतांना मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर यांच्या समक्ष हजर केले आहे.
सदर उल्लेखनिय कामगिरी श्रीमती, संगिता जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि श्री प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार जाधव, महांगडे, येवले, मोरे, पाटील, काळे, नवले, धुमाळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती पोर्णिमा तावरे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर या करीत आहेत.